Thursday, January 7, 2010

चित्रकविता

मायाजालावर भटकंती करताना, भावलेल्या चित्र - कविता ....














Monday, March 17, 2008

राजगड

गेल्या महिनाभरापुर्वी राजगडला गेलो होतो. त्यातल्याच काही आठवणी... ठरल्याप्रमाने सगळेजण अमोल, किरण, अविनाश (२),प्रविण, अमित, पुजा, योगेश व मी सकाळीच सुनिताच्या घराजवळ भेटलो.. तिथे भावना व केटू अगोदरच आले होते. सुनिताकडची पाव-भाजी उशीर झाल्यामुळे परत येताना खायच अस ठरवून :-( फक्त चहा घेऊन तयार झालो... अन सुरु झाला प्रवास...


राजगडाकडे जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत असं एकलय, पैकी मला माहीती असणारा मार्ग म्हणजे स्वारगेट वरुन वेल्ह्याला जाणारी गाडी पकडायची, वेल्ह्यापासुन थोडंस अलिकडे मार्गासनी नावाचं एक गाव आहे, तिकडे उतरुन मग गुंजवणे गावात जाण्यासाठी साधन मिळवायचं. मार्गासनी ते गुंजवणे गाव हे अंतर साधारण सात-आठ कि.मी आहे. स्वारगेट वरुन थेट गुंजवणे गावात जाण्यासाठी सुद्धा बस उपलब्ध असते.
आम्ही दुचाकीवरुन जाणार असल्याने हाच मार्ग सुलभ..


रणरणतं उन, पोटात काहीही नाही अश्या परिस्थीत चढणे म्हणजे खरोखर एक वेगळाच अनुभव होता. झपाझप आम्ही डोंगर पार् केला खरा पण त्याच्या डोक्यावर असलेल्या एका झाडाखाली बसण्यापासुन आम्ही स्वतःला रोखु शकलो नाही. सकाळी घेतलेला एक कप चहाच्या जोरावर आम्ही जेवढी Energy होती ती सर्व संपली होती त्यामुळे जिथे भेटेल तिथे सरबत, ताक पिन्यापासून आम्ही स्वत: ला रोकू शकलो नाही. ताक पिल्यामुळे चालण्यास गती आली होती. पटपट चालत आम्ही मुख्य सोंडेच्या मध्यावर आलो. इथुन आम्ह्लाला समोर गड, आणि मागे गुंजवणे गाव आणी आम्ही चुकवलेली वाट सारे काही दिसत होते. आम्ही चढायला सुरुवात केल्यापासुन आम्हाला बरेचसे ट्रेकर्स भेटत होते. पैकी काही जणांनी गडावर मुक्काम केला होता तर काही सकाळी सकाळी चढुन खाली उतरत होते.

सोंड संपत असतांनाच दोन्ही बाजुने कारवीच्या झाडी आहेत. त्याच्यातुन वाट काढत आम्ही गडाच्या बुरुजाखाली आलो. बुरुजाखालुन उजव्या बाजुने पायवाट धावत होती, त्या पायवाटेने आम्ही चालत निघालो. पुढे एका ठिकाणी थोडासा कटीण patch आहे पण डाव्या बाजुला रेलिंग लावलेले असल्यामुळे चढणं एकदम सोपे होउन जाते. सावरत सावरत आम्ही वर पोहोचलो आणि 'चोर दरवाजा' नावाच्या दरवाज्यात जाउन बसलो. तिकडुन मागे बघितले तर आमच्या सर्व श्रमाचा मोबदला दिल्यासारखे दृश्य समोर दिसत होते. दुरवर धावणारी सोंड, खाली खोल दरी. चोर दरवाजा नावाप्रमाणेच आहे, साधारण साडेतीन चार फुट उंची असेल. तिथुन वर निघाल्याबरोबर आमचे लक्श एका तळ्यावर (पद्मावती तळे) गेले...



Wednesday, January 23, 2008

आझाद हिंद सेना - (मनोगतावरुण साभार )

(मनोगतावरुण साभार )

आझाद हिंद सेना १ - प्रास्ताविक


NS portait

आझाद हिंद सेना!

प्रत्येक हिंदुस्थानियाच्या अंगावर रोमांच उभे करणारे शब्द. आझाद हिंद सेना म्हणताच डोळ्यापुढे उभे राहतात ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी जगाला गवसणी घालणारे नेताजी सुभाषचंद्र बोस, चलो दिल्ली च्या गर्जना करीत हिंदुस्थानच्या दिशेने कूच करणारी स्वातंत्र्यसमराच्या कल्पनेने मोहरलेली सेना आणि देशासाठी प्राणार्पण करायला आसुसलेल्या हिंदुस्थानी स्त्रीयांची झाशी राणी पलटण. १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यसमरात झोकुन देणाऱ्या झाशीच्या राणीचे नाव घेतलेली पलटण हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यसंग्रामातील निर्णायक पर्वातल्या लढ्यासाठी शस्त्रसज्ज झाली हा एक असामान्य योग आहे. भारताचे स्वातंत्र्य 'लक्ष्मिच्या पावलांनी' आले हे शब्द सर्वार्थाने खरे ठरतात.

नेताजी सुभाष यांच्या आझाद हिंद सेनेने जपानी लष्कराच्या सहाय्याने इशान्येकडून एल्गार केला व विजय डोळ्यापुढे दिसत असताना जपान पराभूत झाले, पाठोपाठ नेताजीही या जगातून नाहीसे झाले हा इतिहास सर्वानाच माहीत आहे. पण जे फारसे माहित नाही वा सहसा चर्चिले जात नाही त्याचा परामर्ष केलेल्या वाचनाच्या आधारे घेण्याचा हा एक प्रयत्न. मी अभ्यासकही नाही आणि संशोधकही नाही, व्यासंगी विद्वान तर नाहीच नाही. अर्थातच माझ्या लेखनात काही त्रुटी असण्याची शक्यता आहे, मनोगती त्या वेळोवेळी दाखवुन देतील व सुधारतीलही याची मला खात्री आहे.

आझाद हिंद सेना म्हणजे नक्की काय होते? तीच्या स्थापनेमागचे उद्दिष्ट काय? ही संकल्पना कशी सुचली? कशी साकार झाली? मुळात अशा सेनेची गरज का भासली? त्या वेळचे जागतिक संदर्भ काय होते? हिंदुस्थानची स्वातंत्र्यप्राप्ति कितपत स्पष्ट दिसत होती? या सेनेत कुणाचे कार्य काय? या सेनेने नक्की काय साध्य केले? हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यध्वजारोहणात आझाद हिंद सेनेचा वाटा किती? या सेनेची पाळेमुळे कुठवर रुजली होती? आपल्या राष्ट्राच्या मुक्तीसाठी 'शत्रुचा शत्रु तो मित्र' या नात्याने जर्मनी व जपान यांच्याशी संघटन साधून स्वातंत्र्य सेना स्थापणारे नेताजी व त्यांचे अनुयायी देशद्रोही कसे? राजकिय नेत्यांनी धिक्कारले तरी जनसामान्यांत आझाद हिंद सेनेची प्रतिमा काय होती?

या व अशा अनेक प्रश्नांचा परामर्ष घेण्याचा हा एक प्रयत्न. आझाद हिंद सेनेचे पहिले ध्वजारोहण व शपथविधी जुलै महिन्यात तर स्वातंत्र्याच्या कल्पनेने झपाटलेल्या नेताजींचा देहांत ऑगस्ट महिन्यात. हा योग साधून ही लेखमाला जुलै महिन्यात सुरू करून जमेल तसे लिहित जात नेताजींच्या स्मृतिदिनी समारोप करण्याचा मानस आहे. जर कुणाकडे उपयुक्त माहिती असेल तर ती येथे देण्याचे मनोगतींना नम्र आवाहन.

जर्मनीतील पहिल्या तुकडीचा शपथविधी

A H Tricolour

जुलै १९४२, जर्मनी येथील आझाद हिंद सेनेच्या पहिल्या तुकडीचा शपथविधी समारंभ. आझाद हिंद चा डरकाळी फोडत झेपावणारा पट्टेरी वाघ धारण केलेला तिरंगा धारण केलेले गुरुमुखसिंह मंगट - आझाद हिंदच्या अगदी पहिल्या जवानांपैकी एक.



आझाद हिंद सेना २ - हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यसंघर्षाचा आढावा


१८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यात वासुदेव बळवंत फडके नावाची उल्का कोसलळी आणि लुप्त झाली. मग पुढची ठिणगी पडली ती चाफेकर बंधुंच्या रुपाने. विसावे शतक उगवले ते नव्या ज्वाला घेउनच - लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर. लोकमान्य टिळकांनी आपली लेखणी तलवारी सारखी चालवीत थंड, अचेतन समाजाला धग दिली तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यदेवतेचे पोवाडे गात थेट हिंदुस्थानच्या हाती पहिले शस्त्र दिले. पनास वर्षे काळेपाणी झालेल्या स्वातंत्र्यवीरांनी शिक्षा देणाऱ्यालाच प्रतिप्रश्न केला, "तितकी वर्षे तुमचे साम्राज्य टिकेल काय?" तर लोकमान्यांनी सरकारला डोके ठिकाणावर आहे का असे ठणकावून विचारले होते. दोघेही आपापल्या पद्धतिने जनजागृती चेतवित होते, क्रांतियज्ञ सिद्ध करीत होते. याच सुमारास भारतात एक नवा किरण उमटला. गांधी. दक्षिण अफ्रिकेतून आलेल्या या माणसाने अहिंसा आणि सत्याग्रह ही नवी अस्त्रे आपल्याबरोबर आणली होती. सहजता, सोपेपणा व कुणालाही अंगीकारता येइल अशी देशभक्ती, ती सुद्धा समाजसेवेच्या स्वरुपात. हा मनुष्य सामान्य जनतेला पटकन आपला वाटला. बघता बघता त्याने जनतेला एकत्रीत करायचा चंग बांधला आणि स्वातंत्र्याच्या प्रयत्नाला एका देशव्यापी संघटित प्रयत्नाचं रुप आलं. क्रांतिकारकांविषयी कितीही आदर असला तरी त्यांच्या अग्नीपथावर चालण्याची हिंमत सामान्य माणसात नव्हती. अग्नी कितीही तेजस्वी असला, पूजनिय असला, तरी त्याची धग इतकी प्रखर असते की आपण त्याच्या जवळ जाउच शकत नाही. या मानाने गांधींचा देशप्रेमाचा मार्ग फार सोपा व सरळ होता. महाराष्ट्राच्या संतांनी 'प्रपंच करावा नेटका' अशी संसार सांभाळून इश्वरभक्ती करायची संथा जनसामान्यांना दिली तदवत गांधींनी जनतेला 'देशभक्ती साठी असामान्यत्वच आवश्यक नाही तर ती सामान्य माणसालाही करता येते" हा कानमंत्र दिला.

हिंदुस्थानातील स्वातंत्र्य लढ्याचा आढावा घेतला तर असे दिसुन येते की १९२० साली लोकमान्य टिळक निवर्तल्यानंतर कॉंग्रेसचे नेतृत्व गांधींकडे आले. गांधी हे अहिंसावादी होते व केवळ आंदोलने, आर्जवे, शत्रुचे हृदय परिवर्तन या मार्गाने स्वातंत्र्य मिळेल यावर त्यांचा विश्वास होता. विशेषत: लोकमान्य टिळकांच्या जहाल विचारसरणीपुढे आणि रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले असे परखड्पणे विचारणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांपुढे गांधींचे धोरण साहजिकच फार मवाळ होते. किंबहुना एखाद्या लढ्यात उपयुक्त ठरलेले सत्याग्रहाचे अस्त्र हेच एकमेव अस्त्र, हाच एकमेव उपाय, हाच रामबाण उपाय व याखेरीज दुसरा मार्गच असू शकत नाही असा त्यांचा सिद्धांत होता. मात्र एखादी चळवळ यशस्वी करणे आणि स्वातंत्र्यप्राप्ति यांत फार मोठा फरक आहे हे त्यांना पटले नाही. किंबहुना ते स्वातंत्र्यवादी असाण्या ऐवजी मानवतावादी अधिक होते. गांजलेल्यांची सेवा, समाजाचा उद्धार यांत त्यांना स्वातंत्र्य लढ्यापेक्षा अधिक स्वारस्य होते. त्यांचा स्वभाव चंचल असा होता व त्यापायी अंगी काहीशी धरसोड वृत्तिही आली होती. स्वातंत्र्यप्राप्तीच्या दृष्टीने त्यांच्याकडे कालबद्ध, निर्णायक अशी योजना नव्हती. आपण आपल्या मार्गाने जात राहायचे व वाट पाहायची असा त्यांचा विचार. सरकारकडे तडकाफडकी स्वातंत्र्य मागण्याची त्यांची यत्किंचितही इच्छा नव्हती. सरकारच्या कलाकलाने वागत एकीकडे आपल्या मागण्या पुढे करत सामंजस्याने बोलणी करण्याकडे त्यांचा कल होता. गांधी ही तेवणारी समई होती तर क्रांतिकारक ही मशाल वा वडवानल होता. जर शत्रूला पळवायचा असेल तर दाहक ज्वाळाच हव्यात, समईचा मंद प्रकाश हा गाभाऱ्यात प्रकाश देण्यासाठी योग्य. मात्र गांधी आपल्या नंदादिपाच्याच प्रकाशात स्वातंत्र्याचा मार्ग शोधण्यावर ठाम होते. नेमकी हिच गोष्ट क्रांतिकारक विचारसरणीच्या तरुणांना पटत नव्हती. एकेकाळी अंधारात सुर्यकिरण यावा तसा त्यांनी हिंदुस्थानच्या राजकारणात प्रवेश केला. मात्र तिसरे दशक पार होत असताना त्यांचे वर्तन हे मध्यान्हीच्या सूर्यासारखे दाहक होऊ लागले होते. त्यांनी आपल्या मनाची कवाडे बंद करून घेतली होती.

अखेर व्हायचे तेच झाले. पहाटेच्या आंधारात ज्याच्या किरणांची चाहुल उबदार व सुखद वाटते, तोच सूर्य माथ्यावर तळपू लागला की तापदायक होतो. गांधींमधला 'मी' फणा काढुन उभा राहीला होता. आधी माझे महात्म्य, माझे तत्त्व, माझे विचार, मग इतर सर्व असा खाक्या त्यांनी आरंभिला होता. आपल्याला वंद्य मानणाऱ्या पण तरीही आपले नेतृत्व सोडुन स्वतंत्र मार्ग चोखाळुन स्वातंत्र्याप्रत सज्ज झालेल्या इतर देशभक्तांचा धिक्कार व तिरस्कार आणि निर्भत्सना करण्यासाही ते कचरेनासे झाले. चौरीचौरा प्रकरणात हिंसा घडल्याने आंदोलन मागे घेउन त्यांनी असंख्य अनुयायांशी प्रतारणा केली होती, मात्र याच सत्पुरुषाने अमानुष अशा जालियनवाला बागेतील खुनी इंग्रज अधिकाऱ्यांविरुद्ध मात्र कसलेही आंदोलन उभे केले नाही वा त्यांना सजा होण्यासाठी उपोषणही केले नाही. ज्या गांधींनी हुतात्मा भगतसिंह प्रभृतिचा हिंसक म्हणून तीव्र निषेध केला त्या गांधींनी नि:शस्त्र आंदोलन करणाऱ्या लालाजींवर मरेपर्यंत लाठी चालवणाऱ्या उन्मत्त ईंग्रज अधिकाऱ्या विरुद्ध मात्र मौन पाळले. पुढे याच हुतात्मा भगतसिंहाने जेव्हा बॉंब सारख्या संहारक अस्त्राचा अत्यंत कल्पक व संपूर्ण अहिंसात्मक वापर केला तेव्हा मात्र गांधींनी त्यांची पाठ थोपटली नाही की वाहवा केली नाही. व्हॉईसरॉयची गाडी उडवण्याच्या प्रयत्नाचा निषेध करून गांधींनी असंख्य जनतेला दुखावले. तिसऱ्या दशकात 'हिंदुस्थान समजवादी प्रजासत्ताक सेना' लोकप्रियतेच्या शिखरावर होती, हुतात्मा भगतसिंह, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद इत्यादीं क्रांतिकारकांच्या धगधगत्या हौतात्म्याने विव्हळ झालेल्या तरुण पिढीला गांधींनी दुखावले. प्रत्येक क्रांतिकारक त्यांना आदरणीय मानत असूनही त्यांनी केवळ आपल्या पेक्षा वेगळ्या मार्गाने जाणे हे आपल्याला आव्हान असे समजून त्यांचा दु:श्वास केला. एकीकडे तरुण कॉंग्रेसजन संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा जोरा करीत असतांना त्यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली. तरुणांचे कंठमणी असलेल्या नेताजींचे नेतृत्व त्यांना डाचु लागले. एकिकडे गोलमेज परिषदेतले अपयश तर दुसरीकडे क्रांतीकारकांची वाढती लोकप्रियता यामुळे गांधी काहीसे अस्वस्थ झाले होते व जणु त्यांना आपल्या सर्वेसर्वा पदाला धोका असल्याचे व तो नेताजींच्या रुपात असल्याचे त्यांना जाणवु लागले. १९२८ च्या कलकत्ता अधिवेशनात नेताजी जेव्हा लष्करी अधिकाऱ्याच्या गणवेशात खाडखाड बुट वाजवीत कलकत्त्यात फिरले व मागे बेहोष तरुण स्वयंसेवक त्यांचा व स्वातंत्र्याचा जयघोष करीत फिरू लागले तेव्हाच गांधींच्या कपाळावर नापसंतीची पहिली आठी उमटली. हे प्रकरण डोइजड होइल हे त्या मुरब्बी राजकारण्याने अचूक ओळखले

बाळाचे पाय ......

lashkari adhikari

मोतीलाल नेहरू व नेताजी

गांधींच्या सारखेच लोकप्रिय असे दुसरे नेतृत्व म्हणजे नेहेरू. काहीसा उतावळा पण उत्साही स्वभाव, काहीतरी करून दाखवायची हौस, हिंदुस्थानचे सर्वेसर्वा होण्याची आकांक्षा असलेला हा सद्गृहस्थ अनेकदा कुणाच्यातरी प्रभावाखाली वावरताना भासायचा. तिसरे दशक संपत असताना सुभाष-जवाहर हे एकेमेकांच्या बरेच जवळ आले होते. नेताजींची तड्फ, जिद्द, सळसळता उत्साह, शत्रूवर थेट शरसंधान करण्याची आक्रमकता, त्यांचा तरुणांवर - विशेषत: कॉंग्रेसमधील तरुण तुर्कांवर वाढता प्रभाव यामुळे नेहेरू निश्चितच नेताजींकडे झुकू लागले होते. 'भारत के दो लाल, सुभाष और जवाहरलाल' ही घोषणा सर्वतोमुखी झाली होती.

netaji jawahar

नेताजींनी कॉंग्रेसचे अध्यक्षपद भुषविले आणि सगळा नूर पालटू लागला. पक्षाने व अर्थातच अध्यक्षानेही आपल्याला अभिप्रेत असेल ते आणि तेच व आपल्या परवानगीने बोलोवे असा आग्रह असणाऱ्या गांधींना सुभाष खटकू लागले. आपण मनाई केली असताना देखिल वारंवार संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा पाठपुरावा, कॉंग्रेस मधील जे चुकत आहे त्यावर टिका, क्रांतिकारकांशी असलेले घनिष्ट संबंध यामुळे गांधींना सुभाष नावडते झाले. गांधींनी त्यांना खड्यासारखे दूर काढायचा चंग बांधला. या क्षणी मात्र नेहरूंनी आपले माप गांधींच्या बाजुने झुकविले. १९३९ मध्ये प्रथमच कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणुक झाली.

adhyaksha

एकीकडे जहाल मतवादी व आर-पार अशी भूमिका घेणारे तरुण तुर्कांचे लाडके नेताजी तर समोर गांधी पुरस्कृत पट्टाभी सितारमय्या. ही निवडणुक म्हणजे गांधींनी आपल्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा प्रश्न केला होता. संपूर्ण पक्ष यंत्रणा नेताजी विरोधी प्रचारात उतरली होती, तर नेताजी केवळ आपली भुमिका स्पष्ट करीत आज देशाला खंबीर नेतृत्वाची गरज असल्याचे प्रतिपादन करत आपल्या उमेदवारीचे प्रयोजन सांगत होते. निकाल सरळ सरळ दिसत होता - नेताजींचा पराभव. मात्र प्रत्यक्षात वेगळेच घडले. नेताजींना स्पष्ट मताधिक्याने सण्सणीत विजय मिळाला. पट्टाभी यांना १३७५ तर नेतजींना १५८० मते मिळाली होती. पट्टाभींना पुढावा मिळाला तो गांधींच्या जनम्स्थान गुजरातेत, स्वत:च्या आंध्र प्रदेशात व डॉ. राजेंद्र प्रसादांच्या बिहारात. महाराष्ट्रात समविभागणी होती तर पंजाब, ह्बंगाल, दिल्ली, मद्रास, केरळ, कर्नाटक, आसाम प्रांतात नेताजींना कौल मिळाला. गुजरातेत पट्टाभींना १०० तर नेताजींना केवळ पांच. पंजाबात पट्टाभींना ८६ तर नेताजींना १८२, बंगाल मध्ये तर पट्टभींना ७९ आणि नेताजींना ४०४! एकूण राष्ट्राचा कौल नेताजींच्या बाजून होता.

netaji gandhi

गांधींना हा वैयक्तिक पराभव वाटला व त्यांनी एकिकडे बाहेर पडण्याची भाषा केली तर दुसरीकडे नेताजींवर आगपाखड करायला सुरुवात केली. नेताजी फॅसिस्ट असल्याचे काही कॉंग्रेसजन पसरवु लागले. नेताजी हे गांधींना आव्हान देत असून त्यांची वाटचाल सर्वनाशाकडे होत असल्याच्या अपप्रचाराला उत आला होता.

मात्र नेताजींचे चित्त थाऱ्यावर नव्हते. दुसऱ्या महायुद्धाचे ढग जमु लागले होते. त्या युद्धाच्या वणव्यात नेताजींना दिसत होता हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा मार्ग.



आझाद हिंद सेना ३- नेताजी


नेताजी सुभाषचंद्र बोस. हिंदुस्थानातील सशस्त्र क्रांतिकारकाचे शिरोमणी आणि स्वातंत्र्याचे विधाते. स्वातंत्र्यवीर सावरकरांची अभिनव भारत हा क्रांतिदेवतेच्या मंदिराचा पाया, सचिंद्रनाथ संन्याल यांनी स्थापन केलेली व पुढे हुतात्मा भगतसिंह यांनी पुनरुज्जीवित केलेली हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्ताक सेना हा त्या मंदिराचा गाभारा तर नेताजी व राशबिहारींची आझाद हिंद सेना हा त्या मंदिराचा कळस आहे. या मंदिराला गदर, युगांतर, अनुशीलन, नौजवान भारत सभा हे व यासारखे असंख्य खांब आहेत, ज्यावर ते उभे राहिले.

एका खानदानी कुटुंबात, सुशिक्षित घराण्यात व संपन्न अशा घरात कटक येथे जानकीबाबु व प्रभावती यांच्या पोटी सुभाषचंद्रांनी जन्म घेतला. family

जानकीबाबू, मेजदा, प्रभावतीदेवी, विभावरीभाभी

janmasthan नेताजींचे कटक येथील जन्मस्थान

बालपण कटकला कॉन्वेण्ट शाळेत गेलेले सुभाष पुढील शालेय शिक्षणासाठी कलकत्त्यात रॅवेन्शॉ कॉलेजिएट शाळेत द्दाखल झाले. आणि इथेच नेताजींच्या जीवनाला कलाटणी मिळाली. चंद्रनगरचे राशबिहारी येऊन गेले, त्यांना काही मुले भेटली, हल्ली तुमचा सुभाषही वाईट संगतीत असतो अशा तक्रारी कानावर आल्याने चिंताक्रांत झालेल्या जानकीबाबूंनी एकदा हळूच मुलाच्या पुस्तकाचे कपाट उघडले आणि त्यांत पाहायला मिळाली ती लाला हरदयाळ यांच्या गदर पक्षाची भित्तिपत्रके:

पाहिजेत : हिंदुस्थानात लष्करी बंड घडवून आणण्यासाठी जवॉंमर्द शिपाई

वेतन : मृत्यू

बक्षीस : हौतात्म्य

निवृत्ती वेतन: आझादी

रणांगण : हिंदुस्थान

आपल्या मुलाचे प्रताप पाहून वडील हादरले. खरेतर सुभाषने राशबिहारींच्या निधीसाठी २०० रुपये दिल्याने गुन्हाच दाखल व्हायचा पण वडिलांचे वजन व संबंध यामुळे ते टळले मात्र अंमलदाराने इशारा दिला. पुढे शालांत वर्षात राणीची प्रार्थना म्हणण्यास नकार दिल्याने छड्या मिळाल्या. प्रेसिडेन्सी महाविद्यालयात हिंदुस्थानीयांना अवमानकारक भाषा वापरणाऱ्या ओटेन नावाच्या प्राध्यापकास बंगाली मुलांनी भर महाविद्यालयात चोपला. सुभाष त्यांत नसले तरी ते या घटनेचे साक्षीदार होते. मात्र चौकशीत त्यांनी आपण यांत नसल्याचा व कुणी मारले हे माहीत नसल्याचाच घोषा लावला. अखेर झाल्या प्रकाराचा निषेध करण्याची मागणी केली गेली तेव्हा सुभाषने ठाम नकार दिला व त्याची हकालपट्टी केली गेली. तसाही या महाविद्यालयात अनुशीलन व युगांतरचे कार्यकर्ते विद्यार्थी म्हणून वावरत असल्याने सरकारचा दात होताच. आपण पुढे काय मार्ग अनुसरणार हे नेताजींनी तेव्हाच दाखवून दिले होते.

tarun bose

अर्थात कलकत्त्यात जन्माला आलेले मूल क्रांतिकारक होणे हे स्वाभाविकच होते. १९०८ साली कलकत्त्याच्या माणिकतल्ला येथे हिंदुस्थानातील पहिला संपूर्ण भारतीय बनावटीचा बॉम्बस्फोट यशस्वी झाला आणि बंगालच्या मुलांना पिस्तुलाच्या जोडीला बॉम्बं मिळाले. मुलेच काय, पण इथल्या मुलीही मागे नव्हत्या. कल्पना दत्त, प्रितीलता वड्डेदार, बीना दास, सावित्रीदेवी चक्रवर्ती, उज्ज्वला मुझुमदार, इंदुसुधा व शांतीसुधा घोष, पारुल मुखर्जी, लीला नाग, [रमिला गुप्ता, सुशीला दासगुप्ता, लावण्या दासगुप्ता, रेणू सेन.. अशी ही बंगालच्या क्रांतिकारकाची यादी न संपणारी होती. नुकत्याच ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे आयोजित स्वातंत्र्य संग्रामावरील प्रदर्शनाला गेलो असता, अंदमानच्या मानकऱ्यांपैकी तक्तेच्या तक्ते बंगालच्या नावांनी भरलेले पाहून मी बंगालपूढे नतमस्तक झालो. अशा या वाघांच्या देशात जन्मलेले आणि वाढलेले सुभाषचंद्र क्रांतीचे उपासक न बनते तरच नवल होते.

बऱ्याच उशीराने दाखल होऊनही इंग्लंडमध्ये आय सी एस ला चौथे येण्याचा पराक्रम करणारे नेताजी विलक्षण बुद्धिमान होते. त्यांचे वाचन अफाट होते. हिंदुस्थानात परत येण्यापूर्वीच त्यांनी सरकारी नोकरी ठोकरून स्वदेशी परतण्याचा निर्णय घेतला आणि ते परतण्यापूर्वीच नकारात्मक अहवाल मुंबईत पोचला.२२ एप्रिल १९२१ रोजी आपले नाव आय सी एस च्या यादीतून काढून टाकावे असा अर्ज देऊन ते थेट हिंदुस्थानला परतले. अर्थात त्यांचा पत्रव्यवहार हिंदुस्थानात अनेक कार्यकर्त्यांची सतत चालू होता. त्याचे अहवाल सरकारकडे गेलेच असतील. सुभाषबाबू मुंबईत येताच प्रथम थेट मणीभवनात गांधींच्या भेटीस गेले व त्यांनी पहिल्याच भेटीत आपली चाप पाडली. अर्थात त्यांनी गांधींचे शिष्यत्व पत्करले. पुढे ते कलकत्त्याला देशबंधूंच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते झाले. अनेक आंदोलने, अनेक चळवळी पार पाडताना व प्रत्यक्षात जवळून पाहताना त्यांच्या लक्षात आले की आता सद्य स्थितीत स्वातंत्र्य मिळण्याची सुतराम शक्यता नसून सशस्त्र क्रांती हा एकच मार्ग आहे जो आपल्या देशाला स्वातंत्र्याप्रत नेऊ शकेल. इंग्रज हे रक्तपिपासू साम्राज्यवादी असून त्यांच्यावर मानवतावादी उपायांचा परिणाम होण्याची शक्यता शून्यवत आहे.

मुळातच अत्यंत बुद्धिमान असलेल्या व इतिहास तसेच राजकारण यांचा अभ्यास असलेल्या सुभाषबाबूंनी सूक्ष्म निरीक्षण केले व असा निष्कर्ष काढला की स्वा. सावरकर व हुतात्मा भगतसिंह प्रभृतींच्या क्रांतीपद्धतीचा अभ्यास करता या देशाला आता संघटित सशस्त्र लढ्याची म्हणजेच लष्करी युद्धाची गरज आहे आणि त्यांनी हेही ओळखले की सध्या जनता ही अहिंसक नेतृत्वाच्या प्रभावाखाली असल्याने जनता, नेते या प्रयत्नात साथ देणे कठिण आहे, जनतेची साथ निश्चित असेल पण सुसंबद्ध लष्करी संघटना व सशस्त्र लष्कर निर्माण होणे दुरापास्त आहे. त्याचबरोबर नेताजींनी हेही ओळखले की ज्याच्या पासून साम्राज्याला आत्यंतिक धोका आहे अशांचा म्हणजेच स्वा. सावरकर, हुतात्मा भगतसिंह यांचा सरकार समूळ नायनाट करते व त्याला स्थानिक नेतृत्वाकडून विरोध होत नाही. देशात क्रांती घडवून आणण्यासाठी देशाबाहेरून लष्करी साहाय्याची गरज त्यांनी अचूक ओळखली. वीस वर्षांच्या वास्तव्यात अकरा वेळा भयानक हाल अपेष्टा देणारे पिचवून टाकणारे तुरुंगवास त्यांनी अनुभवले होते.

netaji cong2

हिजली सत्याग्रहा प्रकरणी त्यांना शिवणीच्या तुरुंगात डांबले तेव्हा त्यांना दुर्धर रोगाने ग्रासले. तुरुंगात निदान होईना व योग्य उपचार मिळेनात. त्यांना प्रकृतीसाठी देशाबाहेर युरोपात जाण्याचा वैद्यकीय सल्ला मिळाला. ८ मार्च १९३३ रोजी ते व्हिएन्ना येथे पोहोचले. मात्र उपचारा पेक्षा त्यांचे अन्य उपद्व्याप अधिक जोरात सुरू होते. त्यांचे उपद्व्याप व देश विदेशात असलेले लागेबांधे पाहता त्यांच्या पारपत्रावर इंग्लंड व जर्मनीत प्रवेश मनाईचा शिका मारण्यात आला होता. जर्मनी शत्रू राष्ट्र म्हणून तर इंग्लंडमध्ये अगोदरपासून असलेली चळवळ व क्रांतिकारकांचा राबता यामुळे ते तिथे जाणे सरकारला परवडणारे नव्हते. ते बरोबरच होते, लंडनला होणाऱ्या भारतीयांच्या राजकीय परिषदेचे अध्यक्षपद त्यांना देण्याचे घाटत होते मात्र बंदीमुळे केवळ त्यांचे भाषण वाचून दाखविण्यात आले. मात्र त्यांना इटली येथील रोम येथे होणाऱ्या 'ईतालिअन ओरिएंटल इंस्न्टिट्युट' च्या उद्घाटनाचे अधिकृत निमंत्रण मुसोलिनी सरकारकडून आले व त्याचा लाभ घेत ते मुसोलिनी, कौंट स्यानो यांना भेटून व आपल्या स्वातंत्र्यसंग्रामात हे कितपत उपयोगी पडतील याचा अंदाज घेऊन आले. याचे गुप्त अहवाल सरकारला मिळाले व त्यांच्यावरची नजर वाढली. याच काळात हिटलरने फ्रान्स व इंग्लंडच्या तोंडावर दोस्तीचा कुंचा फिरवल्याने त्यांना जर्मनीस जाण्याची अनुमती मिळू शकली. तिथे त्यांनी हिंदुस्थानी व आशियाई विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करू त्यांच्याशी जवळीक निर्माण केली. याच काळात नेताजींनी आपल्या राजकिय़ अनुभवांवर आधारीत 'द इंडियन स्ट्रगल १९२०-१९३४' हे पुस्तक लिहिले, ते लिहिण्यासाठी इंग्लंडच्या विशार्ट प्रकाशनाने त्यांचा पाठपुरावा केला व ते प्रकाशित केले. हे पुस्तक लिहिताना ते अनुभव तोंडी सांगत व त्यांची स्थानिक सहायिका एमेली शेंकेल ते टंकीत करीत असे. याच सुमारास त्या दोघांचे प्रेम जमले व ते विवाहबद्ध झाले.

EmilyJPGदरम्यान चिडलेला जुना व पुरलेला आजार, सतत दगदग , कुपथ्य यामुळे प्रकृती मात्र विशेष सुधारत नव्हती. त्यांना पित्ताशयाचा तसेच आतड्यांच्या वणांचा आजार होता. त्यावर शस्त्रक्रिया करावी की उपचार करावेत यावर दुमत होते. अखेर शस्त्रक्रिया झाली. नोव्हेंबर १९३४ मध्ये पित्याची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त समजल्याने ते परतीस निघाले, मात्र ते घरी पोचेपर्यंत पिता हे जग सोडून गेला होता.b crizJPG


त्यांना फार काळ तिथे राहायची परवानगी नव्हती. लगेच ते ह्विएन्नाला परतले. पुढील वास्तव्यात त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या, डब्लिन्मध्ये वॅलेरा याचीही भेट त्यांनी घेतली. पुन्हा एकदा मुसोलिनीची भेट घेतली व यावेळी तो जर भारतात हिंदी जनता सश्सत्र उठाव करेल तर मदतीस तयार असल्याचे त्याने नेताजीना सूचित केले. ८ एप्रिल १९३६ रोजी ते मुंबईंस परत पोहोचले, मात्र ते येणार ही बातमी लागताच गृहखात्याने त्यांना कोणत्या ना कोणत्या कलमान्वये इथे उतरताच अटक करण्याचे ठरविले होते. त्यांप्रमाणे त्यांना अटक झाली व त्यांची रवानगी येरवडा येथे केली गेली. मात्र पुढे प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना काही शर्तींवर दार्जिलिंग जवळ कर्सिऑंग येथे हालवून स्थानबद्धतेत ठेवण्यात आले. १७ मार्च १९३७ ला त्यांना अखेर मुक्त करण्यात आले. आता वेळ कमी होता. लढा सुरू करणे अत्यावश्यक होते. मधल्या ३-४ वर्षांत प्रकृतीच्या निमित्ताने त्यांना युरोपचे जवळून निरीक्षण करण्याची संधी लाभली व त्यामुळे राजकीय संबंध, एकंदर राजकीय परिस्थिती, लष्करी घडामोडी याचा बराच अभ्यास त्यांनी केला. हिटलरची राक्षसी महत्त्वाकांक्षा आज ना उद्या युद्धाचा भडका उडवणार याविषयी त्यांना खात्री पटली होती. आणि नेमक्या याच संधीची वाट ते पाहत होते. १९३९ चा सप्टेंबर उजाडला आणि महायुद्धाला तोंड फुटले. नेताजींनी नेहेरुंना गळ घातली की हाच क्षण आहे, आताच घाव घातला पाहिजे, हवे तर तुम्ही नेतृत्व करा, मी शिपाई होतो पण आताच आंदोलनाची हाक द्या. नेहेरूंना ते पटत असले तरी आपण बापूंचे नेतृत्व मान्य केले असून आता सर्वाधिकार त्यांचाच आहे असे उत्तर नेताजींना ऐकावे लागले. मग अखेर नेताजींनी प्रत्यक्ष गांधींचीच भेट घेतली, मात्र आपण या गोष्टीस अनुकूल नसल्याचे गांधींनी सांगितले. आता नेताजींना लढाई एकट्याने लढायची होती. इंग्लंड युद्धाच्या कात्रीत सापडले आहे तेव्हाच आपले स्वातंत्र्य मिळवले पाहिजे, एकदा ही संधी हुकली तर पुन्हा कधी येईल याचा भरवसा नव्हता.

पूर्वेत राशबिहारींनी संधान साधले होते. आत वेध घ्यायचा होता पश्चिमेचा.



आझाद हिंद सेना ४ - कात्रज, पन्हाळा, आग्रा...


नेताजींच्या संपूर्ण जीवनावर सातत्याने शिवचरित्राचा विलक्षण प्रभाव दिसून येतो. हुतात्मा भगतसिंहाप्रमाणे हा क्रांतिकारकही शिवभक्त असावा हा योगायोग म्हणायचा की गनिमी काव्याने मूठभर सैन्यानिशी भल्यामोठ्या सुसज्ज शत्रूसेनेला खडे चारणारा आणि स्वराज्यासाठी तमाम शत्रूंना आव्हान देणारा राजा शिवछत्रपती हा त्यांचा स्फुर्तिदाता आदर्श असावा? नेताजींच्या आयुष्यातले अनेक प्रसंग व त्यांचे गुण पाहता मला त्यांच्यात व शिवरायांमध्ये विलक्षण साम्य दिसते. ज्या वयात शिवाजीराजांनी स्वराज्याचा ध्यास घेतला त्याच वेळी नेताजींनाही तोच ध्यास होता. शौर्याच्या जोडीला असामान्य मुत्सद्दीपणा, सावधपणा, शत्रूचा बारीक अभ्यास, दूरदृष्टी, दूरगामी व्यवस्थापन, उत्तम प्रशासन, माणसांना जमविण्याची, जोडण्याची आपल्या जिवाला जीव देणारे साथी बनवण्याची कला, देशाच्या व रयतेच्या हिताखातर वाघाच्या गुहेत जाण्याची हिंमत, महासत्तेच्या दरबारात देखिल स्वाभिमानाचे प्रदर्शन, एक की अनेक, अशी असंख्य साम्यस्थळे दोघांच्या चरित्रात दिसून येतात. नेताजींनी प्रख्यात इतिहासकार श्री. जदुनाथ सरकार यांचे शिवचरित्र बारकाईने अभ्यासले होते. त्यांच्या अखेरच्या म्हणजे एकूण अकराव्या तुरुंगवासात - अलिपूर येथील तुरुंगात त्यांनी हा ग्रंथ मुद्दाम मागवून घेतला व त्याचे अनेकानेक पारायणे केली. श्री. जदुनाथ सरकार हे सुप्रसिद्ध इतिहासकार. ते खरे इंग्रजीचे प्राध्यापक, पण त्यांना इतिहासाची विलक्षण गोडी. त्यांनी हिंदुस्थानातील मुघल राजवट व खास करून औरंगजेबावर प्रचंड संशोधन करून पाच खंडात आपला ग्रंथ प्रसिद्ध केला. तसेच त्यांनी शिवाजीराजांवर संशोधन करून ग्रंथ लिहिला, त्यात विशेषतः: राजांची राज्यपद्धती, प्रशासन, युद्धशास्त्र व काटेकोर नियोजन याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केले होते. हेच सरकार महाशय नेताजी विद्यार्थी असलेल्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयात प्राध्यापक, म्हणजे अप्रत्यक्षरीत्या त्यांचे गुरूच होते.

हा तुरुंगवास म्हणजे साक्षात शिवरायांचा 'कात्रज' होत; कसा ते पुढे येईलच. इंग्रजी सत्तेच्या जागत्या पहाऱ्यातून सहीसलामत निसटून जाणे, त्यासाठी आजारपण, वैराग्याचे सोंग, सुटका झाल्यावर कसे आणि कुठे जायचे ह्यात उघड उघड आग्र्याहून सुटकेची पुनरावृत्ती आहे. अफगाण सरहद्दीवरची ऑक्सस नदी ओलांडून रशियात गुपचुप शिरण्यासाठी अच्चरसिंग चीना व अक्रमखान यांच्यावर वाटा शोधून काढण्याची दिलेली व त्यांनी चोख पार पाडलेली कामगिरी म्हणजे तर पन्हाळ्याचा वेढा फोडून जाण्यासाठी चोरवाटा शोधण्याचा आधुनिक अवतार. पन्हाळ्याचा वेढा चुकवून निसटल्यावर पालखी भलतीकडे पाठवून पाठलागावरच्या शत्रूची दिशाभूल करून स्वतः: निर्दिष्टीत मार्गाने जाणे आणि कलकत्त्यातून पसार झाल्यावर सरकारला हिंदुस्थानच्या तमाम गोसावी- संन्याशांची चौकशी करवत ठेवत, सरहद्दीची नाकाबंदी करवणे व आपण त्या आधीच पार होणे यात फरक काय? शिवराय आग्र्याला गेलेले असतानाही इकडे कारभार चोख होता तद्वत नेताजींच्या साथीदारांच्या कारवाया व पूर्वेशी संधान ते पसार झालेले असतानाही सुरूच होते. फार काय शिवरायांच्या पश्चात त्यांचा प्रत्येक किल्ला औरंगजेबाशी अखेरपर्यंत लढला तसेच आझाद हिंदचे वीरही नेताजींच्या पश्चात त्यांच्या नावे जयजयकार करीत ताठ मानेने शत्रूला आव्हान देत लाल किल्ल्यावर गेले व त्यांनी जनतेत प्रचंड चेतना निर्माण केली जिची धग सरकारला सहन होण्यासारखी नव्हती.

नेताजींनी पश्चिमेकडेच जायचा निश्चय केला होता. एक तर पूर्वेकडे बऱ्यापैकी तयारी होती, राशबिहारींनी संघटना बांधत घेतली होती, दक्षिण पूर्व आशियातील भारतीय जनता एकवटत होती. आता पश्चिमेकडून अक्ष राष्ट्रांना आपल्या राष्ट्राला पाठिंबा उघडपणे घेऊन, स्वतंत्र भारताला एक राष्ट्र म्हणून मान्यता प्राप्त करून घेऊन इंग्रजांना पूर्व आणि पश्चिम अशा दुहेरी कोंडीत पकडायचा त्यांचा डाव होता. मुळात रशियाकडून साहाय्य मिळेल अशीही त्यांना आशा होती आणि जपान वा जर्मनीपेक्षा तो देश भौगोलिकदृष्ट्या अधिक जवळ होता. क्रांतिवादी रशिया आपल्या स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देईल असा त्यांचा कयास होता. अर्थात महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर क्षणाक्षणाला राजकारणाचे रंग बदलत होते. आपल्या प्रयाणाचे पद्धतशीर प्रयत्न नेताजींनी जवळपास दीड वर्ष अगोदर सुरू केले होते. सर्वप्रथम आपले सहकारी लाला शंकरलाल यांना त्यांनी जपानला जाण्याचा परवाना मिळवून देऊन पुर्वेच्या मोर्चेबंदीसाठी रवाना केले.

३ सप्टेंबर १९३९. मद्रासच्या विशाल समुद्रकिनाऱ्या वरच्या सभेत नेताजींनी पुनरुच्चार केला, "इंग्रजरूपी सापाला जर गांधी अहिंसेचे दूध पाजत असतील तर ते अवश्य तसे करोत. मी मात्र या सापाचा फणा ठेचणार आहे, भले तो मला डसला तरी हरकत नाही". दोन लाखाचा जनसागर बेभान होवून टाळ्या वाजवत होता. इकडे जर्मनीने पोलंड्वर आक्रमण करून युद्धाला सुरुवात केल्याची बातमी आली होती. हीच वेळ, हीच संधी. नेताजीचा निश्चय दृढ होता. घरी आले आणि लगेचच नेताजींना भेटायला कलकत्त्याचे 'दर्पण' या लोकप्रिय पंजाबी मासिकाचे संपादक श्री निरंजन तालीब आले. त्यांच्या बरोबर एक पाहुणा होता. अच्छरसिंग चीना! प्रसिद्ध कीर्ती किसान पक्षाचे कार्यकर्ते. या माणसाचे अफगाण सरहद्दीवर जाणे येणे होते, तो मुलुख आणी ते रस्ते त्याच्या परिचयाचे होते. नेताजींनी आपली अफगाण सरहद्दीतून ऑक्सस नदी ओलांडून रशियात पसार होण्याची मनीषा बोलून दाखविताच, चीना खुशीने कबूल झाले व त्यांनी वाटाड्या म्हणून आपला विश्वासू साथी भगतराम तलवार याला देण्याची हमी दिली. नेताजींनी देशाबाहेर जावे असा सल्ला स्वातंत्रवीर सावरकरांनीही दिला होता, तोच सल्ला नेताजींना पुन्हा एकदा त्यांचे सहकारी निहारेन्दु दत्तमुझुमदार यांनी देत डॉ. सन्यत सेन, मॅझिनी यांचे दाखले दिले.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर नेताजी इंग्रजांना भयंकर सलत होते. नेताजी ही आता डोकेदुखी ठरणार हे सरकारला स्पष्ट दिसत होते. नेमक्या याच वेळी नेताजींनी चीन भेटीचा परवाना मिळण्यासाठी अर्ज केला. ही आपल्या गळ्यातली ब्याद दूर जाते आहे या विचाराने खूश झालेल्या राज्यपाल हरबर्ट यांनी मोठ्या खुशीने अर्जावर शिफारस केली आणि तो वर पाठवला. मात्र लॉर्ड लिनलिथगो यांच्या तळपायाची आग तो अर्ज पाहून मस्तकाला गेली. राज्यपालांची त्यांनी दूरध्वनीद्वारे चांगलीच कान उघडणी केली. आपला लंगडा बचाव करत हर्बर्ट यांनी नुकतेच नेहेरु सुद्धा जाऊन आल्याचा दाखला देताच संतापलेल्या व्हॉईसरॉय यांनी त्यांना सुनावले की हे नेहेरू नव्हेत! एकदा चीनला गेले की चीनच्या सीमा रशियाला भिडलेल्या आहेत हे विसरून चालणार नव्हते. अर्ज नामंजूर झाला. याच सुमारास कबूल कंदाहाराकडची काही माणसे नेताजींना भेटून गेली. तिकडे जपान वकिलातीत खेपा चालूच होत्या, काही ठाम संकेत येत नव्हत, अखेर दूतावासानेच भडकलेल्या पश्चिमेकडे जाऊन आश्रय घेण्याचा सल्ला दिला. सरकारची पाळत तर होतीच. या दरम्यान अचानक सहकारी सत्यरंजन बक्षी एक दिवस अचानक एक अत्यंत मोलाची कामगिरी पार पाडून आले. त्यांनी काही अत्यंत गोपनीय सरकारी उच्चस्तरीय कागदपत्रे आणली होती. त्यात अगदी थेट लंडनपासूनचे नेताजींचे अहवाल होते. सुदैवाने सरकारचा नेताजींना तातडीने गिरफ्तार करायचा विचार त्यातून तरी दिसत नव्हता. म्हणजे वेळ होती तर. मात्र कसे कुणास ठाऊक, पण एक दिवस कलकत्ता पालिकेचे अभियंते डॆ आणि त्यांचा पुतण्या त्यांच्या भेटीला आले व त्यांनी सांगितले की त्यांना डॉ. बलदेवसिंह यांच्याकडून असे समजले की नेताजी रशियाला जाणार आहेत. वरकरणी त्यांना झटकून टाकले तरी या बभ्र्यामुळे नेताजी अस्वस्थ झाले. त्यांनी त्वरित बाहेर निसटाचा बेत स्थगित केले, कारण आता सरकार सावध असणार हे उघड होते.

अचानक ३ जुलै १९४० रोजी आपण हॉलवेल स्मारकाचे आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा केली. हतबुद्ध झालेल्या मेजदांनी आपल्या सुभाषला संतप्त सवाल केला, की सरकार कोणत्या कायद्या अन्वये आत टाकता येईल याचा विचार करत असताना तुरुंगात डांबायची अशी संधी सरकारला सहज उपलब्ध करून देण्याचे कारण काय? नेताजी काहीच बोलले नाहीत, मात्र हा अस्मितेचा प्रश्न असून आपण आंदोलन करणारच असे त्यांनी सांगितले. सिराजौद्दौल्याने काही इंग्रज शिपायांना पकडले व कोंडून घातले, त्यांत अनेक गोरे शिपाई मरण पावले. हॉलवेल सुदैवाने बचावला होता व त्याने शौर्याचे प्रतीक म्हणून ते स्मारक डलहौसी चौकात बांधले अशी कथा होती. ती अनेकांना साफ कपोलकल्पित वाटत होती. मात्र लॉर्ड कर्झनने या स्मारकाचा आवर्जून जीर्णोद्धार केला. इंग्रजांच्या दृष्टीने ते अस्मितेचे तर फाळणीच्या अटटाहासाने संतापलेल्या बंगाली जनतेच्या दृष्टीने ते साम्राज्यवादाचे प्रतीक होते. नेताजींनी हे स्मारक हटवण्यासाठी आंदोलनाची घोषणा करताच २ जुलै म्हणजे नियोजित आंदोलनाच्या आदल्या दिवशी नेताजींना अटक करण्यात आले. ठरल्याप्रमाणे ३ तारखेला फॉरवर्ड ब्लॉकच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले. सुमारे १५० आंदोलकांना अटक केली गेली. पुढे २३ जुलै रोजी ते स्मारक हालवण्याचे सरकारने जाहीर केले. अटकेत असलेल्या सर्वांना सोडून देण्यात आले - नेताजीखेरीज. १८ एप्रिलचे महंमद अली उद्यानातले प्रक्षोभक भाषण, १८ मे चा फॉरवर्ड ब्लॉकच्या अंकातील लेख असे नाना आरोप ठेवून नेताजींना गजा आड केले गेले. तुरुंगात असतानाच विधिमंडळाची एक खासदारकीची जागा रिक्त झाली व नेताजींनी त्या जागेसाठी तुरुंगातूनच अर्ज भरला आणि ते बिनविरोध निवडूनही आले. नेताजी तुरुंगात असल्याने सरकार निर्धास्त होते. हेच ते नेताजींचे 'कात्रज'. खरे तर हॉलवेल स्मारक नामे शिळ्या कढीला ऊत आणायची अर्थोअर्थी काहीही गरज नव्हती. मग अटक होणार हे माहीत असताना देखिल नेताजींनी आंदोलन का छेडले? हा तर चक्क सरकारला बेसावध ठेवायचा, सरकारचे लक्ष भलतीकडे वेधायचा प्रयत्न होता.

३० ऑक्टोबर रोजी नेताजींनी थेट गृहमंत्र्यांना पत्र लिहुन कळविले की मी खासदार झालो आहे आणि मला प्रकृती बरी असल्यास संसदेच्या कामकाजात भाग घ्यायचा आहे. आपल्याला व काही मुसलमान राजकीय कैद्यांना मिळवणाऱ्या वागणुकीत भेदाभाद असल्याची तक्रार त्यांनी गृहमंत्र्यांकडे केली. अखेर २६ नोव्हेंबरला त्यांनी बंगालचे राज्यपाल, गृहमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सर्व सदस्यांना पत्र लिहिले की माझ्या स्वातंत्र्यावर आलेल्या घाल्याच्या निषेधार्थ मी आमरण उपवास करणार आहे. तुम्हाला भले त्याने फरक न पडो, पण माझे हे पत्र माझे 'राजकीय मृत्युपत्र' म्हणून जपून ठेवा, म्हणजे भविष्यात राज्यावर आलेल्या माझ्या देशबांधवांना ते उपलब्ध होईल. याच पत्रात त्यांनी बहुमोल संदेश दिला होता

"राष्ट्र जगावं म्हणून व्यक्तीने मरावं. भारताने जगावं आणी त्याला स्वातंत्र्य व गतवैभव प्राप्त व्हावं म्हणून आज मला मृत्यूला मिठी मारलीच पाहिजे.माझ्या देशबांधवांना मी सांगेन की गुलामी राहणे हा सर्वात मोठा शाप आहे हे कधीही विसरू नका.अन्यायाबरोबर तडजोड करणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे हे विसरू नका. चिरंतन सत्य लक्षात ठेवा. तुम्हाला आयुष्य पुन्हा हवे असेल तर तर तुम्ही ते अर्पण केले पाहिजे.अन्यायाविरुद्ध, विषमतेविरुद्ध झुंजणे हा सर्वात मोठा सद्गुण आहे. त्यासाठी कितीही किंमत मोजायला लागली तरी ती द्यायला हवी हे ध्यानात ठेवा.

परिस्थिती खालावत होती, तब्येत अधिकाधिक क्षीण होत होती. आणि नेताजींचा मृत्यू सरकारला परवडणारा नव्हता. अखेर ५ डिसेंबर १९४० रोजी त्यांना तुरुंगातून सोडून घरी नजरकैदेत ठेवण्यात आले. घरी आल्यावर नेताजी कुणाला भेटेनात. तब्येत खराबच होती. बाहेर पोलिस व गुप्तचरांचा खडा पहारा होताच. एक दिवस त्यांना भेटायला मियॉं अकबरशाह आले. ते निघाले, त्यांना सोडायला नेताजींनी पुतण्या शिशिर याला पाठवले. अकबरशहांना पेशावरला तातडीने जायचे होते. त्यांना स्थानकावर सोडायला सांगितले. वाटेत त्यांना काही खरेदी करायची आहे, ती करून द्या असेही सांगितले. मात्र स्थानकावर सोडल्यावर अचानक चालकाच्या लक्षात आले की खान साहेब खरेदी केलेली फैज टोपी, लांब लेंगे, पायघोळ अंगरखे वगैरे गाडीतच विसरून गेले होते. ते आपण मग पाठवून देऊ असे शिशिरने चालकाला समजावले. दरम्यान 'महंमद झियाउद्दीन', आयुर्विमा प्रतिनिधी, पत्ता 'सिविल लाइन्स' अशी काही व्यवसायपत्रेही शिशिरने छापून आणली होती. एव्हाना नेताजींनी घरच्यांना जवळ बोलावून आपण संन्यास घेणार असून लवकराच आपण अन्न-पाण्यावाचून ध्याना बसणार असल्याचे सांगितले. दरम्यान राम किशन व चीना हे भगतरामच्या घरी गेले व त्याला एक बडा नेता काबूल मार्गे रशियाला जाणार असल्याची गुप्त बातमी सांगितली. त्यावेळी काबूलमध्ये बाबा गुरुमुखसिंहांना अटक झाली होती. मात्र त्यांचा विश्वासू सहकारी अबदखान यांनी साहाय्य करण्याचे मान्य केले. मालवाहतुकीच्या व्यवसायामुळे त्यांना डोंगराळ भागातल्या वाटा माहीत होत्या.

दि. १६ जानेवारी १९४१. बोसांच्या मोटारीत गुपचुप एम. झेड. अशी अक्षरे ठसवलेल्या सामानाच्या दोन पेट्या ठेवल्या गेल्या. रात्रीचा दिडचा सुमार. १६ संपून १७ जानेवारी सुरू झाला होता.सगळीकडे सामसूम असताना महंमद झियाउद्दीन साहेब शिशिर बरोबर वॉंडरर मोटारीतून बाहेर पडले. आधी जरा उलट सुलट फिरून सकाळी ९ च्या सुमारास मोटार धनबाद जवळच्या बरारी खेड्यात आली. शिशिर आणि महंमदसाहेब शिशिर्चे बंधू अशोक यांच्या घरी आले. जेवण झाले, दिवसभर विश्रांती झाली. रात्री मंडळी गोमोह स्थानकात आली, व पहिल्या वर्गाचे तिकिट काढून काल्का-दिल्ली मेलने रवाना झाले. खानसाहेब १९ जानेवारी रोजी पेशावरला सुखरूप पोहोचले.

पिंजरा रिकामा पडला होता, पक्षी कधीच उडून गेला होता. २६ जानेवारी रोजी बोस कुटुंबीयांनी नेताजी अचानक गूढ रितीने गायब झाल्याचे अधिकृत वृत्त जाहीर केले. बातमी ऐकून उभा हिंदुस्थान मोहरून गेला. सारे जग हादरले. त्या सुमारास इथे महाराष्ट्रात 'उडाला सुभाष राघूपरी' असे गाणे फार लोकप्रिय झाले अशी आठवण माझी आजी नेहमी सांगत असे.

sutake aadhi

नेताजींचे घरून पसार होण्या आधीचे अखेरचे प्रकाशचित्र, डिसेंबर १९४०.

सोबत आहेत ते मेजदा आणि मातोश्री.



आझाद हिंद सेना ५ - पूर्वरंग


नेताजी देशाबाहेर निसटले व पश्चिमेला गेले, त्यात त्यांचा जर्मनीकडून मदत मिळविणे हा हेतू तर होताच पण जपान - जर्मनी मैत्रिपूर्ण संबंधाचा अचूक फायदा उठवीत जर्मनीद्वारे जपानकडून अधिकाधिक साहाय्य मिळविणे हा तितकाच महत्त्वाचा दुसरा हेतू होता. जरी अफगाण सीमेवरून आग्नेयेच्या दिशेने हिंदुस्थानची सीमा अक्ष राष्ट्र सैन्याच्या साहाय्याने गाठायची व दोन दिशांनी शत्रूला कोंडीत पकडाचे हे गणित असले आपले खरे युद्ध आपण घरा पलीकडील अंगणात खेळत इशान्ये कडून देशात बाहेरून आंत असे सीमोल्लंघन करणार हे नेताजींना अभिप्रेत होते. नेताजी व पूर्वेकडील भारतीय स्वातंत्र्यलढ्याला वाहून घेतलेले क्रांतिकारक यांच्यात अनेक मर्यादांमुळे तुटक असला तरी संवाद होता, एकमेकाची चाहूल घेतली जात होती. एकदा तर जपानहून राशबिहारी बोस यांनी घाडलेले एक पत्र कलकत्ता पोलिस प्रमुख टेगार्ट याला गुप्तचरांनी आणून दिले होते. ते जप्त केले नाही याचे कारण त्याने असे सांगितले की हे भयंकर लोक अनेक नावांनी अनेक पत्त्यांवर अशी पत्रे एकाच वेळी पाठवतात, एखादे जप्त केले तरी दुसरी मिळतीलच, तेव्हा हे पत्र न पकडता पोचू देणे व लक्ष ठेवणे हेच उत्तम. म्हणजेच नेताजींचा पूर्वेला संपर्क होता हे निश्चित. पुढे नेताजी देशाबाहेर जाऊन जर्मनीत प्रकट झाल्याचे रेडिओ बर्लिनवरून ऐकताच पूर्वेत राशबिहारी, प्रीतमसिंह यांना जो आनंद झाला त्यावरूनही पूर्वेने नेताजींना मनोमन आपला नेता म्हणून स्वीकारले होते हे स्पष्ट आहे. नेताजी जर्मनीत गेले तेव्हा इकडे पूर्वेला काय परिस्थिती होती त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न या लेखात केलेला आहे.

राश बिहारी बोस म्हणजे साक्षात क्रांतिकारकांना क्रांतिपथ दाखविणारा प्रकाशमान तारा. दिल्लीत २३ ऑक्टोबर १९१२ ला व्हॉईसरॉयच्या मिरवणुकीवर बोंब टाकल्यावर हाहाःकार उडाला. जुलूम, फितुरी या तंत्राने या कटातले मास्टर अमिरचंद, अवध बिहारी, बालमुकुंद हे दिलीत फासावर जात हुतात्मे झाले तर बसंतबिस्वास अंबाल्यात हुतात्मा झाला. मात्र या मागचा मेंदू व सक्रिय सहभागी असलेले राशबाबू मात्र सरकारला जाम सापडले नाहीत. हा मनुष्य कसलेला नट व बहुरूपी असल्याचे इंग्रज अधिकारी सांगत. नाना भाषा, नाना वेष यामुळे राशबाबू सरकारच्या डोळ्यात धूळ फेकून पंजाब, बंगाल, उत्तर प्रदेश असे लपाछपी खेळत होते. एकदा तर ते असलेल्या इमारतीला पोलिसांनी घेरल्यावर ते डोक्यावर मैला घेऊन मेहतराच्या वेषात तर एकदा तिरडीवरून हारात गढलेले प्रेत बनून ते पसार झाल्याच्या दंतकथा प्रसिद्ध होत्या. राशबाबू १९१३ साली अमेरिकेत स्थापन झालेल्या गदर उत्थानाच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आले व त्यांनी क्रांतिरत्न हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे, कर्तारसिंह सराबा, सोहनसिंह भकणं यांच्या साहाय्याने बनारस येथे लष्करी छावणीवर हल्ला चढवून सशस्त्र उठाव करायचा असा बेत नियोजित केला. मात्र कृपालसिंह नावाच्या फितुरामुळे तो फसला व अटक होऊन क्रांतिरत्न हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे, कर्तारसिंह सराबा, सोहनसिंह भकणं व त्यांचे अनेक सहकारी यांनी हौतात्म्य पत्करले. मात्र याहीवेळी ही राशबाबू सुखरूप निसटले. त्यांचे खास सहकारी सचिंद्रनाथ संन्याल यांनी पुढे हिंदुस्थान प्रजासत्ताक संघटना ही क्रांतिसंघटना स्थापन केली. अखेर असा लपंडाव इथे खेळत राहून काहीच साध्य होणार नाही हे ओळखून त्यांनी आपला रोख पूर्वेला वळवला. बॅंकॉक, मलाया, सिंगापूर येथे असलेले हिंदुस्थानी, त्यांचा स्वातंत्र्यासाठीचा प्रयत्न यामुळे ते प्रेरित झाले असावेत. (पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान सिंगापुरात इंग्रजांना मारून तिथे राज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला होता). जाण्याचा निश्चय होताच खटपटीने 'राजा पी. एन. टी. टागोर' या नावे प्रवास परवाना मिळवून व कागदोपत्री रविंद्रनाथ टागोरांचे दूरचे नातेवाईक असल्याची बतावणी करून राश बाबू १२ मे १९१५ रोजी बोटीवर चढले व २२ मे रोजी सिंगापुरात दाखल झाले व तिथून पुढे ५ जून रोजी जपानच्या कोबे बंदरात उतरले. पोहोचले.

जपानला त्यांची गाठ हेरंबला गुप्ता व भगवान सिंह या दोन गदर क्रांतिकारकांशी पडली. त्या काळात ब्रिटन व जपान मैत्रीचे संबंध असल्याने इंग्रज जपान मधल्या भारतातून परागंदा होऊन आलेल्या क्रांतिकारकांवर लक्ष ठेवून होते व त्यांना हस्तांतरित करण्यासाठी जपानचा पिच्छा पुरवीत होते. हेरंबलाल अमेरिकेला निघून जाण्यात यशस्वी ठरले. इकडे राश बिहारी यांनी पाठलाग चुकवून आपले वास्तव्य गुप्त राखण्यासाठी १७ वेळा आपले राहण्याचे ठिकाण बदलले. देशासाठी काहीतरी करण्याची दुर्दम्य इच्छा असलेल्या राशबिहारींची गाठ योगायोगाने पडली ती चीनच्या डॉ. सन्यतसेन यांच्याशी. खिशात रविंद्रनाथांचा सचिव असल्याचे ओळखपत्र, मनात देशप्रेम आणि कानांत फासावर गेलेल्या क्रांतिकारक साथीदारांचे शब्द "राशभाई, क्रांतीचा ध्वज फडकत ठेवा' या पलीकडे दुसरे काही नसलेल्या आणि अनोळखी भाषा, अनोळखी लोक असलेल्या जपान मध्ये येऊन ठाकलेल्या या विलक्षण तरुणाबद्दल डॉ. साहेबांना अत्यंत आत्मीयता वाटू लागली व मग डॉ. त्यांना मित्सुरू टोयामो यांच्याकडे घेऊन गेले. वयोवृद्ध असलेले मित्सुरू म्हणजे आशियातील क्रांतिकारकांचे भीष्माचार्य. आपल्याला परमपूज्य असलेला बुद्ध ही हिंदुस्थानची देणगी मानणाऱ्या मित्सुरूंचा हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यास पूर्ण पाठिंबा होता. त्यांच्या शब्दाला सरकारमध्ये व जनतेत वजन होते. मित्सुरूंनी तत्काळ राशबाबूंना आशीर्वाद देत आपले शिष्यत्व दिले व त्यांची राहण्याची सोय केली. राशबाबूंनी सोमा कुटुंबातील तोशिको या मुलीशी लग्न केले व ते जपानामध्ये जपानी नागरिक म्हणून स्थायिक झाले. आता इंग्रजांना त्यांना हात लावणे सोपे नव्हते, मुळात जपानी मुलीशी लग्न करण्यात त्यांचा उद्देश तोच होता. ते जपानी भाषा शिकले, व पत्रकारिता व लेखन करू लागले. काही वर्षांनी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. मात्र पत्नीशोकाने एकाकी झालेल्या राशबिहारींना हिंदुस्थानातील नव्या क्रांतिपर्वाची चाहूल लागली आणि ते तडफेने तयारीस लागले.

इकडे संपूर्ण दक्षिण-पूर्व आशियातील कामानिमित्त वा देशांतराने आलेली व स्थायिक झालेली हिंदुस्थानी जनता आता हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यसंग्रामासाठी सज्ज झाली होती. मलाया, फिलिपाईन्स, बँकॉक येथे चळवळीने जोर धरला होता. प्रितमसिंग हे १९३३ पासून बँकॉकमध्ये स्थायिक होते व त्यांच्यावर पोलिसांची नजर होती. बाबा अमरसिंग हे गदर कार्यकर्ते. १९१५ सालच्या अयशस्वी गदर उत्थाना नंतर ते २५ वर्षे कारावासाची सजा अंदमान व रंगून येथे भोगून १९४० साली सुटले. मंडाले तुरुंगात त्यांना नेताजींच्या सहवासाची संधी लाभली होती. सुटका होताच ते बॅंकॉक येथे आले व प्रितमसिंहांना भेटले. या दोघांनी 'इंडियन इंडिपेन्डन्स लिग' ची स्थापना केली. १९४० च्या डिसेंबरमध्ये राजद्रोहाच्या आरोपावरून हॉंगकॉंगच्या तुरुंगात सजा भोगत असलेले ३ हिंदुस्थानी क्रांतिकारक तिथून निसटले व कॅंटन येथील जपानी लष्करी अधिकाऱ्यांच्या साहाय्याने बॅंकॉकला आले व त्यांची भेट कर्नल तामुरा या जपानी अधिकाऱ्याशी झाली. तामुराने त्यांना प्रितमसिंगांच्या स्वाधीन केले.

१९४१ पासून मेजर फुजीवारा बँकॉक मधील प्रितमसिंगांच्या गुप्त संघटनेच्या साहाय्याने कार्यरत झाला. त्याच्यावर मलाया सिंगापूर येथील स्थायिक असलेल्या भारतीयानं तसेच ब्रिटिश लष्करातील हिंदी सैनिकांना जपानच्या पाठिंब्याने ब्रिटिशांविरुद्ध लढायला प्रवृत्त करायचे ही कामगिरी सोपविण्यात आली होती. एफ्. किकान - म्हणजे फुजिवारा किकान या संघटनेत १२-१५ जपानी सैन्याधिकारी होते. फुजिवारा यांनी मोहनसिंगांची भेट घेऊन वाटाघाटी केल्या व त्यांनी परस्परांशी सहकार्याचा करार केला. त्याच्या अटी अशा:
१) भारत व जपान ही दोन्ही राष्ट्रे समान दर्जाची व सार्वभौम असतील या दृष्टीने हा करार आहे
२)हिंदुस्थानला लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंडियन इंडिपेन्डन्स लिग इंग्लंडविरुद्ध सशस्त्र युद्ध करील व त्यात जपानने दिलेल्या सर्व मदतीचे स्वागत केले जाईल. मात्र भारतीय भूप्रदेशावर वा कोणत्याही भागावर जपान आपला हक्क सांगणार नाही किंवा जिंकण्याची अभिलाषा बाळगणार नाही. जपान भारताच्या अंतर्गत राजकीय, आर्थिक, लष्करी, सांस्कृतिक वा धार्मिक स्वरूपाच्या बाबतीत कोणताही हस्तक्षेप करणार नाही.
३)धर्म, वंश, जात वा राजकीय विचारप्रणाली याबाबत कोणताही भेदभाव न करता सर्वांना इंडियन इंडिपेन्डन्स लिग सामावून घेईल, फक्त सामील होणाऱ्याच्या मनात इंग्रजांविरुद्ध लढायची तीव्र इच्छा असली पाहिजे.
४)इंग्लंड आणि जपान यांच्यात युद्ध पेटले की इंडियन इंडिपेन्डन्स लिग जपानी सैन्यासोबत दक्षिण थायलंड व मलायाकडे कुच करेल. ब्रिटिश सैन्यातले हिंदी सैनिक तसेच मलाया, थायलंडमधील भारतीय यांच्यातूनच 'आझाद हिंद फौज' उभारण्यात येईल. जपानने जिंकलेल्या भूप्रदेशात आझाद हिंदच्या सैनिकांना मुक्तपणे फिरता येईल व जपानी सेना त्यांना बंधुभावाने वागवेल.
५) इंडियन इंडिपेन्डन्स लिगला टोकियो,बॅंकॉक तसेच मलयांतील शहरातल्या नभोवाणी केंद्रातून कार्यक्रम प्रक्षेपित करता येतील.
६) प्रितमसिंगांच्या मागणीनुसार त्यांना जपान अर्थ, शस्त्र तसेच अन्य सामग्री उपलब्ध करून देईल.
७) जपानचे लष्करी अधिकारी इंडियन इंडिपेन्डन्स लिगचे नेते आणि जर्मनीत असलेले नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यात संपर्क साधण्यास मदत करतील.


आझाद हिंद सेना ६ - जर्मनीत आगमन


नेताजींचे आयुष्य हा सर्वार्थाने आणि सातत्याने एक संघर्ष होता. नजरकैदेतुन इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन निसटलेले नेताजी प्रथम पेशावरला आले. तिथे अकबरमिया हजर होते. पेशावरात फार दिवस न काढता नेताजी मजल दरमजल करत अनेक हाल अपेष्टाना तोंड देत अखेर काबुलमध्ये पोहोचले. talwarत्यांच्या बरोबर भगतराम तलवार सावलीसारखा होता. रस्ता कितीही खडतर असला तरीही लवकरात लवकर त्यांना हिंदुस्थानची सरहद्द ओलांडायची होती, आपण ज्या कार्यासाठी देश सोडुन निघालो आहोत ते पूर्ण न होता शत्रूच्या हातात पडु नये यासाठी त्यांच्या जीवाची तगमग सुरू होती. अखेर एकदाचे काबुल गाठले. बर्फाने आच्छादलेले उजाड डोंगरसुद्धा त्यांना सुंदर भासत होते कारण ते इंग्रजांचे अंकित नव्हते. मात्र काबुलमध्ये पावला पावलावर धोका होता. प्रत्येक उतारुकडे संशयाने पाहिले जात होते. आपले अस्तित्व लपवण्यासाठी नेताजींना अत्यंत खबरदारी घ्यावी लागणार होती. अखेर भगतरामने आपल्या जुन्या साथीदाराला साद घालायचे ठरवले. तो साथिदार म्हणजे उत्तमचंद मल्होत्रा. हुतात्मा भगतसिंहाच्या काळातच तुरुंगवास सोसून बाहेर पडलेला उत्तमचंद काबूलमध्ये स्थायिक झाला होता, त्याचे काचसामान व रेडिओ दुरुस्तीचे दुकान होते. काळाबरोबर माणसे व त्यांचे विचार व तत्त्वेही बदलतात हे कटु सत्य माहीत असलेल्या भगतरामने आधी चाचपणी केली. आपण एका हिंदुस्थानी क्रांतिकारकाला घेऊन आलो आहोत आणि तो लवकरच रशियाला जाणार आहे, तेव्हा आपल्याला त्याच्यासह आसरा देण्याची गळ घातली. उत्तमचंदाने गमतीत विचारले की तो क्रांतिकारक म्हणजे सुभाषचंद्र बोस तर नव्हेत? आणी ते तेच आहेत हे समजताच त्याने हात जोडून त्यांना घेऊन येण्याची विनंती केली व आपल्या घरात आसरा दिला व उत्तम आदरातिथ्य केले.

आसरा तर मिळाला पण पुढे काय? नेताजी व भगतराम आता दूतावासाच्या चकरा घालू लागले. रशियन दूतावासात काही केल्या प्रवेश मिळत नव्हता. एकदा राजदूताला रस्त्यात भेटायचा प्रयत्नही निष्फळ झाला. रशियामध्ये आपल्याला प्रवेश मिळेल व मग पुढे हालचाल करून राजाश्रय घेता येईल असा नेताजींचा अंदाज चुकला. हिंदुस्थानातून आलेला हा मनुष्य इंग्रजाचाच राजकीय डाव असेल असा संशय रशियाला होता व त्यामुळे त्यांना तिथे प्रतिसाद मिळाला नाही. क्रांतिवादी रशिया आपल्या देशाच्या संग्रामाला साहाय्य देईल अशी त्यांची कल्पना होती, मात्र इंग्लंड आणि रशियाचे संबंध वरकरणी वाईट नसले तरीही रशिया- जर्मनी मैत्री करारामुळे ते फारसे सलोख्याचे नव्हते आणि विश्वासाचेही नव्हते. या काळातील अनेक प्रसंग, अनेक उदाहरणे हेच दाखवून देतात की महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र परस्परांविषयी अत्यंत सावधतेचे व संशयाचे वातावरण होते. शिवाय पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध या दरम्यान अनेक राजकीय समीकरणे बदलली होती. एक मार्ग अडला तर नेताजी स्वस्थ बसणार नव्हते. त्यांनी थेट जर्मन दूतावास गाठला. अफगाणिस्थानातील जर्मन राजदूत श्री. पिलगेर यांनी त्यांना वरकरणी फारशी अनुकूलता न दाखवता एखाद्या भेटायला आलेल्या माणसाशी बोलावे तसे औपचारिक संभाषण सुरू केले. मात्र एकीकडे त्यांनी दूतावासातील स्थानिक कर्मचाऱ्यांना काही ना काही कारणाने बाहेर पिटाळले. बंद दारा आड बैठक सुरू होताच पिलगेरमहाशयांनी एका वर्तमानपत्रातली त्यांची छबी व ते गायब झाल्याचे वृत्त त्यांना दाखवले.पिलगेर यांनी मात्र ओळख पटताच नेताजींचे सहर्ष स्वागत केले. हिंदुस्थानच्या महान क्रांतिकारकाचे जर्मनी खचितच स्वागत करील आणि त्यांना सर्वतोपरी मदत करील अशी आशा व्यक्त केली व आपण त्यांच्या साठी शक्य ते सर्व प्रयत्न करू असे आश्वासन दिले. मात्र अनेक अफगाण व्यक्ती दूतावासात कामाला होत्या व त्या तितक्याश्या विश्वासार्ह नसल्याने जागतिक महत्त्वाच्या अशा व्यक्तीचे व अर्थातच हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य संग्रामाचे अस्तित्व धोक्यात येऊ शकत होते. पिलगेर ने आपण सविस्तर अहवाल जर्मनीतील मुख्यालयाला सादर करून त्यांना अधिकृत आश्रय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदतीची हमी दिली. मात्र त्याचवेळी त्याने असा इशारा दिला की नेताजी ओळखले जाण्याचा धोका लक्षात घेता यापुढील भेटी या दूतावासात न घेता त्या भेटी सिमेन्स कंपनीचा स्थानिक अधिकारी थॉमस याच्या निवासस्थानी घेतल्या जाव्यात.

नेताजींना त्या दिवशी फार मोकळे वाटले. आपण ज्या ध्येयासाठी देश सोडला ते आता मार्गी लागत आहे याचे समाधान त्यांना सतत होत असलेल्या दगदग व हाल-अपेष्टांपेक्षा मोठे होते. त्यांना नवा हुरूप आला. मात्र अनेक दिवस, अनेक भेटी होऊनही काही भरीव निष्पन्न न झाल्याने नेताजी अस्वस्थ होऊ लागले. दरम्यान पिलगेर ने त्यांना आपले दोस्तराष्ट्र इटलीच्या दूतावासात जाऊन राजदूत कारोनी यांची भेट घेण्याचे सुचविले. बर्लिनपेक्षा रोम आपले स्वागत करायला अधिक उत्सुक आहे आणि तेच आपली व्यवस्था करतील असे त्यांनी सुचविले व त्यांना सुयश चिंतले. कदाचित त्या वेळी हिटलर स्वतः: युद्धविषयक धोरणात गुरफटला असावा, त्याचे अधिकारीही अनेक सीमांवर विखुरलेले त्यामुळे त्याला हे वृत्त समजून नेताजींना जर्मनीत येऊन देण्याविषयी निर्णय तत्काळ घेता आला नसावा आणि त्याच्या प्रत्यक्ष संमतीखेरीज काही हालचाल करणे दूतावास वा परराष्ट्र खात्याला शक्य नसावे. तसेच पूर्वी मुसोलिनी व नेताजी यांचे भेट झालेली असल्याने ड्यूस त्याचाविषयक योग्य सल्ला देऊ शकेल असेही कदाचित त्याला वाटले असावे. अर्थात प्रत्यक्ष युद्धात आतापर्यंत जर्मनी अधिक अग्रेसर असून इटली त्यामानाने मोकळे होते तेव्हा काही मुलकी कारभार आपल्या वतीने त्याने युतीराष्ट्रावर सोडला असावा अशा तर्कासही वाव आहे. इटलीच्या राजदूताने, सिन्यॉर कारोनीने त्यांचे स्वागत केले व अर्थातच भरघोस मदतीचे आश्वासनही दिले. सद्यपरिस्थितीत या आश्वासनावर विश्वासण्याखेरीज नेताजींकडे इलाजच नव्हता. मात्र हळू हळू, काम लवकरच होईल, आम्ही संदेशाची वाट पाहत आहोत, वगैरे उत्तरांमुळे नेताजी फार बेचैन झाले.

अखेर एक दिवस त्यांनी उत्तमचंदांना चोरवाटेने रशियात गुपचुप प्रवेश करण्याचा मानस बोलून दाखवला व वाटाड्या शोधायला सांगितला. हे कर्म कठीण असले तरी 'एक रामकिशन शहीद झाला तसा मीही झालो तरी बेहत्तर पण मी इथे असा सडत राहणार नाही. जर देशाचे कार्य होत नसेल तर मेलेले बरे' असे नेताजींनी उद्विग्नपणे सांगितले. उत्तमचंदाने तत्काळ हालचाली करून एक वल्ली शोधून आणली. या वाटाड्याचे दरोडेखोरांशी संबंध होते व त्याने पूर्वायुष्यात एक खूनही केलेला होता. मात्र याक्षणी हँगो नदीपार जाणाऱ्या सरहद्दीवर असणाऱ्या पाटकेसर पर्यंतचा अवघड रस्ता त्याला उत्तम माहीत होता. याचे नाव महंमद याकूब. त्याला उत्तमचंदांनी मार्गातले धोके पाहता नदीवर पूल असेल का अशी पृच्छा केली त्यावर त्या पुलावर पहारा असतो, कारण त्या मार्गाने सोने , दुर्मिळ जनावरांची कातडी वगैरेंचा चोरटा व्यापार चालतो असे तो म्हणाला. त्यामुळे हवेच्या चामडी पिशव्या नदीत सोडून त्याला धरून तरंगत, पाण्याखाली लपत जायचे असा एकमेव धोकादायक मार्ग त्याने सांगितला. ते दिव्य करायला नेताजी तयार झाले. आणि अचानक एक दिवस कारोनी महाशय उत्तमचंदांच्या दुकानात स्वतः: आले व त्यांनी नेताजींना आनंदाची बातमी दिली की त्यांना न्यायला रोमहून दूत आले असून, दरम्यानच्या काळात ३ मार्च रोजी रशियानेही अल्पकालीन का होईना, पण प्रवासांतर्गत रहिवास परवाना दिला होता. कारोनीने नेताजींना पारपत्र तयार करण्यासाठी प्रकाशचित्राच्या प्रती तत्काळ तयार करण्यास सांगितले. नेताजी सर्व तयारीनिशी सज झाले. १७ मार्च रोजी कारोनीच्या घरी एक भव्य मेजवानी झाली, तित उत्तमचंद, नेताजी, पिलगेर व काही निवडक लोक हजर होते. १८ मार्च रोजी गाडी आली आणि भपकेबाज पाश्चिमात्य पोशाखातले नेताजी नव्या रूपात, नव्या देशात, नव्या नावाने निघाले - ऑरलँडो मॅझोटा, इटलीचा नागरिक, पारपत्र क्रमांक ६४९३२! mazzota<="" शक्यता="" करण्याची="" आक्रमण="" रशियावर="" हिटलर="" भविष्यकाळात="" नाहीत="" ठीक="" संबंध="" रशिया-जर्मनी="" ताडले="" नेताजींनी="" भेटीतही="" अल्पशा="" शुलेनबर्गच्या="" निघाले.="" बर्लिनला="" माणसांसमवेत="" जर्मन="" दोन="" करून="" सल्लमसलत="" याच्याशी="" शुलेनबर्ग="" राजदूत="" मुक्कामात="" मॉस्कोच्या="" निघाली.="" रशियाकडे="" गाडी="" घेऊन="" निरोप="" उत्तमचंदांचा="" />

३ एप्रिल १९४१ - म्हणजे घर सोडून बेपत्ता झाल्यानंतर अडीच महिन्यांनी नेताजी जर्मनीत दाखल झाले. स्वागताला डॉ. धवन व डॉ. मेल्चर्स हजर होते. नेताजींचे आगमन गाजले ते वेगळ्याच कारणाने. ते तिथे पोचायच्या आधीच बर्लिन येथे तिसऱ्या राईशचा परराष्ट्र विभाग 'स्वतंत्र भारत' विभागाची कचेरी चालवीत होता. या कचेरीचे काम मुख्यत्वे डॉ. ऍडॅम ट्रॉट, अलेक्झांडर वेर्थ इत्यादी पाहत होते. इथे युद्धकालांतील परस्परविरोधी धोरणाच्या अनेक विभागांचा युद्धकालीन प्रशासन कारभार दिसून येत होता. एकीकडे नाझी व हिटलरनिष्ट लोक नेताजींना अजिबात किंमत नव्हते, मान तर देतच नव्हते वा मानतही नव्हते. दुसरीकडे परराष्ट्र विभागाने त्यांना राष्ट्रप्रमुखाचा मान व वागणूक दिली होती. त्यांना हंगामी स्वतंत्र हिंदुस्थानच्या राष्ट्रप्रमुखाचा मान दिला जावा, 'एक्सलंसी' असे संबोधले जावे असे घोषित केले. नेताजींना शाही इतमामाने बर्लिनच्या लिख्टेन्स्टाईन ऍली, १० हे घर रहिवास म्हणून देण्यात आले. डॉ. ट्रॉट, डॉ. वेर्थ व फ़ुर्टवँग्लर या परदेश विभागाच्या उच्चपदस्थांनी नेताजींना प्रसारकार्यासाठी त्यांच्या इच्छेप्रमाणे अत्यंत शक्तिशाली अशी दोन लघुलहरी प्रक्षेपण केंद्रे उपलब्ध करून दिली. ही प्रक्षेपणे दिवसभर अनेक भारतीय भाषांमध्ये हिल्वरसम (नेदरलॅंड्स) व पोडिब्राड (झेकोस्लोवाकिया) येथून प्रसारित केली जात. केवळ रेडिओ केंद्र व प्रक्षेपण यासाठी एक दशलक्ष जर्मन मार्क्स इतकी रक्कम खर्चे करण्यात आली होती. नेताजी तसेच त्यांचा तमाम सेवकवर्ग यांचा खर्च विभाग करीत होता, तसेच त्यांना खर्चासाठी रक्कमही या विभागानेच पुरवली. हा सर्व खर्च नेताजी व परराष्ट्र विभाग यांच्या परस्परातील करारानुसार तसेच जर्मन सर्वोच्च हुकुमतीनुसार करण्यात येत होता. यासाठी प्रत्यक्ष हिटलरचा हुकूम आला नसला तरी परराष्ट्रमंत्री व हिटलरचा निकटवर्तीय रिबेनट्रॉप याने (एडीएपी, डी एक्स आय आय आय क्र.४६८) द्वारे हिटलरला तसे सूचित केले होते. swagat<="" />

बर्लिनमध्ये पोहोचल्यापासून एक आठवड्याच्या आत नेताजींनी परराष्ट्र विभागाला एक सविस्तर निवेदन दिले:

"बर्लिन, दिनांक ९ एप्रिल, १९४१"
(गोपनीय)

या युद्धात इंग्लंडरूपी महासत्ता खिळखिळी होऊन खचितच कोलमडून पडणार आहे. मात्र या स्थितीतही हिंदुस्थानला वसाहतीच्या स्वराज्याच्या दर्जा पलीकडे काही देण्याचे अभिवचन हे इंग्रज देत नाहीत. अक्ष राष्ट्रांच्या साहाय्याने लष्करी आक्रमण करून या उन्मत्त सत्तेचे कंबरडे मोडणे हाच आता एकमेव मार्ग आहे. तेव्हा या परिस्थितीत मी असे निवेदन सादर करू इच्छितो की या क्षणी हिंदुस्थान व अक्ष सत्ता हे दोन्ही, आपले एकमेव ध्येय परस्पर सहकार्याने साधू शकतात आणि ते म्हणजे इंग्रजी सत्तेचा सर्वनाश. यात युरोप, अफगाणिस्तान, अफगाण सीमेवरील आदिवासी रहिवासीत प्रदेश तसेच खुद्द हिंदुस्थानातील कामगिरीचा समावेश असेल. निवेदनाचे प्रमुख मुद्दे असे:

१ युरोपातील कामगिरी. युरोपात - बर्लिनमध्ये आझाद हिंद सरकारची स्थापना/ अक्ष राष्ट्रे व हिंदुस्थान यात युद्धातील विजयानंतर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याची हमी देणारा करार, तसेच स्वतंत्र हिंदुस्थानात या राष्ट्रांना विशेष स्थान/ युरोपातील सर्व युती राष्ट्रात आझाद हिंद सरकारची स्थापना ज्यायोगे हिंदी जनतेला या राष्ट्रांच्या सच्च्या प्रयत्नांची खात्री पटेल/ आझाद हिंद रेडिओ वरून हिंदी जनतेला आवाहन करणारे प्रभावी प्रक्षेपण, ज्यायोगे जनता इंग्रजी सत्तेविरुद्ध उठावास प्रवृत्त होईल.

२ अफगाणिस्तानातील कामगिरी. काबुल येथे हिंदुस्थान व युरोप यांच्या संपर्का साठी केंद्रे निर्माण करणे / या केंद्रांना वाहने, मालमोटारी, टपालसेवा, दळणवळण-संपर्क इत्यादी सुविधा पुरविणे.

३ अफगाण-हिंदुस्थानच्या मधील स्वायत्त विभागांतर्गत कामगिरी. आझाद हिंदचे कार्यकर्ते वायव्य सीमेवर कार्यरत आहेतच/ त्यांच्यासह वायव्य सीमेकडून हिंदुस्थानवर निकराचा हल्ला/ इंग्रज विरोधी तत्त्वे - उदा. इपीचा फकीर - या सारख्यांचे स्वतंत्र व पूरक हल्ले/ प्रत्यक्ष रणावर युरोपातील अनुभवी युद्ध सल्लागाराची नेमणूक/ या भागात प्रचारकेंद्रे व मुबलक प्रचारसाहित्याची उपलब्धता/ प्रक्षेपण केंद्रे

४ खुद्द हिंदुस्थानातील कामगिरी. हिंदुस्थानात युरोप व स्वायत्त भागतील प्रसारण केंद्रांवरून प्रक्षेपण/ स्वायत्त भागातील प्रचारसेवेतर्फे हिंदुस्थानात प्रभावी प्रचारपत्रक वितरण/ आझाद हिंदच्या हिंदुस्थानातील विविध भागात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांतर्फे सरकारच्या कारभारात अडथळे निर्माण करणे/ हिंदी जनतेने सरकारला काहीही सामग्री व रुपयाभर देखिल न देण्याचे आवाहन करणारा प्रचार/ जनसामान्यांना सरकारला कर न देण्याचे आवाहन/ लष्करात उठावाची तयारी/ दारुगोळा व लष्करी साहित्य कारखान्यांत घातपात व नाश करणे/ दळणवळण सेवा कोलमडून टाकणे ज्यामुळे ब्रिटिश सैन्याचा प्रवाह गोठेल/ हिंदुस्थानातील जनतेचा बंड करून उठाचे आवाहन

५ आर्थिक बाबी. या योजनेचा सर्व आर्थिक भार अक्ष राष्ट्रांनी उचलावा व हा खर्च हे स्वतंत्र हिंदुस्थानला दिलेले कर्जे समजावे/ स्वातंत्र्या नंतर हिंदुस्थान सव्याज कर्जफेड करेल/ चालू विनिमय दरांनुसार डॉइश मार्कचे अफगाणी चलनात व अफगाणी चलनाचे रुपयात परिवर्तन/ युरोपात दहा रुपये मूल्याच्या कागदी नोटा छापून त्या भारतात आणण्यासंबंधी विचार करणे.

६ ब्रिटिश सत्ता उखडून टाकण्यासाठी प्रत्यक्ष लष्करी मदत. इंग्रज सैन्यात प्रत्यक्ष इंग्रजी गोरे सैनिक अवघे सत्तर हजार आहेत. जर इंग्रजी सैन्यातले हिंदुस्थानी सैनिक आपले हत्यार उलटून इंग्रजांविरुद्ध उचलतील व त्याच वेळेस जर आझाद हिंदच्या साथीला पन्नास हजार सशस्त्र लष्कर अक्ष राष्ट्रे देतील तर एकाच आघातात इंग्रजी सैन्याचा धुव्वा उडेल.

परक्या देशात जाऊन, आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांना मदतीचे आवाहन करून वर त्यांनी काय करावे व आमच्या अपेक्षा काय, आमचे दायित्व काय हे रोखठोकपणे सांगणारा असा धैर्यवान व दूरदर्शी महापुरुष एकमेवाद्वितीयच म्हटला पाहिजे.



आझाद हिंद सेना ७ - जर्मन अध्याय: सेना, ध्वजवंदन, राष्ट्रगीत


नेताजींनी निवेदन सादर केले पण त्याला प्रतिसाद? प्रतिसादाला विलंब अत्यंत साहजिकच होता. एकतर आधी उल्लेख केल्याप्रमाणे दुसऱ्या महायुद्धामुळे अत्यंत अविश्वासाचे वातावरण जगभर निर्माण झाले होते. हिटलर व जर्मनीच्या दृष्टीने निर्णय घेणे सोपे नव्हते. पहिले कारण म्हणजे नेताजी हे हिंदुस्थानच्या राष्ट्रीय पक्षातून, कॉग्रेसमधून हकालपट्टी झालेले नेते होते व त्यांना हिंदुस्थानी जनता आपला नेता मानेल किंवा नाही याबाबतीत जर्मनीकडे खात्रीलायक माहिती नव्हती. दुसरे कारण म्हणजे हिटलरच्या युद्धकार्यक्रमात हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यसंग्रामाला पाठिंबा देणे हे याआधी ठरलेले नव्हते. तिसरे कारण म्हणजे माईन काम्फ मध्ये हिटलरने हिंदुस्थानच्या तत्कालीन नेतृत्वाची व स्वातंत्र्य आंदोलनाची नकारात्मक प्रतिमा रंगवली होती. चौथे कारण म्हणजे इंग्लंडला आज ना उद्या आपण तह करायला भाग पाडणार असा आत्मविश्वास हिटलरला होता, मग अशा परिस्थितीत हिंदुस्थानच्या संग्रामाला सहाय्यभूत ठरून त्यात खोंडा येऊ द्यायचा का? पाचवे कारण म्हणजे रशिया विषयी धोरण अजून निश्चित होत नव्हते तेव्हा बहुविध संघर्षात आणखी एक आघाडी उघडाची का यावर विचार करणं आवश्यक होते. सहावे कारण इटली - जर्मनी युती असताना या विषयक इटलीचे मत अजमावणे अगत्याचे होते. या आधी इटली भेटीत मुसोलिनीने नेताजींची गाठ तिथे अनेक वर्षे स्थायिक असून स्वातंत्र्यचळवळ चालवणाऱ्या व इटलीतून स्वातंत्र्यप्रचारासाठी रेडिओ हिमालय हे प्रक्षेपण केंद्र चालवणाऱ्या इक्बाल शिदेईशी घालून दिली होती. इक्बाल नेताजींच्या भेटीने भारावून गेला होता, किंबहुना त्यासाठी अत्युत्सुक होता. नेताजी निसटल्याची बातमी समजताच त्याच्या नभोवाणी केंद्रावरून अनेकदा त्याने ’नेताजी, तुम्ही कुठे आहात, आम्ही वाट पाहतोय’ अशी सादही घातली होती. मात्र प्रत्यक्ष भेटीत नेताजी समजून चुकले की या युवकाचा संघर्ष पाकिस्तानासाठी आहे आणि नेताजींचा लढा हिंदुस्थानासाठी असून केवळ आपण स्वातंत्र्य मिळेपर्यंत एकमेकांना साहाय्य करायचे आहे व त्यानंतर विभक्त व्हायचे आहे असे त्याचे उद्दिष्ट आहे. अखंड व जाती-धर्म अशा बंधांपासून मुक्त असा सशक्त हिंदुस्थानचे स्वप्न पाहणाऱ्या नेताजींना या तरुणाची साथ देणे वा घेणे कदापि मान्य नव्हते आणि मान्य होणे शक्यही नव्हते.

मात्र हे सर्व असूनही जर्मनीतल्या अवघ्या एकूणचाळीस सहकाऱ्यांच्या साथीने ४० कोटी भारतीयांचे हंगामी सरकार स्थापन करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारे व त्या सरकारला मान्यता मागणारे नेताजी जर्मनीला प्रभावीत करून गेले हे निश्चित. अखेर नेताजींच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या सुनिश्चित नियोजनबद्ध कार्यक्रमाचा विजय झाला. ८व ९ डिसेंबर १९४१ या दिवशी बर्लिनमध्ये भरवण्यात आलेल्या परिषदेत नेताजींना अनुकूल असा निर्णय घेण्यात आला. या परिषदेस इक्बाल सिदेई, अलेस्सान्द्रिनि, मेजर दे ला तोरे आणि उप परराष्ट्र वकिलात प्रमुख ग्वादानिनी हे इटलीतर्फे तर जर्मनीतर्फे वकिलात प्रमुख वुस्टर, डॉ. ट्रॉट, डॉ. वेर्थ व हिंदुस्थानतर्फे नेताजी उपस्थित होते. या परिषदेत चर्चिले गेलेले मुद्दे असे:

१) जर्मनी व इटलीतील भारतीय कार्यालये यांच्यात समन्वय साधून परस्पर सहकार्याने हिंदुस्थानच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी माहिती व योजना यांची देवाण घेवाण.
२)हिंदुस्थानी लष्करी तुकडी पूर्णतः: जर्मनीच्या अखत्यारीतील बाब असेल.अर्थातच वेळोवेळी इटलीचे सहकार्य त्यांत असेल. इटलीतर्फे असे सुचविण्यात आले सेनेबरोबरच घातपाताचे आणि प्रचारतंत्राचे प्रशिक्षण घेतलेल्या तुकड्याही आवश्यक आहेत.
३)इटलीने अफगाणातील अंतर्गत विरोधकांना पूरक असा प्रचार दूरगामी फायद्याचा असल्याचे व अफगाण सरहद्द हिंदुस्थान सीमेवरील बित्तंबातमी काढण्याच्या दृष्टीने असल्याचे सांगितले.
४)पाकिस्तानचा पुरस्कार करणे अयोग्य असले व तसे करणे ही इंग्रजांची चाल असली तरीही हिंदुस्थानातील मुस्लिमांच्या सहकार्याचा विचार करता त्याचा उघड धिक्कारही करू नये.
५) संघटित हिंदुस्थानला मान्यतेची अधिकृत घोषणा करणे लष्करी दृष्ट्या अनुकूल अशी स्थिती प्राप्त झाल्यावरच करणे संयुक्तिक ठरेल. या घोषणे बरोबरच आंतरराष्ट्रीय प्रचारकार्य, हिंदुस्थानात जागृती तसेच नेताजींनी स्वतः: रेडिओद्वारे युरोपातील जनतेला ब्रिटिश हिंदुस्थानला गुलामगिरीत खितपत ठेवू इच्छित असल्याचे सत्य कथन करणे.
६)जर्मनीने हिंदुस्थानच्या प्रचारासाठी रेडिओ हिमालय सारखी प्रक्षेपण केंद्रे सुरू करावीत.

rommel afrika

याच परिषदेत नेताजींनी आझाद हिंद तुकडीच्या स्थापनेचा उच्चार केला व त्यास त्रिपक्षिय मान्यता मिळाली. १९४१ सालीच एर्विन रोमेलने अफ्रिकेत अक्षरश: धुमाकुळ घातला होता. ग्राझिआनीच्या इटालीय फौजांना चोप देउन हाकलुन लावणाऱ्या अजिंक्य ब्रिटीश सेनेचे व दिग्विजयी जनरल वेव्हेलचे रोमेलने पार वस्त्रहरण करून टाकले होते. अल्जिरिया, ट्युनिशिया,लिबिया मधील एक एक करीत सगळी मोक्याची ठाणी रोमेलने बळकावली. या दणदणीत पराभवात इंग्रजांना आसरा होता तो टोब्रुकचा. आणि टोब्रुकचा बचाव प्राणपणाने केला ऑस्ट्रेलिया/ न्यूझिलॅंडच्या तोफखान्यांनी व मराठा लाईट इंन्फंट्रीच्या चिवट प्रतिकारानी. रोमेलला अफ्रिकेत हाती लागलेले युद्धकैदी जर्मनीत आणले गेले होते. नेताजींना आपली तुकडी उभारण्यासाठी या युद्धकैद्यांपैकी सैनिक घेउ देण्याचे ठरविले व ऍनाबर्गच्या छावणीची त्यासाठी निवड करण्यात आली. या युद्धकैद्यांपैकी जे जे आपल्या आवहनाला प्रतिसाद देऊन सामिल होतील ते आपले सैनिक, त्यासाठी केवळ आपणच प्रयत्न करणार तसेच आपल्या वतीने वा अन्यथाही जर्मनीने बळाचा वापर करुन वा जबरदस्तीने कुणालाही भरती करू नये असे नेताजींनी कटाक्षाने बजावले होते. एक नेता आपल्या अनुयायांची पितृवत काळजी कशी घेतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे सैन्य निर्मितीच्याच प्रसंगी नेताजींनी हे स्पष्ट केले व जर्मनीकडुन तसे मान्य करवुन घेतले की ही आझास हिंद ची तुकडी प्राणपणाने लढेल, पण फक्त हिंदुस्थानच्या स्वातंत्र्ययुद्धासाठी, हिंदुस्थानच्या सीमेवर. ती कुणाची भाडोत्री फौज म्हणुन लढणार नाही आणि तिला हुकुमत असेल ती फक्त हिंदुस्थानी.

कल्पना कितीही चांगली असली तरी प्रत्यक्षात येणे कठीण होते. युद्धकैदी झालेले सैनिक या तुकडीत सामील व्हायला तयार न होण्यामागे अनेक कारणे होती. एकतर सैनिक आपल्या अधिकाऱ्यासाठी त्याच्या हुकुमाने लढत असतो, त्यामुळे सहजासहजी अनेक वर्षे इंग्रजी फौजेत असलेले व इंग्रजांना अधिकारी मानलेल्या सैनिकांना एकाएकी हा बदल पचणे शक्य नव्हते. त्यात इंग्रजांनी जर्मनी व नेताजी यांच्याविरुद्ध जहरी प्रचार करून त्यांची मने कलुषित केलेली होती. या शिवाय सैन्याच्या नोकरीत आलेल्या हिंदुस्थानीयांना भरघोस निवृत्तिवेतन मिळत असे, त्यावर सहजासहजी पाणी कोण आणि का सोडेल? भरीत भर म्हणजे आझाद हिंदच्या भरतीत मूळ हुद्द्यापेक्षा कर्तृत्वावर हुद्दा ठरणार होता. आणखी एक नाजुक कारण म्हणजे या सैनिकांची बायका-मुले व घरदार अजूनही तिकडे हिंदुस्थानातच होते व त्यांना धोका निर्माण झाला असता. एकूण आपले सैनिक फुटू नयेत यासाठी इंग्रजा भरपूर प्रयत्न केलेले होते. या सैनिकांच्या अनेक छावण्या होत्या. पैकी ऍनाबर्गच्या छावणीत नेताजींना आपले सैन्य निवडण्यासाठी पाठवले गेले. नेताजी स्वतः: या जवानांशी बोलत, त्यांना आपले ध्येय व कार्यस्वरूप तळमळीने समजवून देत. हे करीत असताना नेताजींना अपमान व अवहेलना सहन करावी लागत असे. हे युद्धकैदी त्यांना पढवून ठेवलेल्या माहितीनुसार नेताजींना गद्दार, नाझींचा दलाल असे संबोधत असत. मात्र या सर्व नकारयादीवर नेताजींच्या जादुई व्यक्तिमत्त्वाने, तळमळीने तसेच प्रामाणिक आवाहन यांनी मात केली व हळूहळू सैन्य आकार घेऊ लागले. इटलीच्या ताब्यातील हिंदुस्थानी युद्धकैदीही आपल्याकडे सोपवावेत यासाठी जर्मनीने प्रयत्न सुरू केले. इटलीच्या ताब्यातील सैनिक हे जर्मनीच्या ताब्यातील सैनिकांच्या तुलनेने आझाद हिंदच्या जर्मन तुकडीत सामील व्हायला अधिक अनुकूल होते. याला कारण म्हणजे या सैनिकांनी इटलीच्या सैनिकांना पुरते ओळखले होते, व इंग्रजांकडून लढत असताना आपल्याला पाठ दाखवून पळताना पाहिलेले होते व त्यामुळे ते त्यांच्या अंकित राहायला तयार नव्हते. या सैनिकांना नीट वागणूक इटलीची सेना देत नव्हती तसेच अन्नधान्य वगैरेची आबाळ होती.

नेताजींच्या अथक व चिकाटीच्या प्रयत्नांना हळूहळू यश येऊ लागले व आझाद हिंदची जर्मनीतील तुकडी आकार घेऊ लागली. A H Bini मूळचे जालंदरचे असलेले गुरूमुखसिंग व गुरुबचनसिंग मंगट हे बंधू सर्वप्रथम सामील होणाऱ्यांमध्ये होते, पाठोपाठ सामील झाले ते मराठा लाइट इंन्फंट्रीचे कमांडर सुभानजी घोरपडे व त्यांचे सैनिक. या संपूर्ण भरती प्रक्रियेत जर्मनीने स्वतः:ला कटाक्षाने दूर ठेवले होते व कसलाही हस्तक्षेप केला नव्हता. पुढे इंग्रजांनी असा आरडाओरडा केला की ताब्यात सापडलेल्या सैनिकांचा छळ केला व अनन्वित यातना देऊन त्यांना जबरदस्तीने आझाद हिंदच्या तुकडीत सामील केले गेले त्याला कसलाही आधार मिळू शकला नाही. उलट त्यावेळी सैन्याधिकारी असलेल्या कुश्चर व क्रिटर यांच्या जुन्या दैनंदिन्यांमधून असे स्पष्ट उल्लेख होते की या भरतीत जर्मनीचा हस्तक्षेप तर नव्हताच पण श्री. बोस सुद्धा कुणावरही जबरदस्ती न करता सर्वांना आपले म्हणणे तळमळीने समजवून सांगत, या सेनेत सामील होणे हेच देशाशी खरे इमान असे सांगत व ते ऐकून ज्यांचे हृदयपरिवर्तन होत असे त्यांनाच सामावून घेतले जात असे. या कार्यात जर्मनीतील भारतीय नागरिक तसेच आझाद हिंदचे स्वयंसेवक यांनी सर्वस्व झोकून देऊन मदत केली. सामील झालेल्यांना जर्मनीतर्फे त्यांच्या मापाचे लष्करी गणवेश तसेच शस्त्रे पुरविण्यात आली. मात्र या सेनेचा स्वतः:चा ध्वज होता, ते जर्मन ध्वजाखाली लढणार नव्हते. त्यांच्या कवायतीसाठी सर्व हिंदुस्थानी संज्ञा जर्मन प्रशिक्षक अधिकाऱ्यांना भाषांतरित करून सांगण्यात आल्या होत्या व ते अस्खलित हिंदुस्थानीतुन हुकूम देत असत. या सेनेवर नेताजींनी राष्ट्रीयता

A H Oath

एकात्मतेची शपथ घेताना हिंदु, मुसलमान, शिख व ब्राह्मी शिपाई

बिंबवण्यासाठी कसोशीचे प्रयत्न केले. सर्वांची एक अशी हिंदी भाषा व ती सर्वांना लिहिता वाचता यावी यासाठी रोमन लिपीचा पुरस्कार केला. सैन्याच्या तुकड्यांमधील जातीय वा प्रांतिक स्वरूप नष्ट करायचा चंग बांधला. नेताजींना आपली तुकडी ही शस्त्रसज्ज व शस्त्रे चालवण्यात वाकबगार असावी असे वाटत असल्याने त्यांनी जर्मन सेनाधिकाऱ्यांमार्फत त्यांना आधुनिक शस्त्रे व युद्धनितीचे कडक प्रशिक्षण दिले. जर्मन सेनाधिकाऱ्यांनीही आत्मीयतेने प्रशिक्षण दिले व या सेनेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. मेजर क्राप्पे व क्रिटर यांनी तसे नमूद केलेले आहे. नोव्हेंबर १९५२ मध्ये १३०० च्या आसपास सैनिकसंख्या असलेली ही सेना पुढे १९४३ मध्ये सेवकवर्ग व प्रशासकीय कर्मचारी धरून ३५०० च्या आसपास गेली. सुरुवातीच्या १३०० सैनिकांच्या दोन बटालियन्स होत्या.

पहिली बटालियन - कंपनी १ ते ३ : प्रत्येकी १८ हलक्या मशीन गन, २ x ८०मिमि उखळी तोफा आणि ४ रणगाडाभेदी तोफा असलेल्या पायदळ तुकड्या

- कंपनी ४ : मशिनगनची तुकडी
- कंपनी ५ : ’अवजड’ कंपनी असून तिच्यामध्ये एक हॉवित्झर हलक्या तोफांची पलटण, ५० मिमि रणगाडाभेदी तोफांची पलटण व एक आस्थापक पलटण

दुसरी बटालियन - कंपनी ६, ७: रायफलधारी तुकड्या
- कंपनी ८ : काहीशी अधुरी व संकेत-निशाणीचा प्रभार असलेली पलटण

या छोटेखानी सैन्याला आधुनिक शस्त्रास्त्र हाताळणीचे प्रशिक्षण जर्मन सैन्याने दिले, जर्मन सैन्याधिकारी जातीने त्यात लक्ष देत होते,प्रत्यक्ष सेनापती रोमेलनेही या सेनेची पाहणी व त्यांना मार्गदर्शन केले होते. howitzer

हॉवित्झर तोफांवर निशाणीचा सराव

कोल्होबाचा सल्ला - 'वाळवंटी कोल्हा' रोमेल आझाद हिंदच्या तुकडीची पाहणी व मार्गदर्शन करताना
A H D Fox

अथक परिश्रमाने नेताजींनी जर्मन भूमीत आपल्या स्वतंत्र देशाचा तिरंगा जुलै १९४२ मध्ये फडकवला. वरचे अंग केशरी, मध्यांग शुभ्र व खालचे अंग हिरवे; मात्र शुभ्र मध्यांगात कॉंग्रेसचा चरखा वा आजच्या राष्ट्रध्वजातील अशोकचक्रा ऐवजी डरकाळी फोडत झेपावणारा पट्टेरी वाघ होता. दिनांक ११ सप्टेंबर १९४२ रोजी हॅम्बुर्ग येथील ड्युश-इंडिश गेसेल्क्खाफ्ट च्या संस्थापनेच्या प्रसंगी नेताजी व आझाद हिंद सेनेच्या सैनिकांनी स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत म्हटले जे आजही आपले राष्ट्रगीत आहे.


आझाद हिंद सेना ८ - पूर्वेकडे प्रस्थान


नेताजींच्या आपल्या सेनेविषयी, आपल्या भावी स्वतंत्र राष्ट्राविषयी काही दृढ कल्पना होत्या. त्यांना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्रसंगी असंगाशी संग करायचा कठोर निर्णय घ्यावा लागला तरीही त्यांनी आपली तत्त्वे सोडली नाहीत. आम्हाला तुमची मदत हवी आहे, आधिपत्य नको असे म्हणूनच ते हिटलरसारख्या सत्तांध हुकूमशहाला देखिल ठणकावून सांगू शकले. पुढे जपानच्या बरोबर उघडलेल्या संयुक्त मोहिमेतसुद्धा त्यांचा हा करारी बाणा आणि ताठ पवित्रा ठाम होता. आणि म्हणूनच त्यांनी अक्ष राष्ट्रांकडे आपल्या हंगामी सरकारला मदत करण्याची मागणी केली होती. आपल्या सैन्याला कुणी शत्रूच्या हातातील बाहुले बनलेली देशद्रोह्यांची फौज म्हणू नये यासाठीच त्यांनी आपले अस्तित्व वेगळे ठेवायची मुत्सद्देगिरी व ती तडीस नेण्याची हिंमत दाखवली. स्वतंत्र कचेरी, सेनेचा स्वतंत्र ध्वज, स्वतंत्र देशाचे राष्ट्रगीत, स्वतंत्र मानचिन्हे, इतकेच काय तर टपाल तिकिटे देखिल तयार करून घेतली. कर्ज म्हणून जर्मन चलनाच्या स्वरूपात अर्थसाहाय्य स्वीकारायचे व ते भारतीय चलनात परावर्तित करायचे आणि हिंदुस्थानातील कामगिरीसाठी वापरायचे अशी त्यांची योजना होती. हे कर्ज अर्थातच स्वातंत्र्य मिळाल्यावर परतफेडीच्या करारावर मागितले होते, मदत वा अनुदान म्हणून नव्हे. हिंदुस्थानी चलनानुसार दहा रुपयांच्या चलनी नोटा जर्मनीत छापून इकडे हिंदुस्थानात आणायचा प्रस्ताव त्यांनी मांडला होता. A H Insignia

म्हणजेच महाभयंकर अशा राष्ट्रांच्या दरबारात जाऊन त्यांनी त्या ताकदींना आव्हान दिले होते की जर तुमचा आणि आमचा समाईक शत्रू असलेल्या इंग्रजी सत्तेचा पाडाव करायची गरज आपल्या दोघांनाही आहे, तेव्हा आज तुम्ही आम्हाला मदत कराल तर ते तुमच्याच हिताचे आहे. तेव्हा आपल्या हिताखातर तुम्ही हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य संग्रामाला हिंदुस्थान आपल्या बरोबरीचा समजून एक स्वायत्त देश म्हणून मदत करा, त्यात तुमचाही फायदा आहे, ती आमच्या देशावर मेहेरबानी नाही. आणि जेव्हा त्या तेजस्वी वीराने ताठ मानेने आपल्या शर्तींवर मदत मागितली म्हणूनच अक्ष राष्ट्रे साहाय्य करण्यास तयार झाली. जर नेताजी मांडलिकत्वाची भाषा करत, हीन-दीन होऊन लाचारीने मदत मागायला गेले असते तर एक तर त्या दोन हुकूमशहांनी त्यांना तुरुंगात डांबले असते वा साफ धुडकावून लावले असते. मात्र जो मदत मागायला येतो व तरीही आपल्यालाच शर्ती घालतो, त्यात पाणी असले पाहिजे हे ओळखून त्या राष्ट्रप्रमुखांनी त्यांना एका राष्ट्रप्रमुखाचा मान व राजशिष्टाचार देऊ केला, स्वतंत्र कचेरी दिली, स्वतंत्र नभोवाणी केंद्र उघडून दिले, अर्थसाहाय्य दिले, लष्करी मदत दिली. A H Stamps

१९४३ मध्ये राइश मुद्रणालयात नेताजींच्या आझाद हिंद साठी टपाल तिकिटे छापण्यात आली. या तिकिटांमधून नेताजींच्या आपल्या भावी स्वतंत्र देशाविषयीच्या कल्पना स्पष्ट दिसून येत होत्या. चरखा चालविणारी स्त्री, रुग्णाची सुश्रुशा करणारी परिचारिका, नांगर चालवणारा शेतकरी, हातात आधुनिक शस्त्र घेऊन देशाच्या रक्षणासाठी सज्ज असलेला जवान व अखंड हिंदुस्थानचा नकाशा, त्याला नंग्या तरवारींची महिरप अशी ही तिकिटे प्रत्यक्ष प्रत्यक्षात वितरणात आली नसली तरी टपाल तिकिट संग्राहकांच्या दुनियेत ती दुर्मिळ म्हणून आवर्जून जपलेली आहेत.

शिवरायांचा राज्याभिषेक आणि नेताजींचा स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळवण्याचा प्रयत्न यात कमालीचे साम्य नीट पाहता दिसून येते. राजांना राज्य, छत्र-चामर, सिंहासन या कशाचीच आसक्ती नव्हती पण तरीही त्यांनी राज्याभिषेक करवून घेतला कारण एकदा हिंदवी स्वराज्याला सिंहासन प्राप्त झाले, राजधानी आली आणि राजा आला की स्वातंत्र्य संग्रामाला स्वराज्यस्थापनेला कुणी पुंडावा म्हणणार नाही, रयतेला आपले राज्य आल्याचे जाणवेल आणि परकीयांना घरचे शत्रू निर्माण करणे जड जाईल. नेमका हाच उद्देश नेताजींचा होता. एकदा का स्वतंत्र हिंदुस्थानचे सरकार स्थापन झाले; भले ते हंगामी असेल, प्रतिकात्मक असेल, पण ते स्थापन झाले, जगातल्या चार देशांनी का होईना पण त्याला मान्यता दिली की मग कुणी आझाद हिंद सेनेला देशद्रोही वा फितुरांची फौज म्हणू शकणार नाही, जनतेत पसरलेले गैरसमज दूर होतील आणि आझाद हिंद सेनेची खरी ओळख हिंदुस्थानी जनतेला पटेल, त्यांतून प्रेरित होऊन आझाद हिंद सेनेत अनेक हिंदुस्थानी सामील होतील व आता या देशाला आपल्या बंधनात ठेवणे आपल्याला सोपे नाही हे ब्रिटिशांना समजुन चुकेल. याच बरोबर जरी तुमच्या साहाय्याने लढत असलो तरी आम्ही स्वतंत्र देशाचे शिपाई असून आम्ही आमच्या ध्वजाखाली लढू, तुमच्या आधिपत्याखाली नाही हे मदतगार राष्ट्रांनाही समजून चुकेल व मग जे तरीही मदत करतील ते खरे असे समजत येईल. या सरकार स्थापने मुळे जेव्हा आझाद हिंद फौजा हिंदुस्थानच्या सीमेवर जेव्हा अक्ष राष्ट्रसैन्याच्या मदतीने हल्ला करेल तेव्हा इंग्रजांना 'परचक्र' आले अशी हाकाटी करण्याचा मार्ग बंद झाला होता. आणि म्हणूनच जर्मनी तसेच पूर्वेत हंगामी सरकार स्थापन करण्याच्या नेताजींच्या दूरदृष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

नेताजी आपली जर्मनीत स्थापन झालेली तुकडी केवळ हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठीच लढेल, ती जर्मनीच्या दावणीला बांधली जाणार नाहीत याविषयी सातत्याने जागरूक होते. जेव्हा इराकवरील हल्ल्याची योजना बारगळली तेव्हा इराकवरील आक्रमणाचा नायक एअर फोर्स जनरल फेल्मी व त्याचे सैन्य 'सॉंडर्स्टॅब एफ' सुन्यन येथे म्हणजे अट्टिका च्या अंतिम दक्षिण टोकाला होते. हे सैन्य इराकमधून ग्रीस मध्ये हालविण्याची व त्याचा रोख कॉकेशस वर हल्ला करण्याची योजना आखली गेली. तडकाफडकीने आझाद हिंदच्या तुकडीला त्यांच्या बरोबर जाण्याचे फर्मान दिले गेले. मात्र नेताजींनी थेट वरपर्यंत याचा विरोध नोंदवून व पाठपुरावा करून हा हुकूम मागे घेण्यास जर्मन सेनानींना भाग पाडले. पुढे जर्मन सैनिकीतज्ज्ञांनीच असे नमूद केले आहे की हे नेताजींचे पाऊल अत्यंत महत्त्वाचे होते कारण नापेक्षा ही हिंदुस्थानी तुकडी हिंदुस्थानी सीमा गाठायच्या आतच कॉकेशसच्या घनघोर संग्रामात बळी गेली असती. खरेतर नेताजी पूर्वनियोजित 'ऑपरेशन टायगर'ची उत्सुकतेने वाट पाहत होते. ऑपरेशन टायगर म्हणजे आधीपासूनच अफगाणीस्थानात कार्यरत असलेले जर्मन / इटालियन हस्तकांच्या मदतीने स्थानिक उठावाचा प्रयत्न करायचा, स्थानिक बंडखोरांच्या मदतीने अफगाण सत्ता ताब्यात घ्यायची व तिथून ब्रिटनविरुद्ध नवी आघाडी उघडायची असा बेत होता. या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न व नियोजनही सुरू होते. नेताजींच्या दृष्टीने हे सर्वात महत्त्वाचे होते कारण ते या मार्गाने थेट हिंदुस्थानच्या सीमेला गवसणी घालणार होते. सैनिकी हल्ल्याबरोबरच जबरदस्त प्रचारयंत्रणा वापरून हिंदुस्थानातील जनतेत जागृती निर्माण करायची ज्यायोगे साऱ्या हिंदुस्थानला सत्य समजेल व हिंदुस्थानी जनता धैर्य एकवटून आतून उठाव करेल व दुहेरी पात्यात इंग्रजांना लढणे दुरापास्त होईल व आपले ईप्सित साध्य होईल असे नेताजींना वाटत होते. आणि म्हणूनच नेताजी परराष्ट्रमंत्री रिबेनट्रॉप व फ्युरर च्या भेटीचा तगादा परराष्ट्र मंत्रालयाच्या मागे सतत लावीत होते. प्रत्यक्षात रिबेनट्रॉप व नेताजी भेट २९ नोव्हेंबर १९४१ रोजी साकारली. आपल्या राष्ट्राला हिटलरने तातडीने मान्यता द्यावी व त्या चर्चेसाठी आपली व हिटलरची गाठभेट तातडीने आयोजित केली जावी असा आग्रह नेताजींनी धरला. आपण इथे स्वाथ्यासाठी वा हवापालटासाठी आलो नसुन आपले ध्येय जर इथे साध्य होते नसेल तर आपण इथून निघून जाऊ असे नेताजींनी ठणकावून सांगितले.

अखेर नेताजी जर्मनीत दाखल होऊन तब्बल वर्ष उलटून गेल्यानंतर म्हणजे २७ मे १९४२ रोजी हिटलर व नेताजी यांची ऐतिहासिक भेट झाली. hitlerया भेटीत नेताजींनी आपल्या सरकारला अधिकृत सरकार म्हणून पाठिंबा देण्याची घोषणा करण्याची मागणी केली व त्याचबरोबर हिटलर च्या माईन काम्फ मधील हिंदुस्थानी नेते व आंदोलनाविषयी काढलेले अनुद्गार दुरुस्त करण्याविषयी सुचवले. हे उद्गार बरोबर तर नाहीतच शिवाय याचा फायदा घेऊन इंग्रज सरकार हे जर्मनी भारताचा शत्रू असल्याचा अपप्रचार करीत असल्याचे सांगितले. घोषणेबाबत हिटलरने अनुकूलतेसाठी थांबणे इष्ट असल्याचे सांगितले. भारतीय आंदोलन व नेत्यांविषयीच्या उद्गारा बद्दल नेताजींना हिटलरने असा खुलासा केला की त्याला केवळ असे म्हणायचे होते की सामर्थ्य व शस्त्र यांच्या सहित सुनियोजित संग्रामाखेरीज आंदोलन व्यर्थ आहे' तसेच जर्मनीतील तरुणांना असल्या आंदोलनांचा तिरस्कार निर्माण होऊन त्यांनी हाती शस्त्र घेण्यास सज्ज व्हावे हाही हेतू होता असे सांगितले. मात्र एव्हाना परिस्थिती बदलली होती. जर्मनीने रशियावर आक्रमण केले होते, तसेच आफ्रिकेत रोमेलची परिस्थिती बिकट झाली होती व त्यामुळेच यापुढील हालचाली नेताजींना पूर्वेतून कराव्यात असे सुचविले. एकतर अनेक कारणास्तव ऑपरेशन टायगर बारगळले होते, दुसरीकडे रशियन आघाडीवरील सेनेचे भवितव्य अद्याप अधांतरी असल्याने या क्षणी हिटलर नेताजींना सक्रिय मदत करू इच्छित नव्हता व शकतही नव्हता. हिटलरने असे सुचविले की जर्मनी, व हिटलर जातीने नेताजींना पूर्वेत सुखरूप नेऊन पोचविण्याची व्यवस्था करेल. हवाई मार्गाने जाणे अती-धोक्याचे असल्याने नेताजींनी मार्ग खडतर व वेळखाऊ असला तरी पाणबुडीने प्रवास करून पूर्वेत जावे असे सांगण्यात आले. A H East West

दरम्यान नेताजींनी जपानशी संधान बांधले होते. जपानचा जर्मनीतील राजदूत कर्नल सातोशी यामामोटो याने पूर्वीच म्हणजे जानेवारी १९४२ मध्येच नेताजींना आपल्या वकिलातीत आमंत्रीत केले होते व इंग्रजांचा पहारा चुकवून आल्याबद्दल अभिनंदन करीत बर्लिनमध्ये त्यांचे स्वागत केले होते. इकडे पूर्वेतील परिस्थितीही झपाट्याने बदलत होती. ७ डिसेंबर १९४१ ला जपानने पर्ल हार्बरवर जबरदस्त हल्ला चढवून दोस्त राष्ट्रांना खुले आव्हान दिले होते. तातडीने हालचाली करीत जपानी सैन्याने ११ फेब्रुवारी १९४२ रोजी सिंगापूर काबीज केले होते व ४५ हजार सैन्य इंग्रजांनी जपानच्या स्वाधीन केले होते. पैकी १५ हजार हिंदी सैनिकांनी राशबिहारी, प्रितमसिंह व मोहनसिंह यांच्या प्रतिसादाला उत्तर म्हणून आझाद हिंद सेनेत प्रवेश केला होता. आता पूर्वेला प्रतीक्षा होती ती नेताजींच्या आगमनाची. अखेर ८ फेब्रुवारी १९४३ रोजी नेताजी आपला विश्वासू सहकारी अबिद हसन याच्यासह कील बंदरातून खोल समुद्रात उभ्या असलेल्या यू १८० पाणबुडीकडे छोट्या यांत्रिक बोटीतून निघाले.



आझाद हिंद सेना ९ - जपानचा झंझावात आणि आझाद हिंदची उभारणी


दिनांक ७ डिसेंबर १९४१. जपानी आरमाराने पर्ल हार्बर येथील अमेरिकेच्या नाविक तळावर अनपेक्षित असा जबरदस्त हवाई हल्ला चढवला आणि बलाढ्य अमेरिकी आरमाराचे बघता बघता तीन तेरा वाजवून टाकले. pharb2हा हल्ला इतका भयंकर आणि विद्युतवेगाने झाला की पर्ल हार्बर जवळील ओहाऊ तळावरील दोनशे विमानांपैकी दीडशे विमाने बरबाद केली; पैकी निदान ३८ विमाने प्रतिकारासाठी आकाशात तरी उडाली होती, बाकीची जागीच उध्वस्त झाली. असाच भयानक विध्वंस फोर्ड बेटावरही झाला. खुद्द पर्ल बंदरात अमेरिकी आरमाराच्या ऍरिझोना, व्हर्जिनीया, कॅलिफोर्निया, ओक्लाहोमा अशा एकूण ज्या ८६ युद्धनौका उभ्या होत्या. त्यापैकी बहुसंख्य बुडल्या तर उरलेल्या निकामी झाल्या. खरेतर हा हल्ला अनपेक्षित अजिबात नव्हता. जपानने हा हल्ला आत्यंतिक गुप्त राखला असला तरी त्याचे नियोजन व अंमलबजावणी जबरदस्त व परिपूर्ण होती. मात्र अमेरिकी नौदलाला हला होणार याचा काहीसा सुगावा लागलेला होता. अमेरिकी नौदलप्रमुख स्टॉर्क याने २-३ महिने आधीच पर्ल हार्बरचा नाविक तळ प्रमुख pharb4ऍडमिरल किनेल व पायदळ प्रमुख लेफ्टनंट कर्नल शॉट यांना तशी स्पष्ट कल्पना दिलीही होती मात्र फाजील आत्मविश्वासामुळे त्यांनी या इशाऱ्याकडे फारसे लक्षच दिले नाही. खुद्द ७ डिसेंबरच्या पहाटे गस्तीची विमाने व रॅड ही गस्तनौका गस्तीवर असताना त्यांना एक जपानी पाणबुडी दिसली, ती त्यांनी बुडविली, मात्र पुढे काहीच शोध घेतला गेला नाही.

ही तर सुरुवात होती; या निमित्ताने दुसरे महायुद्ध आता खऱ्या अर्थाने आशिया खंडात व प्रशांत महासागरात येऊन धडकले. pharb5 अमेरिकेने जपानविरुद्ध युद्धाची घोषणा केली. अर्थात जपान आपल्या संपूर्ण तयारीनिशी व सागरी सामर्थ्यावर विश्वासून युद्धात उतरले होते. पर्ल हार्बरच्या हादऱ्यातून अमेरिका सावरत असतानाच जपानने सयाम, फिलिपाईन्स, सिंगापूर व मलाया अशी जबरदस्त मोहीम सुरू केली. १ जानेवारी १९४२ रोजी मनिलावर जपानी ध्वज चढला आणि अमेरिकी सेना बाहेर पडली. इंडोचायना तर आधीच जपानच्या आधिपत्याखाली गेला होता. जपानी बॉंबफेकी विमाने सयाम, मलाया व सिंगापूर भाजून काढत असतानाच जपानी आरमारावर अचानक हल्ला चढवून, त्यांना बेसावध गाठून जपानला शह देण्याच्या योजनेनुसार सयामच्या आखातात ब्रिटनने आपल्या रिपल्स व प्रिन्स ऑफ वेलास या युद्धनौका घुसवल्या खऱ्या; पण आकस्मिक हल्ला त्वरेने करण्यासाठी त्यांनी विमानवाहू नौका न नेण्याचे धाडस केले व नेमके तेच त्यांच्या अंगाशी आले! वेडे होऊन तुफान बॉंबफेक करणाऱ्या पेटलेल्या जपानी वैमानिकांनी या दोन्ही बलाढ्य युद्धनौकांना सागराचा तळ दाखवला आणि ब्रिटनच्या सामर्थ्यवान समजल्या जाणाऱ्या नौदलाला जबरदस्त हादरा बसला. मलाया, बोर्निओ नंतर जपानचा रोख वळला तो हॉंगकॉंगवर. १२ डिसेंबर ते २५ डिसेंबर घनघोर लढाई करून, विमाने व आरमारी ताकद आपल्या लष्कराच्या दिमतीला देत १५ दिवसात ब्रिटिशांचे हॉंगकॉंग अखेर पडले. हॉंगकॉंग साठी जपान इतके इरेला पेटले होते की वेढा चालू असताना एकदा मागच्या अंगाने चुंगकिंग येथून चिनी सेना हल्ला करणार अशी खबर आली तरी आपल्या सैन्यावर विश्वास असलेल्या जपानने त्याची दखलही घेतली नाही. आता क्रम होता सिंगापूरचा! ३ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी असा जबरदस्त संग्राम केल्यानंतर अखेर ब्रिटिशांना जपानी आक्रमण थोपवणे अशक्य झाले. मलाया-सिंगापूर संग्रामात प्रकर्षाने उल्लेख करावा अशी गोष्ट म्हणजे फिलिपाईन्समध्ये स्थानिक इंग्रजांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून लढले तर मलाय जनता या युद्धात साफ तटस्थ होती, निष्क्रिय होती आणि त्यांनी ब्रिटनला यत्किंचितही मदत केली नाही. इंडियन इंडिपेन्डन्स लीगच्या कार्याचा हा प्रभाव असे म्हणायला पुष्टी आहे कारण लीगने आशियात स्थायिक असलेल्या हिंदी जनतेत फार मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण करून त्यांची अस्मिता चेतविली होती. अर्थातच ते भारतावर अत्याचार करून भारताला गुलामीत जखडवणाऱ्या ब्रिटनला आपला शत्रू मानत होते व त्यांचा पराभव पाहायला उत्सुक होते.

१९४० ते १९४३ या कालखंडात पूर्वेकडे आय आय एल म्हणजेच इंडियन इंडिपेन्डन्स लीग ने आपले संघटनाजाल ब्रह्मदेश, थायलंड, मलाया,चीन, जपान असे सर्वत्र पसरवले होते. बॅंकॉक येथे मुख्यालय असून सरदार अमरसिंग व सरदार प्रितमसिंग हे या भूमिगत संघटनेचा कार्यभार सांभाळत होते. त्यांना थामुरा या जपानी सेनाधिकाऱ्याने उत्तम सहकार्य दिले व त्यांच्या गुप्त भेटी वारंवार घडत गेल्या. १९४१ मध्ये नेताजी इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन बर्लिनमध्ये प्रकटल्याचे वृत्त समजताच आझाद हिंद संघटना (आय आय एल) तर आनंदाने व उत्साहाने प्रफुल्लित झालीच पण जपाननेही आपल्या बर्लिन मधील वकिलातीला जर्मनीतील भारतीयांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. लगोलग इंपिरीयल जनरल हेडक्वार्टर्स ने तातडीने आझाद हिंद संघटनेशी संपर्क साधला. याच सुमारास म्हणजे ऑगस्ट मध्ये ब्रिटन, हॉलंड व अमेरिकेने संयुक्त कारवाई सुरू केली आणि दक्षिणपूर्व आशियातील परिस्थिती तंग झाली, यावर मात करण्यासाठी जपानने कर्तबगार लष्करी अधिकाऱ्यांची एक तुकडी तातडीने बॅंकॉकला रवाना केली, तिचे नेतृत्व करीत होते मेजर फुजीवारा. या तुकडीला शिटा किकान ऑर्गन असे नांव होते. थामुरा यांच्या मार्फत शिटा किकान व आझाद हिंद संघटना यांचे संबंध जवळचे आणि परस्पर सहकार्याचे झाले. या शिटा किकानला व जपान सरकारला आशियातील भारतीय स्वातंत्र्य चळवळ व बर्लिनस्थ नेताजी यांच्याविषयी विशेष आस्था होती. बृहन पूर्व आशियाई युद्धाला तोंड फुटण्यापूर्वी आझाद हिंद संघटनेचे प्रितमसिंग व जपानी सेनाधिकारी यांच्यात रीतसर करार झाला व पुढे या कराराची कलमे नेताजींनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारल्यानंतरही मान्यताभूत ठरवली व अनुसरली. त्यामुळेच हा करार अतिमहत्त्वाचा ठरतो. या कराराची कलमे बव्हंशी रूपाने पूर्वरंग या लेखात नमूद केलेली आहेत.

८ डिसेंबर १९४१ रोजी जपानने दोस्त राष्ट्रांविरुद्ध युद्ध जाहीर केले व इंपीरिअल जनरल हेडक्वार्टरने तातडीने आपल्या फौजांना सर्व आघाड्यांवर चढाया करायचा आदेश दिला. एकीकडे जपानी सेना मलायावर तुटून पडली तर दुसरीकडे एफ. किकान व आझाद हिंद संघटनेने थायलंडमध्ये संयुक्त आघाडी उभारून मुसंडी मारली. १० डिसेंबर रोजी थाई-मलायी सीमेवरील यजयी शहरात प्रथमच भव्य भारतीय राष्ट्रीय निशाण फडकले, जपानी व हिंदुस्थानी भाषेत ’आझाद हिंद संघटना हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी लढा देत आहे असे फलक लागले. या प्रसंगाधारे प्रथमच गुप्त कारवाया करणाऱ्या आझाद हिंद संघटनेने आपले कार्य व उद्दिष्ट जाहिरपणे प्रकट केले. १४ डिसेंबर ला अरोलुआत्राच्या (अलोरस्टार?) जवळ एका रबर मळ्यांत जपानी सेनेने इंग्रज फौजेला गाठले. ही कर्नल फिट्झपॅट्रीकच्या हुकुमतीखालची १/१४ पंजाब रेजिमेंट होती. या जबरदस्त गनिमी हल्ल्यात कर्नल फिट्झपॅट्रीकने शरणागती पत्करली. जपानी सेनेने फौजेला घेरले, मात्र त्यांना कैद न करता ’इंडो इंडो’ असा गलका केला व त्यांना अभय दिले असल्याचे सांगितले. मेजर फुजीवाराने दुभाषामार्फत सर्वांना आवाहन केले की जपान हे राष्ट्र हे हिंदुस्थानचे मित्रराष्ट्र असुन ते त्याच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांना सर्वतोपरी साहाय्य देणार आहे, तेव्हा इंग्रजी हुकूम मोडीत घाला आणि आपल्या देशासाठी आपले सैन्य म्हणून लढा. इंग्रजांच्या हुकुमतीत, इंग्रज अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करत असताना ब्रिटिश सैनिकांच्या मानाने हिंदुस्थानी सैनिकांना मिळणारी दुय्यम वागणूक, अधिकार न मिळणे, कमी लेखले जाणे, गोऱ्यांकडून अपमान होणे हे या बटालियनमधील कॅप्टन मोहनसिंग यांना फार सलत होते. आपण आपला जीव आपल्याला गुलामीत जखडणाऱ्या इंग्रजांच्या जयासाठी का ओवाळून टाकायचा? हा प्रश्न आता त्यांना वारंवार सतावु लागला होता. हे लेकाचे आपली सेवा संपवून गलेलठ्ठ मानधन व निवृत्तिवेतन घेऊन आपल्या बायका मुलांसमवेत मजेत ब्रिटनला निघून जातील आम्ही मात्र यांच्यासाठी टाचा घासत मरायचे? यांची अरेरावी, उद्धट वर्तन निमूट सहन करायचे? का? का? का? जेव्हा या तुकडीवर जपानी सेनेने हल्ला केला, वरून तुफान बॉंबफेक केली तेव्हा एकही ब्रिटिश लढाऊ विमान या सैनिकांना हवाई छत्र देण्यासाठी आले नव्हते याचा संताप त्यांना आला होता. अशा परिस्थितीत जेव्हा मेजर फुजीवाराने जेव्हा एफ. किकान व जपान-हिंदुस्थान सौहार्द्राविषयी निवेदन करून आपल्या देशासाठी लढणाऱ्या आझाद हिंद संघटनेत सामील होऊन आपल्या हिंदुस्थान साठी लढण्याचे आवाहन केले तेव्हा ते विलक्षण प्रभावित झाले. मोहनसिंगांना या भावी सेनेचे सेनापतिपद व सर्वोच्च पद देऊ केले गेले व लवकरच ते जनरल मोहनसिंग झाले. मात्र मोहनसिंगांना जेव्हा जपानी अधिकाऱ्यांनी त्यांनी हिंदुस्थानी उठावाचे नेतृत्व करावे असे सुचविले तेव्हा मात्र मोहनसिंगांनी स्पष्ट सांगितले की नेताजी आता भारताबाहेर पडले असून त्यांना इकडे आणावे व तेच खरे नेते म्हणून पात्र आहेत आणि हिंदुस्थानी स्वातंत्र्यसंग्रामाचे नेतृत्व करण्याची क्षमता केवळ त्यांच्याचकडे आहे, ते इतर कुणाला पेलणारे नाही. मात्र मोहनसिंगांनी भरती होऊ पाहणाऱ्या सैन्याचे नेतृत्व स्वीकारायला होकार दिला व सैन्य उभारणीची जबाबदारी स्वीकारली.

मलाया सीमेवर जपान-भारत संयुक्त लष्कराचे यश पाहता लष्करी अधिकाऱ्यांनी इंपीरिअल जनरल हेडक्वार्टरला पाठवलेल्या विशेष अहवालात नमूद केले की संयुक्त आघाडी निश्चित अधिक फलदायक आहे. या अहवालात असेही म्हटले होते की जपानी सेना ब्रह्मदेशापर्यंत इंग्रजांना हुसकून त्यांचा पराभव करू शकेल. मात्र इंग्रजांना पुरते नेस्तनाबूत करण्यासाठी जपानी सेनेला मग ब्रह्मदेश सरहद्द ओलांडून हिंदुस्थानात जावे लागेल; मात्र भारतीय जपानचा प्रतिकारच करतील व इंग्रजांना ते फायद्यात पडेल. यापेक्षा जर आझाद हिंद सेना व जपान अशी संयुक्त आघाडी असेल तर ते अधिक सुकर होईल. अशा तऱ्हेने संयुक्त आघाडी प्रत्यक्षात आली.

"एकच पर्याय - तात्काळ बिनशर्त शरणागती!"

BritishSurrender[1]

कर्नल यामाशीटा इंग्रजांची बिनशर्त शरणागतीसाठी २४ तासांच्या मदतीची मागणी धुडकावुन लावताना. समोर पाठमोरा ले. ज. आर्थर पर्सिवल.

अखेर १५ फेब्रुवारी १९४२ ला सिंगापूर पडले व ब्रिटिश सैन्याने संपूर्ण शरणागती पत्करली व आपले सैन्य जपानच्या स्वाधीन केले. मुकाट्याने मान खाली घालून लेफ्टनंट जनरल आर्थर पर्सिवल सिंगापुरात बिनशर्त शरण आला. सुमारे ४५००० भारतीय युद्धकैदी १७ फेब्रुवारी रोजी फारेर मैदानावर जमा करण्यात आले व एक विराट सभा आयोजित केली गेली. या सभेत एफ किकानचे अधिकारी व स्वतः: मेजर फुजीवारा यांनी भाग घेतला. याच सभेत इंग्रज सेनाधिकारी कर्नल हंट यांनी ब्रिटनची शरणागती जाहीर करताना आपल्या सैनिकांना असे सांगितले की यापुढे ते आपली सेना जपानी सेनेच्या स्वाधीन करीत असून सैनिकांनी यापुढे जपानी सैन्याचे हुकूम मानावेत. आयुष्यभर इंग्रजांची इमानाची चाकरी करणारे हिंदी सैनिक यामुळे कमालीचे दुखावले गेले. ज्यांच्या साठी आम्ही रक्त सांडले, आपले घरदार सोडून वणवण करीत फिरलो ते कृतघ्न इंग्रज असे आम्हाला एकाएकी वाऱ्यावर सोडतात? ते आम्हाला शत्रूच हाती कसे काय सोपवू शकतात?

मेजर फुजीवारा यांनी जपानी भाषेत अत्यंत आवेशपूर्ण भाषण केले ज्याचे भाषांतर तत्काळ सैनिकांना ऐकविण्यात येत होते. fujiwara speech

निहॉनचा होनामारु आणि हिंदुस्थानचा तिरंगा एकत्र फडकताना

Indo_Nippon

भारतीय सैनिकांना भावनिक आवाहन करताना फुजीवारा यांनी असे आवाहन केले की यापुढे जपान व हिंदुस्थान हे मित्र आहेत आणि आपल्या मित्राच्या स्वातंत्र्यसंग्रामात जपान पाठीशी खंबीरपणे उभे राहून सर्वतोपरी मदत करणार आहे. सैनिकांनी आता जागे व्हावे व आपल्या देशासाठी लढण्यासाठी सज्ज होऊन इंग्रजी गणवेश व गुलामी झुगारून द्यावी. याच सभेत मोहनसिंग तसेच प्रितमसिंग यांचीही प्रभावी व जोषपूर्ण भाषणे झाली. फुजीवारांपठोपाठ प्रितमसिंगांचे भाषण झाले व त्यांनीही निर्णायक वेळ येऊन ठेपली असून जर आत्ता योग्य निर्णय घेण्यात चूक केली तर अशी संधी पुन्हा कधी येईल ते सांगता येणार नाही व फार उशीर होईल, तेव्हा हिंदुस्थानच्या सुपुत्रांनो आपल्या देशासाठी लढायला सज्ज व्हा असे आवाहन केले. प्रितमसिंगांचे कळकळीचे व अंत:करणापासूनचे भाषण ऐकून उपस्थित हिंदी शिपायांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्यानंतर मोहनसिंगांचे भाषण झाले व त्यांनी आपण जसे जागे झालो तसे तुम्हीही जागे व्हा व परक्यांची चाकरी सोडून आपल्या देशासाठी लढा व आयुष्याचे सोने करा असे आवाहन केले. बघता बघता सैनिक पुढे येऊ लागले आणि स्वातंत्र्य सेना आकारास आली.याचा परिणाम म्हणजे असंख्य हिंदी शिपायांनी ब्रिटिश सैन्याच्या चाकरीपेक्षा आपल्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सामील होण्याचे व देशासाठी लढत वीरमरण पत्कराचे ठरवले. अर्थात इंग्रजी अपप्रचार व संशयाचे वातावरण यामुळे तसेच परिस्थितीचे नीट आकलन न झाल्याने अनेकांनी युद्धकैदी म्हणूनच राहणे पसंत केले. मात्र विचाराअंती व देशाचा विचार करून अनेक धुरंधर सामील होत गेले जे पुढे आझाद हिंद सेनेचे नाव सुवर्णाक्षरात लिहिणार होते; ते होते झमन कियानी, शहानवाझ खान, गुरुबक्षसिंग धील्लॉं, प्रेम सेहगल,जगन्नतथराव भोसले...

आतापर्यंत आझाद हिंद संघटनेच्या लष्करी अंगाला स्वातंत्र्य संग्रामसेना/ मुक्तिसेना अशी नावे होती. मात्र यापुढे हिंदुस्थानसाठी लढणाऱ्या सेनेला मोहनसिंगांनी ’आझाद हिंद सेना’ - इंडियन नॅशनल आर्मी असे नाव सुचविले व जपानने ते तत्काळ मान्य केले. सर्वत्र एक नवा जोष, नवा उत्साह निर्माण झाला. आता हालचालीमध्ये सुसुत्रता व वेग येण्यासाठी आझाद हिंद संघटना व आझाद हिंद सेना यांचे मुख्यालय सिंगापूर येथे हालविण्यात आले व मोहनसिंगही सिंगापुरात आले. आझाद हिंद सेनेचा विस्तार व विकास यासाठी मोहनसिंगांनी अथक परिश्रम घेतले व आझाद हिंद सेना सक्षम केली. २० मार्च १९४२ मध्ये आशियातील भारतीय स्वातंत्र्यप्रेमीचे संमेलन टोकियो येथे भरवले गेले, त्याचे प्रमुखपद राशबिहारींकडे होते. या परिषदेला बॅंकॉक हून विमानाने टोकियोला जात असताना ग्यानी प्रितमसिंग व कॅप्टन अक्रमखान व स्वामी सत्यानंद पुरी होनासू बेटावरील चक्रीवादळात विमान सापडल्याने मृत्युमुखी पडले व आझाद हिंदला एक मोठा धक्का बसला. यामुळे परिषदेवर विषण्णतेचे सावट आले. राशबिहारींना व मोहनसिंगांनी या परिषदेसाठी विशेष परिश्रम घेतले होते.

राशबिहारी व मोहनसिंग

rash behri-mohan singhसुरुवातीला या परिषदेवर तीन देशभक्त अचानक साथ सोडून या जगातून निघून गेल्याचे दु:ख होते, त्याचा विसर पडावा अशी एक घटना या परिषदेच्या दरम्यान घडली आणि ती म्हणजे जर्मनीतुन आलेला नेताजींचा या परिषदेसाठीचा शुभसंदेश. या परिषदेत जपान सरकारने हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य संग्रामाला, सार्वभौमत्वाला संपूर्ण पाठिंबा जाहीर करावा असा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र टोजो सरकारकडून कुठलेच उत्तर मिळत नव्हते.



आझाद हिंद सेना १० - जडणघडण, संकट व नव्याने उभारणी


संकटे कधी एकटी येत नाहीत असे म्हणतात, ती येतात तेव्हा चोहीकडुन आपले सगेसोबती घेउनच येतात. एकीकडे टोकियो परिषदेला येत असताना विमान अपघातात ग्यानी प्रितमसिंग, अक्रमखान, निळकंठ अय्यर व स्वामी सत्यानंद पुरी यांचे अपघाती निधन तर दुसरीकडे टोकियो परिषदेतील अपेक्षाभंग अशा अप्रिय व प्रतिकुल घटना घडल्या असतानाच तिसरी प्रतिकुल घटना घडली आणि ती म्हणजे आझाद हिंद संघटना व हिंदुस्थान स्वातंत्र्य संघर्ष आणि तमाम हिंदुस्थानी कार्यकर्त्यांवर पितृवत प्रेम करणारे 'एफ किकान' चे प्रणेते मेजर फुजीवारा यांची दुसरीकडे बदली झाली. त्यांच्या जागी कर्नल इवाकुरो हे आले. मात्र तेही या लढ्याला अनुकुलच होते हे सुदैव म्हणावे लागेल. त्यांनी असे ठरविले की नेताजींना पूर्वेत पाचारण करून या संग्रामाचे नेतृत्त्व सोपवावे कारण तेच या महासंग्रामाला सर्वार्थाने योग्य दिशा व गती देतील आणि पूर्णत्त्वालाही नेतील. जपानने याआधी मान्य केल्याप्रमाणे त्यांनी या कार्यात सुसूत्रता आणायचे ठरविले. प्रथमत: त्यांनी टोकियो ठरावाला अनुसरून अतिपूर्वेकडील भारतीय प्रतिनिधींची बैठक आयोजित केली. ही महासभा सिंगापूरच्या रॉयल कॉर्न सभागृहाच्या समोरील चौकात दि. १५ मे १९४२ रोजी भरणार होती. या सभेस अक्ष राष्ट्रांचे प्रतिनिधी म्हणुन ट्युबोसगामी तसेच टोकियो, हॉंगकॉंग, सिंगापूर, मलाया, शांघाय, बॅंकॉक, बोर्निओ, जावा व फिलिपाईन्स येथील २००० भारतीय प्रतिनिधी उपस्थित होते. महान क्रांतिकारक श्री. राशबिहारी बोस हे या सभेचे अध्यक्ष होते. सर्व प्रतिनिधींची आवेशपूर्ण भाषणे झाली आणि हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरूद्ध युद्ध पुकारण्याचा पुनरूच्चार झाला. या सभेसाठी जपान सरकार तसेच सष्करी अधिकारी यांचे संदेश आले होते, सर्वात महत्त्वाचे म्हणजे नेताजींचा संदेशही आला होता. आपल्या संदेशात नेताजींनी जपान सरकारच्या पाठिंब्या बद्दल स्माधान व्यक्त केले होते तसेच भारतीय स्वातंत्र्य म्हणजे ब्रिटिश साम्राज्याचा पराभव व त्यासाठी अखेर हाती अखेर शस्त्रच घ्यावे लागेल. आजची ही सभा म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा एक विजयस्तंभ ठरेल असे भाकीतही त्यांनी केले होते.

या सभेनंतर तीन दिवसांची एक गुप्त बैठक झाली व त्यात जपान सरकारला सादर करण्यासाठी एक साठ कलमी योजना शब्दबद्ध केली गेली. हिंदुस्थानचे हंगामी सरकार स्थापन होणारच, ते झाल्यावर आर्थिक मदत अपरिहार्य आहे व हे पैसे जपानने भारत सरकारला परतीच्या अटिवर द्यावेत अशी मागणी एक प्रमुख मागण्यांपैकी होती. दुसरी मागणी जपानने आझाद हिंद सेना हे सुसज्ज लष्कर होण्यास मदत करावी कारण आजची ही स्वातंत्र्य सेना म्हणजे स्वतंत्र हिंदुस्थानचे भावी लष्कर असेल व ते जपानी सैन्याच्या तोडीस तोड असले पाहिजे. मात्र टोकियो परिषदेत समजल्याप्रमाणे अजुनही जपान सरकारचे व लष्करी अधिकाऱ्यांचे निश्चित एकमत न झाल्याने त्यांना या मागण्यांना ठाम असे उत्तर देता येत नव्हते. या संग्रामावर आपली पकड असावी, आपला प्रभाव असावा असे टोजो यांचे प्रारंभिक मत होते व त्यामुळे ते सततच्या मागण्यांनी अस्वस्थ झाले होते. आझाद हिंदच्या बाजुने बोलणारे जपानी लष्करी अधिकारीही त्यांना खटकु लागले व बहुधा मेजर फुजीवारा यांची बदली त्यामुळेच झाली असावी. या मुळे आशियातले भारतीय व जपान यांच्या एकोप्यात किंचित दुरावा येऊ लागला. अनेकदा दुभाष्याच्या चुकांमुळे गैरसमज वाढले. पुढे जपान व आझा हिंद सेना हे एकत्र लढले, जपानने सर्वतोपरी युद्धात स्वत:ला झोकुन दिले तरीही हा दुरावा पूर्णतः मिटला नाही.

मात्र काहीही झाले तरी अंतिम उद्दिष्ट गाठण्यासाठी लष्करी संग्राम हा एकच पर्याय आता उरला होता या विषयी दुमत नव्हते. आणि युद्ध करायला महायुद्धाच्या धामधुमीसारखी सुवर्णसंधी नव्हती. जपानची मदत मात्र आवश्यकच होती आणि ती मिळेपर्यंत जो काही वेळ लागेल तो नुसता चर्चा वा निराशेत घालविण्यापेक्षा आझाद हिंद संघटनेचे प्रयत्न व विचारविनिमय अव्याहत सुरू होते. पुढील पावले ठरविण्यासाठी १५ जून १९४२ रोजी बॅंकॉक येथे शिल्पकर्ण नाट्यगृहात नऊ दिवसांची परिषद झाली तिला जपानहून राशबाबू, आनंद मोहन सहाय, ज्ञानेश्वर देशपांडे (हे हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्ताक सेनेचे स्मकालीन व क्रांतिकारकांच्या संपर्कात होते. ते जुजुत्सुचे शिक्षण घेण्याच्या निमित्ताने १९३० च्या सुमारास जपानला रवाना झाले होते. पुढे ते जपानमधील हिंदुस्थानी कार्यकर्त्यांनी चालविलेल्या चळवळीत सहभागी झाले), एन एस सेन असे एकुण दहा जण आले होते. एकंदर सव्वशेहून अधिक भारतीय प्रतिनिधी त्यात सहभागी झाले होते. यांच्या बरोबरीने जपान, जर्मनी, इटली, थायलंड या देशांचे राजकिय प्रतिनिधीही सहभागी झाले होते. व्यापारानिमित्ताने पूर्वेत स्थायिक झालेले अनेक भारतीय या परिषदेत आवर्जुन उपस्थित होते. पोटासाठी देश सोडुन दूर आले तरी त्यांना हिंदुस्थानचे स्वातंत्र्य प्रत्येक भारतीया इतकेच प्रिय होते. या परिषदेला शुभ्र साड्या नेसलेल्या व डोक्यावरून पदर घेतलेल्या काही भारतीय महिलासुद्धा आल्या होत्या. सजवलेल्या नाट्यगृहात गांधी, नेहरु, मौलाना आझाद या नेत्यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या तर लोकमान्य टिळकांचे 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे' हे वचन ठसठशीत अक्षरात फलकावर लिहिले होते. परिषदेचे अध्यक्ष म्हणून अर्थातच या संग्रामाचे जनक राशबिहारी यांची एकपताने निवड झाली. थायलंडचे उपपरराष्ट्रमंत्री विचित्रवडकर्ण यांनी पंतप्रधान विपुलसंग्राम यांचा पाठिंबादर्शक संदेश वाचुन दाखवला. स्वागत समितीचे अध्यक्ष श्री देवनाथ दास यांनी विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आझाद हिंदच्या आधारस्तंभांना - ग्यानी प्रितमसिंग, कॅपटन अक्रमखान, स्वामी सत्यानंद पुरी आणि नीलकंठ अय्यर याना श्रद्धांजली वाहिली. नेताजींनी बर्लिन रेडिओ वर केलेल्या भाषणाप्रमाणे आता प्रत्येक भारतीयाला निर्णय घेण्याची वेळ आली आहे, आता तटस्थ राहुन चालणार नाही असे प्रतिपादन केले. राशबाबूंनी अक्ष राष्ट्रांचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे जाहिर केले. या परिषदेचे आमंत्रण नेताजींनाही पाठविले गेले होते व उत्तरादाखल पाठविलेल्या संदेशात नेताजींनी असे म्हटले होते की प्रत्यक्ष येणे सध्या शक्य नसल्याने ते आझाद हिंद संघाच्या सर्व युरोपिय शाखांच्या वतीने हा संदेश पाठवित आहेत. त्या संदेशात ते असे म्हणत होते की अक्ष राष्ट्रांचा पाठिंबा आवश्यक व स्वागतार्हच आहे पण अखेर हा लढा हिंदुस्थानीयांना स्वत:च लढायचा आहे. ब्रिटिशांविरूद्ध लढणाऱ्या सर्व शक्ति भारताच्या मुक्तिला एकप्रकारे उपकारकच आहेत.आता हातात शस्त्र घेण्याची वेळ आली असून मिळेल ते शस्त्र मिळेल तिथुन घेउन संग्रामाला सज्ज होणे हे आता प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. आता पुढे निघालेल्या भारतीय सैन्याला कुणीही अडवु शकणार नाही. हा संदेश ऐकताना श्रोत्यांची अंत:करणे हेलावून गेली. आता आझाद हिंद सेनेचे कार्यक्षेत्र, रचना, तिच्यावरील नियंत्रण हे सगळे ठरविण्यासाठी एक कृती समिती स्थापन करण्याते आली. तिचे अध्यक्ष राशबाबू होते तर एन. राघवन. के. पी. के. मेनन. कॅप्टन मोहनसिंग व कर्नल गुलाम कादिर जीलानी हे सदस्य होते. अझाद हिंद सेनेचे सर्व अधिकारी हे आझाद हिंद शंघाचे सदस्य असतील व ब्रिटिशांविरुद्ध भारतात तसेच भारताबाहेर लढणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य असेल असे ठरवले गेले. स्वतंत्र व अखंड भारताची निर्मिती करण्याकरीता ऐक्य, श्रद्धा व त्याग ही त्रिसूत्री ब्रीदवाक्य म्हणुन स्विकारली गेली. भारतीय राष्ट्रसभेचा तिरंगा हाच आझाद हिंद सेनेचा ध्वज असावा असे ठरले. याच परिषदेत पूर्वेच्या राष्ट्रांच्या मदतीने या परिषदेने नेताजींना जर्मनीतून पूर्वेत आणण्यासाठी बोलणी करावीत व लवकरात लवकरात इथे आणावे असे ठरले. बॅंकॉक येथील दोन पत्रकार एम. शिवराम व ए.ए.स. अय्यर हे परिषदेच्या तयारीत सहभागी होते. पैकी एम. शिवराम यांनी नंतर अशी माहिती दिली की त्यावेळी रेडिओ दुरध्वनीद्वारे राशबिहारी नेताजींशी बोलले व नेताजींनी त्यांना आपण तिकडे येण्यास उत्सुक असल्याचे सांगितले होते. मात्र प्रवासाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व काही अन्य कारणास्तव जर्मन त्यांना लगेच पाठवायला राजी नव्हते.

आता स्वातंत्र्य संघ आणि आझाद हिंद सेना यात काही मतभेद हे होतेच. या सर्वाचे मूळ म्हणजे जपानला आपण आपल्याला त्यांच्या हातातले कळसूत्री बनू द्यायचे का असे एका गटाला वाटत होते तर आत्ता जपानची मदत अत्त्यावश्यक आहे तेव्हा बाजारात तुरी या म्हणीनुसार कशास काही पत्ता नसताना भविष्यात जपान काय वागणुक देईल यावरुन आता वाद काढुन वा संशय धरून चालत्या गड्याला खिळ घालता कामा नये असे दुसऱ्या गटाचे मत होते. पूर्वेतल्या हिंदुस्थानी स्वातंत्र्यसंग्रामाचे नेतृत्त्व आझाद हिंद सेनेच्या मोहनसिंगांसारख्या लष्करी अधिकाऱ्याने करावे की राशबिहारींसारख्या वयोवृद्ध व अनुभवी नेत्याने करावा हाही एक प्रश्न होताच. भारतावर स्वाभाविकतः इंग्रज लोकशाही पद्धतिची छाप होती आणि या प्रथेनुसार लष्कर प्रमुख हा सार्वमताने निवडुन आलेल्या नेत्यांची आज्ञा शिरसावंद्य मानतो अस संकेत आहे. या खेरीज राशबिहारी, आनंद मोहन, राघवन, के.पी. मेनन वगैरेंच्या तुलनेत मोहनसिंग, कर्नल जिलानी, कर्नल निरंजनसिंग गिल हे लष्करी अधिकारी मुळात भारतीय लष्करातले ब्रिटिश सैन्यातले पगारी नोकर होते व आता युद्धकैदी न होता ते स्वातंत्र्यसैनिक झाले होते. असाच आणखी एक प्रश्न उपस्थित झाला होता तो म्हणजे पूर्वेकडील जपानची शाखा अधिक महत्त्वाची की थायलंड, मलाया वा ब्रह्मदेशातली शाखा महत्त्वाची?

एकिकडे या आघाडीची धास्ती खाल्लेले इंग्रज सरकार भारतीयांचे मत कलुषीत करण्याचा प्रयत्न सातत्याने करीत होते. जपान भारतीय सैनिकांना कळसूत्री बाहुले बनवत असून त्याचा गुलाम म्हणुन वापर करीत आहे तसेच राशबिहारी आदि प्रभृति म्हणजे जपानला विकले गेलेले त्यांचेच अंकित आहेत अशा बातम्या रेडिओ वरून प्रसृत केल्या जात होत्या. हेतू हाच की जनमत कलुषित होऊन हिंदुस्थानी जनतेचा पाठिंबा जपान व आझाद हिंद सेना यांना मिळु नये व त्यांना हिंदुस्थानात सहजा सहजी प्रवेश करता येउ नये. त्याचप्रमाणे या बातम्या पसरवून आझाद हिंद सेनेत बेदिली माजवून ती मोडणे असाही डाव यामागे होता. याचा नाही म्हटले तरी काही अंशी परिणाम होत होता, वातावरण अजुनही अविश्वासाचे होते. आझाद हिंद सेनेचा एक गुप्तचर विभाग ब्रह्मदेश आघाडीवर ब्रिटिशांच्या सेनेत प्रवेश करुन बातम्या काढत असतानाच त्यांच्यातले काही जण ब्रिटिशांना सामिल झाले असल्याचे लक्षात आल्याने पळत ठेवून काही फितुरांना पकडण्यात आले. त्यात कर्नल गिल होते, जे मोहनसिंगांचे निकटवर्तीय होते. मुळात अनेक वर्षे घरदार सोडुन सैन्यात वणवण करत असलेले व अस्वस्थ झालेले मोहनसिंग यामुळे बिथरले ब त्यांनी प्रत्यक्ष राशबिहारींवर जपानी दूत असल्याचा आरोप केला. हरप्रकारे समजुत घालुनही मोहनसिंगांचा संशय संपत नव्हता. राशबिहारी हा तीस वर्षे देशाबाहेर राहिलेला व जपानचे नागरिकत्व घेतलेला माणुस आहे, त्यावर निष्ठावंत असल्याचा विश्वास कसा ठेवायचा? असे मोहनसिंग विचारु लागले. काही प्रसंगी जपानी लष्कराने जबरदस्तीने आझाद हिंदच्या सैनिकांना लढाईसाठी धरुन नेले होते. हे राशबिहारींना देखिल आवडले नव्हते व मान्यही नव्हते मात्र याक्षणी जपानशी फारकत घेणे वा एकाकी लढा घेणे शक्य नाही हे पूर्णतः समजुन चुकलेल्या राशबिहारींनी संधी मिळेपर्यंततरी तडजोडीने वागायचे ठरवले होते, केवळ नाईलाज म्हणुन - आपले अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी. मात्र डोक्यात राख घातलेले मोहनसिंग काही ऐकायच्या मनस्थितित नव्हते. मोहनसिंगांनी जिलनी व राघवन यांच्यासह राजिनामा दिला व आझाद हिंद सेना बरखास्त केल्याची घोषणा केली. आतामात्र राशबाबूंना मोहनसिंगांना अटक करण्याखेरीज उपाय नव्हता. राशबिहारींनी पुन्हा एकदा नव्या उमेदीने आझाद हिंद सेना उभी केली खरी, पण त्यांचे डोळे आता नेताजींकडे लागुन राहिले होते. सद्य परिस्थितुन मार्ग काढुन पुन्हा एकदा सर्व हिंदुस्थानी सैनिकांना आपल्या ध्येयाप्रत तिरंग्याखली एकवटाचे सामर्थ्य आता फक्त नेताजींमध्येच आहे हे त्यांनी मनोमन मान्य केले होते. आझाद हिंद सेनेला व हिंदुस्थानी स्वातंत्र्य संग्रामाला आता प्रतिक्षा होती ती नेताजींची.



आझाद हिंद सेना ११ - 'प्रभु आले मंदिरी'


n and aदिनांक २० एप्रिल १९४३, पनांग बंदरातुन एक पाणबुडी गपचुप आपला तळ सोडुन आफ्रिकेच्या रोखाने निघाली. २६ एप्रिलला ती आपल्या संकेतस्थळी वेळे अगोदर दहा तास पोचली व दबा धरुन राहीली. रात्रीच्या काळोखात तीला दुसऱ्या एका पाणबुडीची चाहुल लागली. दोन्ही पाणबुड्या सावधतेने एकमेकीचा अंदाज घेत राहील्या. अखेर रात्र ओळख पटण्यात गेली. सकाळी समुद्र खवळलेला होता, लाटा प्रचंड उसळत होत्या. दोन्ही पाणबुड्या समुद्र जरा शांत होण्याची वाट पाहत एकमेकीला समांतर सरकत होत्या. समुद्र दुपारनंतर जरा शांत झाला पण पाण्बुड्या एकमेकीच्या अगदी जवळ आणणे त्या परिस्थितीत शक्य नव्हते. अखेर जपानी पाणबुडीतुन दोरखंडाने बांधलेली रबरी होडी जर्मन पाणबुडीच्या दिशेने सोडली गेली. असलेला धोका पत्करून दोन व्यक्ती आपले सामान घेउन जीवावर उदार होत, लाटांचा मारा खात त्या होडीत बसल्या. नेताजी व अबिद हसन! जपानी पाणबुडीवर कमांडर इझ्यु यांनी ओल्याचिंब नेताजींचे हार्दिक स्वागत केले. निरोप देउन जर्मन पाणबुडी परतली व जपानी पाणबुडी पूर्वेकडे निघाली. मात्र ती पनांगला न येता सबान येथे गेली व अखेर तीन महिन्य़ांच्या पाण्याखालील वास्तव्यानंतर नेतजींचे पाय प्रथमच जमिनीला लागले. p agmn

नेताजी जर्मनीतुन निघाले ही बातमी अद्याप गुप्त होती, जपानमध्येही नेताजी आपली खरी ओळख प्रकट न करता 'मॅस्युदा' या नावाने उतरले.jpn

प्रारंभिक नौदल तळावरील मुक्कामानंतर नेताजींनी ११ मे रोजी सबाना सोडले व ते १६ मे रोजी टोकियोमध्ये दाखल झाले. आता सर्वात महत्त्वाचे जर काही असेल तर राशबिहारींची भेट! अखेर टोकियोच्या नेताजी राहात असलेल्या इंपिरियल हॉटेलमध्ये ही ऐतिहासिक भेट झाली. दोन तळमळीचे देशभक्त एकमेकांना भेटले. दि. १२ व १३ जून ला झालेल्या ऐतिहासिक भेटीत रासहबिहारी व नेताजी यांची प्रदिर्घ चर्चा झाली. बहुधा राशबाबूंनी आतापर्यंतचे प्रयत्न, संघटन, विघटन, पुनर्गठन, उभे असलेले पेचप्रसंग या बद्दल या सर्वा घटनांची ईत्यंभूत माहिती नेताजींना दिली असावी. याच भेटीत राशबाबूंनी आपले वय व प्रकृती (आणि त्यांनी सांगितले नाही तरी मोहनसिंगांनी गैरसमजाने का असेना पण केलेले जपानी हस्तक असल्याचे आरोप) यामुळे आता आपली सर्व सूत्रे नेताजींच्या हाती देउन आपण स्वत: फक्त सल्लागार म्हणून काम पाहण्याची इच्छाही बोलुन दाखविली असावी. गुरूसमान असलेल्या या महान क्रांतिकारकाचा प्रत्येक शब्द नेताजींना शिरसावंद्य होता. आपल्या वंदनिय क्रांतिकारकाला वंदन करून नेतजींनी आझाद हिंद सेना व आझाद हिंद संघटना यांची जबाबदारी स्विकारली. भेटीहून परतताना राशबाबूंनी जपानी अधिकाऱ्यांना असे सांगितले की आता त्यांना खूप मोकळे झाल्यासारखे वाटत आहे, आता नेताजीच भारतीय स्वातंत्र्ययुद्धास निर्णायक रूप देतील व हा संग्राम आपल्या सक्षम, कणखर व कुशल नेतृत्त्वाने पूर्णत्त्वास नेतील. त्यांनी नेताजींना नेताजींची इच्छा असेपर्यंत जपानमध्ये राहण्यास परवानगी देण्याचा आग्रह सरकारला केला व अर्थातच जपानने त्यांना शाही पाहुणे मानले. मित्सुरु टोयमा हे राशबिहारींचे गुरु, उद्धारकर्ते व मार्गदर्शक ब्लॅक ड्रॅगन या क्रांइतिकारकांच्या संघटनेचे प्रमुख होते व आता ते वयोवृद्ध झालेले असले तरी सरकारवर त्यांची चांगलीच छाप होती.

Toyama_Mitsuru_honors_Rash_Behari_Bose[1]राशबाबूंचे आशीर्वाद आणि त्यांचे अमूल्य व तळमळीचे मार्गदर्शन यामुळे नेताजींना हुरूप आला, आपण हिंदिस्थानी स्वातंत्र्यसंग्राम अंतिम ध्येयाप्रत नेउ असा त्यांचा दुर्दम्य आत्मविश्वास द्विगुणीत झाला. या भेटीपाठेपाठ नेताजींना आता महत्त्वाच्या व उच्चपदस्थ जपानी लष्करी भेटी घेणे अत्यावश्यक होते. ते हिंदुस्थानवर स्वारी करून पूर्वसीमेवर हल्ला चढविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते.मग त्या पाठोपाठ सत्ताधिश टोजोमहाशयांची भेट. अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी झाल्या खऱ्या पण टोजो महाशयांची भेट काही सहजपणे होइना. या विषयी इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. काहींच्या मते टोजो भेट टाळत होते - कारण बॅंकॉक ठरावाची कलमे, जपानच्या काही अधिकाऱ्यांचा अलिप्तपणा व स्वारीसाठी अनुकूलता नसणे तसेच मोहनसिंग प्रकरण वगैरे. मात्र काही इतिहासकारांच्या मते नेतजी स्वत:च भेट तातडीने घेण्याच्या मागे नव्हते कारण त्यांना प्रत्यक्ष जपानमध्ये काही काळ राहुन, जनमनाचा कानोसा घेउन, अधिकारी, आपले क्रांतिकारक व संघटना यांच्या मताचा व परिस्थितीचा अभ्यास करयचा होता. अखेर दि. १० जून १९४३ रोजी टोजो - नेताजी भेट झाली. n and t या पहिल्याच भेटीत टोजोमहाशयांवर विलक्षण छाप पाडत नेताजींनी त्यांना पूर्ण जिंकून घेतले. या भेटीने विलक्षण प्रभावीत झालेल्या टोजोंनी नेताजींना जपानतर्फे सर्वतोपरी सहाय्याचे वचन दिले. टोजोंनी स्वत: नेताजींना पुन्हा एकदा म्हणजे १४ जून रोजी भेटीचे निमंत्रण दिले. या भेटीच्या वेळी परराष्ट्रमंत्री सिग्येमिट्सु आणि इतर प्रमुख लष्करी व सरकारी अधिकारी उपस्थित होते. या भेटीत पुढील कार्यक्रमाची रुपरेषा परस्पर संमतीनुसार ठरविली गेली.

दिनांक १६ जून रोजी सुरू होणाऱ्या जपानी डाएट्साठी नेताजींना सन्माननिय उपस्थित म्हणून आमंत्रित केले गेले. या प्रसंगी केलेल्या ऐतिहासिक भाषणात टोजोंनी आशियाच्या उत्कर्षाचा परामर्श घेताना त्यासाठी भारताचे स्वातंत्र्य किती महत्त्वाचे आहे हे सांगितले. याच भाषणात ते असे म्हणाले की 'हिंदुस्थान स्वतंत्र होण्याची वेळ आता दूर नाही. एकदा स्वतंत्र झाला की हिंदुस्थान स्वत:चा विकास निश्चितच स्वत: करून घेईल. मात्र त्यासाठी विशाल पूर्व आशियातील रणसंग्राम अटळ आहे आणि या संग्रामात जपान सर्व शक्तिनिशी उभा राहील'. आता सावट दूर होऊ लागले होते. जपानने आपली या युद्धातली बांधिलकी प्रकट केली होती. टोजोंच्या डाएट मधील जपानच्या मदतीविषयक पुनरुच्चाराने आधी निर्माण झालेली गुंतागुंत आता सुटत चालली होती. नेताजींना त्यांचे ध्येय आता दृष्टीपथात आलेले दिसले असावे. डाएट पाठोपाठ १९ जून रोजी खास नेताजींसाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. आपल्या हिंदुस्थानचा स्वातंत्र्यसंग्राम - त्याचे स्वरूप, कारण व सत्य परिस्थिती हे जगापुढे मांडायची जणु ही सुवर्णसंधी होती. या पत्रकार परिषेदेसाठी जपानी व परदेशी मिळुन साठ पत्रकार उपस्थित होते. या परिषदेनंतर साऱ्या जगात जाहिर झाले की नेताजी आता टोकियो मध्ये आले आहेत व ते भारतिय स्वातंत्र्य संघट्नेची धुरा सांभाळणार आहेत तसेच 'शस्त्राघाता शस्त्रच उत्तर' या उक्तिनुसार ते पूर्व आशियातुन भारतातील इंग्रजी सत्तेविरुद्ध युद्ध पुकारणार आहेत. अनेक वृत्तपत्रांनी त्यांचे गुणवर्णन केले होते व साऱ्या हिंदुस्थानी जनतेला आशेचा किरण वाटणारा लोकप्रिय व तडफदार असा वज्रनिश्चयी नेता असे त्यांचे वर्णन केले होते.

आता जपानच्या वर्तमनपत्रांमध्ये नेताजींना अग्रस्थान लाभले होते. दि. २० तसेच २१ रोजीसुद्धा नेताजींनी अनेक पत्रकार व वृत्तसंस्थांच्या भेटी घेतल्या व मुलाखती दिल्या. पाठोपाठ नभोवाणीवरून भाषणेही सुरू होती. त्यांची ही भाषणे अत्यंत परिणामकारक होती व यापूर्वी त्यांनी बर्लिन नभोवाणीवरून केलेल्या भाषणांपेक्षा ती अधिक आवेशपूर्ण व अधिक परिणामकारक होती. या सर्व भाषणांमधून त्यांनी असे आवाहन केले होते की आता प्रत्यक्ष लढायची वेळ आलेली आहे; आम्ही बाहेरून लढू व त्याचवेळी भारतीयांनी आतून लढावे. २२ जूनच्या लंडन टाईम्समध्ये असे वृत्त प्रसिद्ध झाले की ' सुभाषचंद्र हे जपानमध्ये पोहोचले असून अक्षराष्ट्रांमधील वृत्तपत्रे त्यांना मोठे यश प्राप्त होइल असे भाकित वर्तवित आहेत. टोकियोमधील त्यांची चळवळ ही आता त्यांची वैयक्तिक चळवळ नसून आता त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे केंद्र बर्लिनमधून टोकियो येथे स्थानांतरीत केले आहे असे म्हणावे लागेल. आतापर्यंत जर्मनी व इटाली हे भौगोलिक व अन्य कारणामुळे हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढ्यास सहाय्य करण्यास असमर्थ ठरले असून यापुढे बोस आपला लढा व त्याचा प्रचार जपानच्या मदतीने सुरू ठेवतील.' दुसऱ्या एका वर्तमानपत्राने असे म्हटले होते की 'बोस टोकियोत आल्याचे वृत्ताने ब्रह्मदेशस्थ भारतीयांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे.' दिनांक २१ जून रोजी नेताजींना डॉ. बा. मॉव यांची तार आली. तीत असे लिहिले होते की "आपण जर्मनीतून पूर्वेस आल्याबद्दल आपले अभिनंदन! आपण टोकियो येथुन जे निवेदन प्रसिद्ध केले आहेत त्यामुळे येथील भारतीयांच्या मनात आशा व धैर्य निर्माण झाले आहे.भारतीय आणि ब्रह्मदेशी जनता या दिवसाची फार आतुरतेने वाट पाहत होती, आता आम्हीही सिद्ध होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. स्वातंत्र्या करीता आण राष्ट्रिय सन्माना करीता ब्रह्मदेश आपल्या बाजूने व आपल्या बरोबरीने लढण्याची प्रतिज्ञा या क्षणी करीत आहे." एकुण नेताजींच्या पूर्वेतील आगमनाने संपूर्ण पूर्व आशिया खंडात नवचैतन्य निर्माण झाले होते व संपूर्ण जनतेने त्यांना आपला व आपल्या स्वातंत्र्य संग्रामाचा भाग्यविधाता म्हणुन मनोमन स्विकारले होते. आपले ४३ दिवसांचे जपानमधील वास्तव्य संपवून नेताजी राशबाबूंसमवेत दि. २७ जून १९४३ रोजी शोनान (सिंगापूर)येथे जाण्यास निघाले. s agman

जाताना त्यांनी २८ तारखेस जपान नभोवाणीवरून प्रक्षेपित करण्यासाठी एक भाषण लिहुन ठेवले होते ज्यांत त्यांनी असे म्हटले होते की ते शालेय विद्यार्थी असताना त्यांनी जपानच्या रशियावरील विजयाविषयी वाचले होते व तेव्हापासून त्यांना जपानविषयी आदर निर्माण झाला होता. आज जपान सरकार व जपानी जनतेने मी कुणीही राजकिय नेता वा राजकिय पद भुषविणारी व्यक्ती नसतानाही मला अत्यंत आदराने व सन्मानाने वागविले आहे, मी राजाही नाही वा दरबारी मानकरीही नाही, मी तर जपानला वंद्य असलेल्या बुद्धाच्या देशातला एक सामान्य नागरीक आहे. आमचे महाशत्रू असलेल्या ब्रिटन विरुद्ध जपानने युद्ध पुकारून ब्रिटनचे अपरिमित नुकसान केले आहे. ही जणु भारत हा केवळ भारतीयांचाच आहे हे आमचे ध्येय सिद्ध करण्याची परमेश्वराने दिलेली संधीच आहे असे मी मानतो. ही सुवर्णसंधी जर आता आम्ही वाया दवडली तर ती पुन्हा कधी मिळेल वा मिळणारही नाही हे सांगणे कठीण आहे आणि म्हणुनच आम्ही या संधीचा फायदा घेत शत्रूविरुद्ध लढणार आहोत आणि विजय मिळविणार आहोत. रशिया व चीन या देशांविषयी नेताजी असे बोलले की 'रशिया हा देश साम्यवादी असूनही ब्रिटिशांविरूद्ध लढण्याऐवजी त्यांच्या बाजुने लढत असल्याने तो आमच्या मनातुन उतरला आहे. चीनचा नेता मार्शल चॅंग कै शेक हा देखिल ब्रिटिशांच्या हातचे बाहुले बनला आहे आणि आमचा आदर गमावुन बसला आहे.

s swagat२७ जूनला जपान सोडलेले नेताजी व राशबाबू टप्प्या टप्प्याने विमान प्रवास करीत अखेर २ जुलै १९४३ रोजी सिंगापूरात दाखल झाले. विमानतळावर सर्वप्रथम त्यांना आझाद हिंद सेनेच्या सैनिकांनी मानवंदना दिली. प्रचंड संख्येने उत्सुक जनसमुदाय त्यांचा जयजयकार करीत होता. ४ जुलै रोजी कॅथे चित्रपटगृह निमंत्रीतांनी खच्च्चुन भरले होते व जागा न मिळालेले लोक रस्त्यावर दुतर्फा उभे होते. त्यांना सतत पडणाऱ्या पावसाची तमा नवती. त्यांच्या हातात तिरंगे होते. नेताजी व राशबाबू मोटारीतुन उतरताच लक्षावधी लोक टाळ्यांच्या गजरात त्यांचा जयजयकार करीत होते. लोकांचे अभिवादन स्विकारीत ते दोघे व्यासपीठावर स्थानापन्न झाले. स्वागत गीतानंतर पंतप्रधान टोजो यांचा संदेश वाचुन दाखविण्यात आला. राशाबाबू मग बोलायला उभे राहिले. ते म्हणाले की त्यांनी सिंगापूरच्या जनतेला असे वचन दिले होते की ते सहा आठवड्यात परर्त येतील, व त्याप्रमाणे ते आले आहेत. जर कुणी विचारेल की त्यांनी आपल्या ध्येयाप्रत जाण्यासाणी काय केले आहे? तर ते उत्तर देतिल की (नेताजींकडे बोटा दाखवित) त्यांनी ही अमोल भेट आणली आहे. राशबाबू भावनाविवश होत उद्गारले की आजचा दिवस हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुखाचा दिवस आहे; आज ते भारतीय स्वतंत्र्य संघटनेच्या अध्यक्षपदाचे त्यागपत्र देत असून यापुढे अध्यक्ष तसेच आझाद हिंदचे सेनाप्रमुख हे नेताजी असतील. यापुढे स्वतंत्र्य संग्राम हा नेताजींच्या नेतृत्त्वाखाली लढला जाईल व नेताजी यशस्वी होऊन देशाला स्वातंत्र्य मिलवुन देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आता पर्यंत सुभाष, बोस, चंद्राबोस या नावाने परिचित असलेल्या नेताजींना राशबाबूंनी सिंगापूरात नेताजी ही पदवी दिली व ती सर्वतोमुखी झाली. जो जनमानसाच्या पसंतीचा, जो संग्रामाचा नेता, जो धडाडीचा सेनापती, जो सर्वांना आदरणीय तो महान लोकनायक म्हणजेच 'नेताजी'. भाषणाचा समारोप करताना राशबाबूंनी 'इन्किलाब झिंदाबाद, आझाद हिंद झिंदाबाद' असा जयघोष केला व त्याला लोकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. उत्तरादाखल नेताजींनी सर्वप्रथम राशबाबूंचे आभार मानले, नवी जबाबदारी स्विकारल्यचे घोषीत केले व राशबाबू हे यापुढे आझाद हिंदचे प्रमुख सल्लागार असल्याची घोषणा केली. मग नेताजींनी सद्यपरिस्थितीचा आढावा घेतला आणि आपण लवकरच हिंदुस्थानचे हंगामी सरकार स्थापन करणार असल्याचे घोषीत केले.हिंदुस्थानची कोट्यावधी जनता आणि पूर्वेकडील लक्षावधी जनता तसेच आझाद हिंद सेना ज्यांची डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होती ते स्वातंत्र्यय्द्धाचे महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस सिंगापूरात येउन थडकले होते. आता आझाद हिंद व पूर्वेतील भारतीय जनतेला नवा हुरूप आला. जणु हिंदुस्थानची पूर्व सीमा त्यांना दिसु लागली होती.


आझाद हिंद सेना १२ - "चलो दिल्ली" आणि राणी लक्ष्मी पलटण

राशबाबूंनी आझाद हिंद संघटनेची सूत्रे नेताजींच्या हाती सोपवली व आपण केवळ सल्लागार म्हणून काम पाहण्याची इच्छा व्यक्त केली. एखाद्या महान तपस्व्याने लाजावे इतक्या सहजतेने राशबाबूंनी दोन तपे रक्ताचे पाणी करून उभी केलेली स्वातंत्र्य चळवळ आणि आपले सर्व निष्ठावंत कार्यकर्ते नेताजींच्या हाती स्वाधीन केले. कसलाही अहंकार न बाळगता, कसलीही आसक्ती न धरता आणि मोह न बाळगता केवळ आपले वय, आयुष्यभर खस्ता खाऊन ढासळणारी प्रकृती हे आता आपल्याला नेता म्हणून योग्य ठरवीत नाहीत तेव्हा नेताजींच्या रूपाने आज योग्य नेतृत्व उभे राहत आहे त्याच्या हाती आपल्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाची सूत्रे सोपविण्यातच आपले व देशाचे हित आहे हे ओळखून व मान्य करून त्या क्रांतिकारकांच्या भीष्माचार्याने एक नवा आदर्श निर्माण केला, विशेषतः: शरीर व बुद्धी साथ देत नसतानाही बांडगुळाप्रमाणे सत्तेला चिकटून राहणाऱ्या नेत्यांना जे भावी काळात बोकाळणार होते.

पडांगवरील मानवंदना

sgp salamiJPG sgp salami2 ५ जुलै रोजी नेताजी प्रथमच सर्वोच्च नेता म्हणून आझाद हिंद सेनेचा पाहणी करणार होते व मानवंदना स्वीकारणार होते. सकाळपासूनच सिंगापूरच्या पडांग भागात गर्दी जमू लागली. पडांग समोरील महापालिकेच्या नगर सभागराच्या (टाऊन हॉल) दर्शनी भागात आझाद हिंद संघटनेच्या स्वयंसेवकांनी मांडव घालून व्यासपीठ उभारले होते. पुढील हिरवळीवर आझाद हिंद सेनेचे वीर नेताजींना सलामी देण्यासाठी सज्ज झाले होते. दहा वाजता नेताजी आणि राशबाबू मंचावर येताच लष्करी वाद्ये वाजू लागली. हिंदी शिपायांनी आजवर अनेक इंग्रज व जपानी सेनापती व अधिकारी बघितलेले होते, मात्र हिंदी सेनापती पाहण्याचा हा त्यांच्या आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग! लष्करी पोषाखातले नेताजी ते भान हरपून पाहत राहिले. आज नव्या चैतन्याने झपाटलेले हिंदी लष्कर आपल्या हिंदी सेनापतीला सलामी देणार होते. सलामीचा भव्य सोहळा पार पडला आणि टाळ्यांच्या कडकडाटात नेताजींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. भारलेल्या आवाजात नेताजींनी बोलायला सुरुवात केली. आपल्या लष्कराची पहिली सलामी घेताना आपले ऐतिहासिक स्वप्न पुरे होत सल्ल्याचे कृतकृत्य भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. त्या दिवशी प्रथमच आझाद हिंद सेनेची अधिकृत घोषणा करण्यात आली. आतापर्यंत कुठेही, कधीही आझाद हिंद सेनेचा जाहीर उच्चार वा उदघोषणा करण्यात आले नव्हते, आज एक तेजस्वी पर्व जगासमोर साकारत होते.

5 julai

(वरील चित्र)पडांग वरील सेना, टाऊन हॉलची पार्श्वभूमी. (खाली) आजचे चित्र

sgp t hall1आपल्या भाषणात या ऐतिहासिक क्षणी आपल्या सैन्याचे अभिनंदन करताना नेताजी म्हणाले की आज या सैनिकांनी एक स्वप्न साकारले आहे, आता असेच पुढे जायचे आहे, शत्रूला मारून आपल्या राजधानीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकेपर्यंत ही वाटचाल सुरू राहणार आहे. आता लक्ष्य आहे ते एकच - दिल्ली. फ्रान्सने जर्मनीविरुद्ध युद्ध घोषित करताच त्वेषाने उठलेल्या प्रत्येक जर्मन सैनिकाच्या ओठी एकच वाक्य होते - चला पॅरिसवर. १९४१ साली सिंगापूरच्या रोखाने सुटलेल्या जपानी सैन्याच्या तोंडी एकच घोषणा होती, चला सिंगापूरला! माझ्या शूरवीरांनो, यापुढे प्रत्येक हिंदुस्थानी वीराच्या तोंडी एकच जयघोष असेल - ’चलो दिल्ली’! उत्तेजित झालेल्या लाखो कंठातून गगनभेदी प्रतिध्वनी उमटला - चलो दिल्ली! आकाशातून पावसाच्या सरी कोसळू लागल्या तरी समोरचा लक्षावधी हिंदुस्थानी लोकांचा समुदाय तसूभरही विचलित न होता जीवाचे कान करून आपल्या नेत्याचे शब्द ऐकत होता. नेताजी करारी आवाजात बोलू लागले. "बंधूंनो, स्वातंत्र्याच्या अभिलाषेने निर्माण झालेल्या सैन्यात सहभागी होण्याची संधी मिळावी याहून अधिक भाग्य गुलामांच असूच शकत नाही. माझ्या सैनिकांनो, आपल्याला केवळ देश स्वतंत्र करून थांबायचे नाही तर स्वतंत्र देशाचे संरक्षण करणारी एक बलाढ्य सेना उभारायची आहे. आपल्या भावी स्वतंत्र राष्ट्राचा असा भक्कम पाया रचायचा आहे की एखाद्या चिऱ्याला नुसतं बोट लावायचे धाडस भविष्यात कुणीही करायला धजावणार नाही. जे इंग्रज कालपर्यंत उद्दामपणे बढाया मारीत होते की याच्या राज्यावरचा सूर्य कधी मावळतच नाही, तेच इंग्रज आज आपले सिंगापूर सोडून सैरावैरा पळाले आहेत. आणि ही किमया आहे बलशाली लष्कराची. जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेच्या स्वातंत्र्यासाठी झटू शकला ते सैन्यबळावरच. गॅरिबाल्डी इटलीच्या एकीकरणाच्या कारणास्तव झुंजला तेव्हा त्याची सेना त्याच्या पाठीशी उभी होती. मात्र माझ्या बलाढ्य, अवाढव्य अशा महान देशाचे संरक्षण करायला स्वतः:ची फौज नाही ही एकच खंत माझ्या उरात आजपर्यंत सलत होती. आज तुम्ही ती दूर केली आहेत, स्वातंत्र्याच्या मार्गातील एकमेव अडसर आज तुम्ही दूर केला आहेत, आज तुम्ही एका नव्या ऐतिहासिक सत्याला जन्म दिला आहेत. ते तेजस्वी शब्द ऐकताना राशबिहारींच्या डोळ्यात वारंवार अश्रू दाटत होते. " माझ्या बंधूंनो, आज मी तुम्हाला काय देऊ शकतो? तर केवळ तहान, भूक, खडतर आगेकूच आणि मृत्यू. बस. दुसरे देण्यासारखे काहीही नाही. परंतु माझ्या साथीदारांनो, खात्री बाळगा या भयाण पर्वातल्या हाल अपेष्टांत, अंध:कारात, द:खात आणि सुखात, मंगलक्षणी अशा प्रत्येक क्षणाला मी मरेपर्यंत तुमच्या सोबत असेन. तुम्हीही जर या मृत्यूच्या छायेत माझी साथ द्याल तर मी एक दिवस तुम्हाला स्वातंत्र्याच्या आणि वैभवाच्या राजमार्गावर नक्की नेईन. या प्रवासात किती जण अंतर पार करतील ते माहीत नाही, पण जे कोणी दिल्लीत पोचतील ते हिंदुस्थानच्या हुताम्यांच्या रक्ताने रंगलेला तिरंगा लाल किल्ल्यावरचा परकीयांचा युनियन जॅक उपटून त्याच्या जागी फडकावतील. सबसे बुलंद रहेगा, तिरंगा हमारा. आता उठा, करायची वेळ आली आहे, आपल्या सर्वस्वावर पाणी सोडा आणि देशासाठी उध्वस्त व्हायला सज्ज व्हा, ’करो सब निछावर, बनो सब फकीर’. जय हिंद! आजपर्यंत अनेक हिंदी सैनिक हे शरणागताचे जीवन जगण्यापेक्षा बरे म्हणून आझाद हिंद सेनेत आले होते. अनेकांना तुरुंगातल्या हाल अपेष्टा चुकवायचा हा मार्ग सापडला होता. अनेक जण तरीही सामील होत नव्हते. खाल्ल्या मिठाला जागायची इमानी संस्कृती त्यांना आपल्या धन्याविरुद्ध लढायचा कौल देत नव्हती. मात्र नेताजींच्या त्या शब्दांनी जादू केली आणि असंख्य सैनिक स्वेच्छेने सहभागी झाले. ज्याच्या चार पिढ्या साहेब चाकरीत इमानाने राबल्या आणि जो स्वतः: राशबिहारी-नेताजींवर विश्वास ठेवायला तयार नव्हता तो शानो - शाहनवाज खान त्या दिवशी नेताजींचा गुलाम झाला आणि सेनेचे नेतृत्व करायला सरसावला.INA tops 2

हबीबूर रेहमान, मनसुखलाल, गुलाम मेहबूब, जानकी दावर, जॉन थीवी, नारायण करुपय्या (वरील ओळ)_

गुरुबक्षसिंग धिल्लन, शाहनवाझ खान, प्रेम सहगल, बॅ. यल्लाप्पा, झमन कियाणी, डॉ. लक्ष्मी(खालची ओळ)

INA tops

याच पडांगवर ९ जुलैला नेताजींनी नवा इतिहास घडवला. त्या दिवशीच्या भाषणात नेताजींनी श्रोत्यांना इंग्लंडहून परत आल्या दिवसापासूनचा जीवनप्रवास ऐकविला व त्यांनी आवाहन केले की ’मला फक्त तीन लाख सैन्य आणि तीन कोटी डॉलर्स हवेत, आपल्या सेना बाहेरून आणि चाळीस कोटी हिंदुस्थानी देशातून हल्ला करतील आणि इंग्रज साम्राज्य खाक होईल व त्या राखेतून नवा स्वतंत्र हिंदुस्थान साकारेल. याच भाषणात नेताजींनी आवाहन केले, की त्यांना १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात तेजाने तळपलेल्या राणी लक्ष्मीबाईचा वारसा चालविणारी एक केवळ महिलांची पलटण उभारायची त्यांची आत्यंतिक इच्छा आहे. स्त्री हा लोकसंख्येचा अर्धा भाग असला तरीही तिला काय मान मिळतो? समता, विकास व सन्मान यासाठी आता स्त्रियांनी या संग्रामात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढायची वेळ आली आहे. जर देशाच्या भाग्यलक्ष्मी हाती शस्त्र घेऊन रणांगणात उतरतील तर स्वातंत्र्य मिळाल्या खेरीज राहणार नाही. आजपर्यंत जगाच्या इतिहासात असा एकही दाखला नव्हता. सारेजण चकित होऊन ऐकत होते. नेताजींचा एकच सवाल होता, आहे अशी कुणी तेजस्विनी जी मला माझ्या देशासाठी अशी पलटण उभारून देईल?

capt laxmiदुसऱ्याच दिवशी सिंगापुरातले जुने नागरिक व आझाद हिंदच्या कोषागाराची जबाबदारी शिरावर घेतलेले बॅ. यल्लापा नेताजींना भेटायला आले ते अशी तेजस्विनी घेऊनच! मलायातील सर्वात सुंदर स्त्री व एक सेवाभावी डॉक्टर म्हणून महिला वर्गात प्रसिद्ध असलेली मद्रासच्या एस. स्वामिनाथन यांची मलायात येऊन राहिलेली कन्या डॉ. लक्ष्मी. स्वतः: डॉ. लक्ष्मी या साशंक होत्या की मला हे काम कितपत जमेल? मला साथ द्यायला किती मुली पुढे येतील? मात्र मनाचा निर्धार आणि नेताजींवर अपार श्रद्धा असलेल्या डॉ. लक्ष्मी यांनी हे आव्हान स्वीकारले. पहिल्या पाच दिवसात वणवण मात्र झाली, हाती काहीही लागले नाही. मात्र निर्धार कायम होता. अखेर अवघ्या वीस स्त्रियांना घेऊन आठ दिवसांच्या कठोर परिश्रमानंतर व खडतर प्रशिक्षणानंतर डॉ. लक्ष्मींनी आपल्या त्या छोट्याश्या तुकडीसह नेताजींना सलामी दिली आणि आश्चर्याचा धक्का दिला. साऱ्या जगाला एक नवा इतिहास पाहायला मिळाला. मळके, फाटके गणवेश व जुनीपुराणी हत्यारे देणाऱ्या कर्मठ जपानी सेनाधिकाऱ्यांच्या मान लाजेने खाली गेल्या. ताबडतोब महिला पलटणीला उत्तम नवे गणवेश व युद्धसाहित्य पुरविण्याचे हुकूम सुटले. या वीरांगनांच्या सलामीला उत्तर देताना नेताजी म्हणाले की " तुम्ही किती बंदुका पेलू शकता, किती फैरी झाडू शकता हा मुद्दा नाही तर तुमचा हा पराक्रम नव्या दैवी शक्तीला जन्म देईल. तुमचा हा रुद्रावतार पाहून तुमचे निद्रिस्त बांधव खडबडून जागे होतील व रणांगणाकडे धाव घेतील. तुम्ही नव्या युगाच्या स्फुर्तिदेवता ठराल. हिंदुस्थानच्या व जगाच्या इतिहासात तुमचे नाव तुम्ही आज सुवर्णाक्षरात लिहिले आहेतRLX1

ध्येयाने झपाटलेल्या डॉ. लक्ष्मींनी अहोरात्र मेहेनत करून हे स्वप्न साकारले. राणी लक्ष्मी पलटणीतील प्रत्येक स्त्री ही नेताजींना आपल्या मुलीसारखी होती. त्यांचे प्रशिक्षण नेताजींनी जातीने हाती घेतले. प्रशिक्षकाची निवड नेताजींनी जातीने केली ती प्रशिक्षकाच्या कर्तृत्वाबरोबरच त्याचे चारित्र्य पारखूनच. आपली महिला सेना ही शोभेची वा दिखाव्याची वस्तू न ठरता साऱ्या जगाला दिपवणारी पराक्रमी तुकडी असावा असा नेताजींचा कटाक्ष होता. या वीरांगना जिद्दीने पेटून मैदानात उतरल्या. zashi_rani_salami > त्यांनी पुरूष शिपायांच्या तोडीस तोड मेहेनत करून, दिवसाला आठ आठ तास कवायत करून आपले सामर्थ्य सिद्ध केले. याच तुकडीतील महिलांनी खडतर असे गनिमीयुद्धतंत्राचे प्रशिक्षणही घेतले. बघता बघता अवघ्या तीन महिन्यांत पूर्णतः: १२०० महिला सैनिक असलेली राणी लक्ष्मी पलटण व २०० परिचारिकांची चांदबीबी तुकडी सज्ज झाली. ब्रह्मदेशात याच तुकडीच्या महिला सैनिक ब्रिटिश सेनेशी लढल्या. जेव्हा माघार घेण्याची परिस्थिती आली तेव्हा जपानी लष्कराने नेताजींना तात्काळ विमानाने परत फिरण्याचा आग्रह धरला. मात्र जोपर्यंत शेवटची सैनिक आपल्या घरी पोचत नाहीत तोपर्यंत मी zashi_rani_prashikshanत्यांच्या बरोबर असेन असे नेताजींनी ठणकावून सांगितले. या मुली त्यांच्या आई-वडिलांनी माझ्या भरवशावर धाडल्या असून त्यांचे रक्षण हे आपले परम कर्तव्य आहे असे नेताजींनी सांगितले. पुढे ब्रह्मदेश इंग्रजांच्या ताब्यात पडला तेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांनी राणी लक्ष्मी तुकडीच्या महिला शोधून काढत त्यांना अनेक आमिषे दाखविली व अनेक प्रकारे खोदून खोदुन प्रश्न विचारून असे सिद्ध करायचा अत्यंत गलिच्छ प्रयत्न केला की या महिलांना जबरदस्तीने भरती केले गेले आहे. मात्र इंग्रजांना या वीरांगनांची खरी ओळख पटायची होती. जेव्हा जेव्हा इंग्रज अधिकारी चौकशीचा प्रयत्न करायचे तेव्हा या महिला ’आझाद हिंद झिंदाबाद’, ’नेताजी झिंदाबाद’, ’जय हिंद’ च्या घोषणा देत त्यांच्या एकाही प्रश्नाला उत्तर न देता उलट त्यांनाच सांगायच्या की आम्हाला सुद्धा युद्धकैदी म्हणून हिंदुस्थानात न्या आणि आमच्यावर खटला भरा! थक्क झालेल्या इंग्रज अधिकाऱ्यांना अखेर आझाद हिंद सेनेला बदनाम करायचा आपला नीच प्रयत्न सोडून द्यावा लागला.


धन्य ते नेताजी आणि धन्य त्या राणी लक्ष्मी पलटणीतल्या वीरांगना.



आझाद हिंद सेना १३ - हंगामी सरकारची स्थापना


आपल्या देशाबाहेर पडुन साडे तीन वर्षे उलटुन गेलेल्या नेताजींना आपल्या मातृभूमीत परतायची अनिवार ओढ होती, पण त्यांना देशात प्रवेश करायचा होता तो शत्रूचा नि:पात करून व आपल्या मातृभूमीला दास्यमुक्त करून आपल्या सार्वभौम देशाचा एक सन्माननिय नागरिक म्हणुन. गेली साडेतीन वर्षे केलेली अपार मेहेनत व नियोजन आता फलस्वरुप होण्याची लक्षणे दिसु लागत होती, मात्र नेताजी म्हणजे दिवास्वप्न पाहणारा आशावादी मनुष्य नव्हता तर तो एक द्र्ष्टा होता. संपूर्ण तयारीनिशी व ताकदीनिशी हल्ला चढवुन तो निर्णायक व यशस्वी होण्याची पूर्ण खात्री झाल्यावर मगच ते आपला निर्णायक घाव घालणार होते. आणि असा निर्णायक हल्ला यशस्वी होण्यासाठी केवळ सैन्य व शस्त्रे पुरेशी नसून आपल्या देशातील बांधवांचा आपल्या प्रयत्नाला मनापासून पाठिंबा असणे आवश्यक आहे हे त्यांनी ओळखले होते. किंबहुना जेव्हा आझाद हिंद सेना पूर्वेकडुन परकिय सत्तेवर बाहेरून हल्ला चढवेल त्याच वेळी जागृत झालेली व स्वतंत्र्यासाठी सज्ज झालेली सर्वसामान्य भारतीय जनता आतुन उठाव करेल व या दुहेरी पात्यांत परकियांचा निभाव लागणार नाही आणि नेमका तोच स्वातंत्र्याचा क्षण असेल हा नेताजींचा ध्येयवाद होता.

मात्र यासाठी आपल्या देशवासियांना आझाद हिंद सेना ही आपली मुक्तिसेना व स्वतंत्र हिंदुस्थानचे भावी सेनादल आहे अशी भावना होणे अत्यावश्यक आहे असे नेताजींना वाटत होते. आणि ते खरेही होते. हे अत्यंत कठिण होते हेही त्यांना माहित होते. एकिकडे धूर्त इंग्रजांनी चालविलेला अपप्रचार - जे खोडसाळपणे आझास हिंद सेनेचा उल्लेख अत्यंत तुच्छतापूर्वक ’जिफ्स’ (जॅपनिज इन्स्पावर्ड फिफ्थ कॉलम्नीस्ट्स) असा करीत असत. ज्यायोगे असा प्रचार व्हावा की आझाद हिंद सेना हे जपान्यांचे हस्तक दल असुन ते जपानरूपी शत्रूला भारतावर आक्रमण करण्यास मदत करीत आहेत व त्यातुन त्यांना सत्तेची लालसा आहे, अर्थातच ही सेना नसून ते घरभेदी आहेत. दुसरीकडे प्रस्थापित नेत्यांनी व कॉंग्रेस पक्षानेही नेताजी व आझाद हिंद सेना यांना आपले म्हणण्यास नकार दिला होता व त्यांचा धिक्कारही केला होता, त्यांच्या भगिरथ प्रयत्नांची दखल घेण्यास नकार दिला होता व त्यांची नकारात्मक प्रतिमा साकारली होती. असे प्रयत्न आपल्या धोरणा विरुद्ध असून आपण त्यांना विरोधच करु असे धोरण कॉंग्रेसने स्विकारले होते.

प्रत्यक्ष आपल्या मातृभूमित ही परिस्थिती तर जगात आपल्या सेनेचे काय स्थान असेल? काय प्रतिमा असेल? आपल्या देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामास जागतिक पाठिंबा मिळविणे अत्यंत महत्त्वाचे आहे हे नेताजींनी अभ्यासले होते. इतकेच नव्हे तर आपण व आपले सेनादल हे आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करीत असून या प्रयत्नात सर्व स्वातंत्र्यवादी अशियाई राष्ट्रे तसेच पाश्चिमात्य राष्ट्रे यांनी एक स्वातंत्र्योन्मुख राष्ट्र म्हणुन आपल्या मागे उभे राहिले पाहिजे ही नेताजींची महत्त्वाकांक्षा होती. एखाद्या व्यक्तिला वा संघटनेला पाठिंबा देणे वा व्यक्तिश: मदत करणे आणि युद्धात एखाद्या राष्ट्राने न्याय्य वाटणाऱ्या राष्ट्राची बाजु घेणे यांत जमीन -अस्मानाचा फरक होता. मुळात जेव्हा एखाद्या देशाचे सैन्य स्वत:चा संग्राम उभा करते आणि समविचारी राष्ट्रे त्याला पाठिंबा देतात तेव्हा ते संकेताला अनुसरुन असते मात्र एखाद्या गटाला वा व्यक्तिधिष्ठीत संघटनेला सहाय्य करणे ही अन्य राष्ट्राची कुरापत वा हस्तक्षेप ठरू शकतो. आझाद हिंद सेना म्हणजे कुणी व्यक्तिगत लाभासाठी वा आपल्या हेक्यासाठी उभारलेली मोहिम नव्हती तर ती एका संग्रामस्थ राष्ट्राची अस्मिता होती. आणि म्हणुनच तिला वा तिच्या पाठीराख्या मित्रराष्ट्रांना नेताजी बदनाम होऊ देणार नव्हते, तर ते आपला संग्राम युद्धनितीला व संकेताला अनुसरून आपला व आपल्या राष्ट्राचा हक्क मिळविण्यासाठी न्याय्य मार्गाने लढणार होते.

ज्या कारणास्तव शिवरायांनी राजमुकुटाची यत्किंचितही आसक्ती नसताना रायगडावर स्वत: ला राज्याभिषेक करवुन घेतला आणि स्वराज्य स्थापनेची घोषणा केली, नेमक्या त्याच उद्देशाने नेताजींना आझाद हिंद चे हंगामी सरकार स्थापण्याचा निर्णय घेतला. इथे पुन्हा एकदा नेताजींवरील शिवचरित्राचा प्रभाव दिसुन येतो. आपले लष्कर म्हणजे कुणा लुटारूंची टोळी नव्हे, कुणा सत्ताबुभुक्षिताची फौज नव्हे, कुणी अत्याचारी जमाव नव्हे तर हिंदुस्थान स्वतंत्र करण्यासाठी वचनबद्ध आणि धेयासक्त असलेले देशभक्त संघटित होऊन व स्वत:च्या भावी स्वतंत्र राष्ट्राचे प्रातिनिधीक असे सरकार स्थापून साऱ्या जगाला ग्वाही देणार होते की आम्ही आमच्या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी आमच्या राष्ट्रध्वजाखाली आमच्या सेनानीच्या अधिपत्याखाली उपलब्ध त्या सर्व मार्गांनी आणि सहकार्यानी लढणार आहोत आणि हा संघर्ष आता स्वातंत्र्यप्राप्तीतच विलिन होईल. आता कुणी आम्हाला गद्दार, फितुर, लोभी, भ्याड वा परक्यांचे हस्तक म्हणु शकणार नाही कारण आता आम्ही स्वतंत्र हिंदुस्थानचे सरकार स्थापन करीत असून जे आमच्या बरोबर येत आहेत ते आमच्या राष्ट्राला मान्यता देऊन व आमच्या स्वातंत्र्याचा आदर राखुन आम्हाला मित्र राष्ट्र म्हणुन आम्हाला पाठिंबा देत आहेत, मात्र स्वातंत्र्य हे आमचेच असेल व त्यासाठी जेव्हा जेव्हा रक्तपात होइल तेव्हा सर्वप्रथम रक्त आमचे सांडेल!

दिनांक २१ ऑक्टोबर १९४३ रोजी सिंगापूरात नेताजींनी आझाद हिंदच्या हंगामी वा अस्थायी सरकारची घोषणा केली.

AZH announcement

नेताजींचा इतिहासाचा उत्तम अभ्यास होता इतकेच नव्हे तर भूतकाळात घडलेल्या अनेक घटनांची संगती ते वर्तमान परिस्थितीशी ते अचूक साधत असत. हे अस्थायी सरकार स्थापन करताना त्यांच्या डोळ्यापुढे जागतिक इतिहासातील १९१६ सालचे आयरीश स्वातंत्र्यवीरांनी स्थापन केलेल अस्थायी सरकार, झेक अस्थायी सरकार तसेच केमाल पाशाने अनातोलियात स्थापन केलेले हंगामी सरकार ही नक्कीच असावीत. या प्रसंगी जमलेल्या १००० हून अधिक प्रतिनिधींना या सरकारचे स्वरूप समजावताना नेताजींनी सांगीतले की युद्धकाळात स्थापन झालेल्या या सरकारचा कारभार शांततेच्या काळातील सामान्य सरकारपेक्षा फार वेगेळा असेल, त्याची कार्यपद्धती निराळी असेल कारण ते शत्रुविरुद्ध लढणारे सरकार आहे. या सरकारला मंत्रीमंडळाखेरीज अनेक सल्लागार असतील जे पूर्व अशियातील हिंदुस्थानियांच्या सातत्याने संपर्कात असतील. जेव्हा हे सरकार स्वतंत्र हिंदुस्थानच्या भूमित स्थलांतरीत होईल तेव्हा ते नेहेमीची कामे करू लागेल. या सरकारच्या मंत्रीमंडळाला लाल दिव्याच्या गाड्या नी मानसन्मान नव्हते तर स्वराज्य स्थापनेची जबाबदारी होती. संग्रामाला सुरुवात तर झालीच आहे, आता प्रत्यक्ष युद्धभूमिकडे जेव्हा आझाद हिंद सेना कूच करेल तेव्हा प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात होईल. युद्ध जिंकुन, इंग्रज व अमेरीकन फौजांना धूळ चारून जेव्हा व्हॉईसरॉयला हुसकून त्याच्या भवनावर तिरंगा फडकेल तेव्हाच हा लढा थांबेल.

आझाद हिंदच्या हंगामी सरकारचे मंत्रीमंडळ

AHministry

नेताजी हे स्वत: या सरकारच्या सर्वोच्चपदी म्हणजे पंतप्रधान व राष्ट्रप्रमुख होते. युद्ध व परराष्ट्र व्यवहार ही दोन खाती त्यांच्याकडे होती.अर्थातच स्वातंत्र्यपर्वाचे भिष्माचार्य राशबाबू हे या सरकारच्या सर्वोच्च सलागारपदी असावेत अशी गळ नेताजींनी त्यांना जाहिर रित्या घातली व राशबाबूंनी ती मान्य केली. लेफ्टनंट कर्नल ए. सी. चटर्जी हे अर्थमंत्री होते, आनंद मोहन सहाय यांना मंत्रीपद दिले गेले. एस. ए. अय्यर यांच्याकडे प्रसिद्धी व प्रचारयंत्रणेची जबाबदारी होती, कॅप्टन लक्ष्मी यांच्याकडे स्त्री संघटनाची जबाबदारी होती, ए. एन. सरकार हे कायदेसलागार होते, जगन्नाथराव भोसले, निरंजन भगत, अझिज अहमद, मोहम्मद झमन कियाणी, ए. डी. लोगनादन, एहसान कादिर व शाहनवाझ खान हे लष्कराचे प्रतिनिधी होते तर करीम गनी, देबनाथ दास, यल्लाप्पा, जॉन थिवी, सरदार इशरसिंग हे सल्लागार होते. राष्ट्रप्रमुख आणि पंतप्रधान म्हणुन शपथ ग्रहण करताना नेताजींचा कंठ दाटुन आला. काही क्षण त्यांच्या तोंडुन शब्दच फुटेना. मग स्वत:ला सावरून त्यांनी शपथ घेतली "परमेश्वराला स्मरुन मी सुभाषचंद्र बोस, भारताला आणि माझ्या ३८ कोटी बांधवांना स्वतंत्र करण्यासाठी ही पवित्र प्रतिज्ञा करीत आहे. शेवटचा श्वास घेईपर्यंत हे पुण्यदायी युद्ध मी सुरूच ठेवेन." टाळ्यांच्या कडकडाटात व त्या भारलेल्या वातावरणात सर्व मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडला. सोहळ्याची सांगता झाली ती नव्या राष्ट्रगीताने:

सब सुखकी चैनकी बरखा बरसे भारत भाग है जागा
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल बंगा
चंचल सागर बिंध हिमाला, नीला जमुना गंगा
सूरज बनकर जगपर चमके भारत नाम सुभागा, जय हो जय हो, जय हो.

सबके दिलमे प्रीत बसाये तेरी मिठी बानी
हर सुबेके हर मजहबके रहनेवाले प्राणी
सब भेद-औ-फर्क मिटाके,
सब गोदमे तेरी आके,,
गूंदे प्रेम की माला
सूरज बनकर जगपर चमके भारत नाम सुभागा, जय हो जय हो, जय हो.

सुबह सबेरे प्रेम पंखेरू तेरेही गुन गाये
बासभरी भरपूर हवाएं जीवन मे रूत लायें
सब मिल कर हिंद पुकारे,
जय आझाद हिंदके नारे,
प्यारा देश हमारा
सूरज बनकर जगपर चमके भारत नाम सुभागा, जय हो जय हो, जय हो.

हे गीत गाताना स्वतंत्र हिंदुस्थानात कंठाकंठातुन हे गीत गायले जात असेल असे स्वप्न पाहणाऱ्या नेताजींना कल्पना नव्हती की काही दशकांनंतर हे गीत कुठे ऐकायलाही मिळणार नाही, कुणाला माहितही असणार नाही.

( आझाद हिंद सरकार ज्या सिंगापूरात ६४ वर्षांपूर्वी स्थापन झाले त्याच दिवशी म्हणजे गेल्या महिन्यातील २१ तारखेला सिंगापूरात उपस्थित असण्याचा योग मला लाभला. नेताजींच्या व आझाद हिंद सेनेच्या स्मृतिप्रित्यर्थ पडांग वर जाउन तेथील स्मारकावर फुले वाहताना सगळा इतिहास डोळ्यापुढे उभा राहिला)

ina stamp sgp

स्वतंत्र देशाचे सरकार म्हणजे स्वतःचे चलन व टपाल तिकिट हे हवेच!

INA 5 re note INA 10 re note INA 100 Re note

रुपये ५०० मूल्याचे राष्ट्रिय प्रमाणपत्र हे जणू आझाद हिंदचे स्थैर्य व यशाची ग्वाही देत होते

INA certificate 500 re

जशास तसे: आझाद हिंद सेने विषयी अपप्रचार करून इंग्रजी सैन्यातील हिंदुस्थानी शिपायांना आझाद हिंदमध्ये सामिल होण्यापासून परावृत्त करण्यासाठी इंग्रजांनी सैन्यात अनेक पत्रके वाटली होती. त्याला चोख प्रत्त्युत्तर म्हणून आझाद हिंद सरकारने हिंदी शिपायांना सत्यस्थिती समजावी व त्यांनी आझाद हिंद सेनेत दाखल व्हावे यासाठी अशी पत्रके वितरीत केली. यात आझाद हिंद सेना गुलामीचे साखळदंड तोडत आहे व आता इंग्रजांचा झेंडा जमिनीला मिळाला आहे, जपानी लष्कराच्या मदतीने आझाद हिंदच्या वीरांची घोडदौड सुरू आहे असे या पत्रकांत प्रभावीपणे दाखविण्यात आले होते.

IndiaBose-AzadHindCard